शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

हा तर हुकूमशाहीचाच नमुना...

By admin | Updated: January 17, 2015 01:23 IST

मोदींचे सरकार अध्यादेशाच्या आधारावर चालणारे ‘हुकूमशाही’ सरकार असल्याचा सोनिया गांधींनी केलेला आरोप तथ्यहीन नाही

सुरेश द्वादशीवार, संपादक, लोकमत, नागपूर - मोदींचे सरकार अध्यादेशाच्या आधारावर चालणारे ‘हुकूमशाही’ सरकार असल्याचा सोनिया गांधींनी केलेला आरोप तथ्यहीन नाही. जो पंतप्रधान संसदेला सामोरा जात नाही, संसद सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत नाही आणि प्रशासनाच्या जबाबदारीचे नाव पुढे करून आपल्या संसदीय जबाबदा-या टाळत असतो तो कोणाला जबाबदार असतो? संसदीय लोकशाहीत पंतप्रधान आणि त्यांचे सरकार लोकसभेला जबाबदार असतात व लोकसभेची मर्जी असेल तोवरच ते अधिकारारूढ असतात. परंतु मोदी संसदेत येत नाहीत, लोकसभेत उपस्थित राहात नाहीत आणि संसदेने मान्यता न दिलेली विधेयके राष्ट्रपतींची संमती घेऊन परस्पर लागू करतात. संसदेच्या गेल्या अधिवेशनात राष्ट्रीय महत्त्वाची अशी अनेक विधेयके संसदेच्या संमतीवाचून मंजूर झाली व लागूही झाली. पंतप्रधान आणि त्यांचे सरकार यांच्यात सरकारच्या प्रशासनाची व लष्कराची सारी सत्ता निहित असते. ती बऱ्याच अंशी निरंकुश व अंतिमही असते. संसदेतील बहुमतच त्यावर नियंत्रण ठेवू शकणारे असते. अशावेळी पंतप्रधान संसदेला बाजूला सारून राज्य कारभार करीत असतील तर त्यांचे सरकार संसदेचे निरंकुश व अंतिम अधिकार वापरणारे ठरते. अशा सरकारवर हुकूमशाहीचा आरोप केला तर तो त्याला चिकटतही असतो. या आरोपाला सरळ उत्तर न देता ‘इंदिरा गांधीही असेच करीत’ किंवा ‘पं. नेहरूंच्या काळातही अध्यादेश काढले जात’ अशी उडवाउडवीची उत्तरे वेंकय्या नायडू देत असतील तर त्याचा अर्थ त्यांच्याजवळ या आरोपाचे खरे उत्तर नाही असा होतो. वेंकय्या हे तसेही कोणतीही गंभीर गोष्ट विनोदी वा सहजसाधी करून दाखविण्याची हातोटी लाभलेले पुढारी आहेत. त्यांची मोदीनिष्ठा अढळ आहे व कोणत्याही प्रश्नावर मोदींचे समर्थन करणे हा त्यांच्या व्रताचा भाग आहे. वेंकय्यांची अशी भलावण करूनही त्यांच्या उत्तराची दखल एका वेगळ्या पद्धतीने घेणे गरजेचे आहे. इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी आणली व प्रसंगी अध्यादेशांचा आधार घेतला हे खरे आहे. पण जनतेने त्यांना आणीबाणीची शिक्षा सुनावली आहे आणि इंदिरा गांधींनी काढलेले अध्यादेश संसदेचे अधिवेशन चालू नसताना काढले आहेत. या अध्यादेशांना संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर सहा आठवड्यांच्या आत दोन्ही सभागृहांची मान्यता घेणे आवश्यक असते. तसे न झाल्यास ते आपोआप रद्दबातल होतात. इंदिरा गांधींनी काढलेल्या अशा अध्यादेशांना त्यांनी संसदेची रीतसर मान्यताही वेळेच्या आत मिळविली आहे. पं. नेहरूंची गोष्टच न्यारी होती. त्यांच्या पाठीशी अभूतपूर्व बहुमत होते. लोकसभेत आणि राज्यसभेत त्यांचा पक्ष दोनतृतीयांश बहुमताएवढा मोठा होता. त्यांनी वा त्यांच्या सरकारने आणलेले कोणतेही विधेयक कधी नामंजूर झाले नाही व ते मंजूरच होतील हे देशाला कळणारेही होते. त्याहून महत्त्वाची बाब ही की पं. नेहरू संसदेत सातत्याने हजर राहत. विरोधकांची टीका व भाषणे ऐकून घेत. त्यांना रीतसर उत्तरे देत. त्यांच्याएवढा संसदेचा आदर नंतरच्या कोणत्याही पंतप्रधानाने केला नाही हे वास्तव आहे. शिवाय या काळात संसदेची अधिवेशने दीर्घकाळ चालत व सरकार त्यातील जबाबदारीविषयी दक्षही असे. आताचा खरा प्रश्न सरकारच्या वृत्तीत आलेल्या संसदेविषयीच्या बेफिकिरीचा आहे. संसदेत त्यांच्या उपस्थितीची मागणी होत असताना मोदींनी सभागृहात जाणे टाळले व ते काश्मिरातील निवडणूक प्रचाराला रवाना झाले ही गोष्ट देशाने नुकतीच पाहिली आहे. अमुक प्रश्नाला पंतप्रधानांनीच उत्तर दिले पाहिजे अशी मागणी संसदेत अनेकदा पुढे आली. विशेषत: उत्तर प्रदेशातील धर्मांतराच्या मोहिमेविषयी, त्या राज्यातील लव्ह जिहाद किंवा मिट जिहादविषयी अशा उत्तरांची मागणी करणारे प्रश्न संसदेत आले. देश धर्मनिरपेक्षतेच्या वाटेवर असताना पंतप्रधानांचा पक्ष आणि त्यांचा परिवार ती वाट सोडून धर्मांधतेच्या दिशेने जाताना दिसत असेल तर त्या गंभीर विसंवादाबद्दल पंतप्रधानांचे मत समजून घेणे हा संसदेचा हक्क होता. मोदींनी त्या हक्काचा नुसता अव्हेरच नव्हे तर अपमानही केला. लोकनियुक्त सभागृहांच्या अधिकारांचा असा अवमान करणाऱ्या सरकारला हुकूमशहा म्हणायचे नाही तर दुसरे काय? सोनिया गांधी या काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि गेली दहा वर्षे त्या देशाच्या सत्तास्थानी राहिल्या आहेत. त्यांच्या शब्दाला देशात मोल आहे. शिवाय तो त्यांचा एकट्याचा शब्द नाही. तो देशाचाच अभिप्राय आहे. पंतप्रधानांच्या पाठीशी त्यांच्या पक्षाचे बहुमत असणे ही गोष्ट त्यांना संसदेकडे पाठ फिरविण्याचा अधिकार देत नाही. शिवाय संसदेला विश्वासात न घेता प्रशासन चालविण्याचा, शासकीय आदेश काढण्याचा किंवा राष्ट्रपतींना सल्ला देण्याचा बेबंद अधिकारही त्यातून प्राप्त होत नाही. नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यापासून किती दिवस संसदेत उपस्थिती लावली, संसद सदस्यांच्या किती प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली आणि त्यात चालणाऱ्या कोणत्या चर्चेत ते कितीदा सहभागी झाले याचा हिशेब केला तर देशात आजवर झालेल्या १४ पंतप्रधानांत त्यांचा क्रमांक सर्वात अखेरचा लागेल. ही बाब पंतप्रधान संसदेला जबाबदार तर नाहीतच शिवाय ते संसदेला जुमानत नाहीत हे सांगणारी आहे. हा प्रकार लोकशाहीला मान्य न होणारा हुकूमशाहीचाच एक वेगळा नमुना आहे.