शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी पैसे देण्याचा पहिलाच प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 01:29 IST

शेती उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले असले तरी त्याला २०२२ पर्यंतचा कालावधी आहे. 

- पाशा पटेल(अध्यक्ष - राज्य कृषीमूल्य आयोग)शेती उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले असले तरी त्याला २०२२ पर्यंतचा कालावधी आहे. दरम्यान, गेल्या वर्षी सरकारने शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्चावर अधारीत ५० टक्के नफा, असे धोरण जाहीर केले आहे़; परंतु विरोधकांसह शेतकरी स्वामीनाथन् आयोग लागू करावा, अशी मागणी करीत आहेत़ वास्तविक पहाता, शासनाने जाहीर केलेले धोरण स्वामीनाथन् आयोगाचा आत्मा आहे़पूर्वी भारत हा आयात करणारा देश म्हणून ओळखला जात असे़ आता तसे व्हायचे असेल तर जगातील विविध देशांना कुठल्या शेतीमालाच्या उत्पादनाची गरज आहे, हे जाणून घेण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असल्याचे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले होते़ प्रत्येक देशाची गरज ओळखून निर्यात करणे आवश्यक आहे़ देशातून होणारी ३० मिलियन डॉलरपर्यंतची उत्पादनाची निर्यात ही आता १०० मिलियन डॉलरपर्यंत करावयाची आहे़ त्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी केंद्र सरकारने हा पहिला प्रयोग हाती घेतला आहे़ त्यासाठी शेतकºयांना प्रोत्सहन देऊन भविष्यात ही रक्कम वाढता येऊ शकते़तेलंगणा राज्यात सुरुवातीस ४ हजार रुपये अनुदान देण्यात येत होते़ आता ५ हजार रुपये अनुदान झाले आहे़ या नव्या प्रयोगामुळे शेतीसाठी अनुदानाचा नवा रस्ता निर्माण झाला आहे़ भारतात विदेशातून ८ लाख कोटी रुपयांचे पेट्रोल, डिझेल आयात होते़ ही आयात कमी करण्यासाठी इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात येत आहे़ त्यामुळे देशात निश्चितच परिवर्तन होईल़ एकंदर, केंद्र सरकारने २ हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकºयांना वार्षिक सहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेऊन शेतीकडे पैसे वळविण्याचा पहिला प्रयोग केला आहे़ शेतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहाण्याची ही सुरूवात आहे. या मदतीच्या रकमेमध्ये भविष्यात वाढ होऊ शकते. या निर्णयाचा भाजपाला फायदा होईल की नाही, हेमहत्वाचे नसून अल्पभूधारक शेतकºयांना नक्कीच फायदा होणार आहे.

टॅग्स :Pasha Patelपाशा पटेल