शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ही आवडते मज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:14 IST

‘कृतांत कटकामलध्वज जरा दिसो लागली’ अशा वृद्धापकाळ प्रवेशाच्या वेळी ‘ही आवडते मज’ असे म्हणणे म्हणजे काहीतरीच़ गवºया पुढे गेल्या आता ही भाषा तोंडी शोभते का? असे कानी पडण्याची शक्यता अधिक़ मित्रांनो!

- डॉ. गोविंद काळे‘कृतांत कटकामलध्वज जरा दिसो लागली’ अशा वृद्धापकाळ प्रवेशाच्या वेळी ‘ही आवडते मज’ असे म्हणणे म्हणजे काहीतरीच़ गवºया पुढे गेल्या आता ही भाषा तोंडी शोभते का? असे कानी पडण्याची शक्यता अधिक़ मित्रांनो! ही म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून माझे विधान शाळेबद्दल आहे़ ज्या शाळेने मला घडविले, त्या शाळेचे नावच मुळी आदर्श मराठी शाळा होते़ इयत्ता चौथीमध्ये आचार्य अत्रेंची कविता अभ्यासाला होती़‘ही आवडते मज मनापासुनी शाळालाविते लळाही जसा माऊली बाळा’गावी जाऊन शाळेचे अस्तित्व शोधतो़ शाळेचे दुसरीकडे स्थलांतर झाले आहे़ मला उगीचच वाटून राहिले आदर्शवादाचेच स्थलांतर झाले आहे़ नावाला पूर्वी अर्थ होता़ आता नावाचे निरर्थ अर्थ काढले जातात़ माझ्या वर्गामध्ये त्या काळी पाच शिवाजी शिकत होते़ भांडण झाले तर ताठ मानेने भाग घेत असू़ ‘जादा बोलनेका काम नही’ असे दुसºया वर्गातील विद्यार्थ्यांना बजावित असू़ शिवाजी कदम, शिवाजी नवगन, शिवाजी चव्हाण, शिवाजी पाटील आणि शिवाजी गुंड़ शिवाजी गुंड म्हणायला विचित्रच वाटे पण एखाद्याच्या आडनावाला आपण काय करणार? शिवाजी गुंड फारच किरकोळ देहयष्टीचा होता़ दोन महिन्यांतून एकदा आजारी पडे़ आम्ही त्याला हिणवत असू, तुझ्यात शिवाजीचे एकही लक्षण नाही आणि आडनावातील गुंडपणा तर काहीच नाही़ बिनकामाचा शिवाजी म्हणून त्याला चिडविले जाई़ वर्गात पाच शिवाजी असले तरी आमच्या ‘अ’ वर्गावर ‘ब’ वर्गाची कुरघोडी सदैव चाले़ कारण त्यांच्या वर्गात एकच शिवाजी असला तरी त्याचे आडनाव भोसले होते़ त्याचा रुबाब मोठा होता़आडनावातील मोठेपणा चौथी कक्षेतच लक्षात आला़ या शाळेने बालवयात खूप काही शिकविले जे पाठ्यपुस्तकात नव्हते़ आठ आणे फ ी महिन्याला भरावी लागे़ तीन महिने फी भरायची राहून गेली़ खडकीकर गुरुजी तीन महिने फी न भरलेल्या विद्यार्थ्यांची नावे वर्गात वाचत होते़ त्यात माझे नाव नव्हते़ मला आश्चर्य वाटले़ दोन दिवसांनी दीड रुपये घेऊन गुरुजींना भेटलो़ गुरुजी एवढेच म्हणाले, काळ्या! तुझी फ ी मी भरली आहे़ काळजी करू नको़ पण दंगामस्ती करण्यापेक्षा अभ्यासाकडे अधिक लक्ष पुरव़ खडकीकर गुरुजींनी किती जणांची फी भरली असेल ते देव जाणे़ माणसे न बोलता आदर्शवाद जगत होती़ अध्यात्म आणखी काय वेगळे असते़

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी