शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचे मारेकरी

By admin | Updated: December 8, 2014 06:02 IST

शेती व शेतकऱ्यांबद्दल बिगर शेतकरी समाजात अनेक गैरसमज आहेत. बहुतेक लोक शेतकरी ही एक जीवनशैली आहे, असे मानतात.

अमर हबीब - शेती व शेतकऱ्यांबद्दल बिगर शेतकरी समाजात अनेक गैरसमज आहेत. बहुतेक लोक शेतकरी ही एक जीवनशैली आहे, असे मानतात. बिगर शेतकऱ्याने असे उदात्तीकरण केले, की मी त्यांना ‘तुम्ही शेती का करीत नाहीत?’ असा प्रश्न विचारतो. तेव्हा गप्प बसतात. शेती करणे हे एवढे छान छान असते, तर त्यावर लोकांच्या उड्या नसत्या का? शेती ही जीवनशैली आहे, असे म्हणणाऱ्यांच्या मनात ‘तू असाच राबत राहा.’ असा छुपा संदेश असतो. छान टुमदार बंगला, नवरा बायकोचा गडगंज पगार. दोघांना कार, मूल कॉन्व्हेन्टला. अधून मधून गावाकडे फेरफटका मारायचा अन् म्हणायचे, ‘तुमचे किती चांगले आहे, निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळते.’ महिन्याच्या पगाराची वा हरामाच्या कमाईची ददात नसलेल्यांची ही कोडगी भाषा. शेती ही जीवनशैली आहे, ही समजूत केवळ बिगर शेतकऱ्यांचीच नाही. अनेक शेतकरी खुद्द शेतीला जीवनशैली मानतात. याला ‘तुरुंगातील तंद्री’ म्हणतात. तुरुंगात राहणारेच तुरुंगाचे गुणगान करू लागतात. माझ्या तुरुंगाच्या भिंती किती उंच आहेत आणि मला घातलेल्या बेड्या किती बलदंड आणि सुंदर आहेत, याची महती ते सांगू लागतात. असे तुरुंगाचे ‘गौरवगीत’ गाणारे अनेक महाभाग मी पाहिले आहेत. त्यांपैकी बऱ्याच लोकांना शेतीबाह्य उत्पन्न होते. जात किंवा धर्म जसा जन्माच्या आधाराने ठरतो, तसे ज्यांचे आई-बाप शेतकरी आहेत, त्यांना शेतकरी समजले जाते, ही समजूतदेखील चुकीची आहे. शेती हा एक व्यवसाय आहे. किराणा दुकानदाराचा मुलगा कलेक्टर झाल्यावर जसा किराणा दुकानदार म्हणून ओळखला जात नाही, तसेच शेती न करणारा शेतकऱ्याचा मुलगाही शेतकरी नसतो. शेतकऱ्याचा मुलगा प्राध्यापक, तलाठी, शिक्षक झाल्यानंतर शेतकरी राहत नाही. समाजाचे विश्लेषण करणारे विद्वान खास करून ही गफलत करतात.ज्याच्याकडे सात-बारा आहे, तो शेतकरी, ही समजूतही चूक आहे. इन्कम टॅक्स बुडविण्यासाठी अनेक व्यापारी, पुढारी आणि अधिकारी शेतजमिनी आपल्या नावाने करून ठेवतात. आपल्याकडील काळा पैसा शेतीतून आला आहे, असे दाखवून पांढरा करून घेतात. त्यांना शेतकरी म्हणायचे का? स्वत:ला शेतकरी म्हणून मिरविणारे चलाख पुढारी आहेत. सगळ्या शेतकऱ्यांची शेती तोट्यात असताना पुढाऱ्याचीच शेती फायद्याची कशी काय होते? पुढाऱ्याची शेती रानात नव्हे, राजकारणात पिकते. मग शेतकरी कोण? ज्यांचे पोट शेतीवर आहे, ज्यांची प्रगती आणि अधोगती शेतीतून आलेला पैसा ठरवितो, ते सगळे शेतकरी. हा शेतकरी आज भयंकर संकटात आहे.मराठी साहित्यात अलीकडच्या काळात शेतकऱ्यांचे वास्तव चित्र काही प्रमाणात दिसते आहे. पूर्वीचे साहित्य म्हणजे लेखक लहानपणी सुटीच्या दिवसांत मामाच्या गावी जायचे. तेथे त्यांना शेती दिसायची. हिरवीगार राने, नदीपात्रात पोहणे, आंबराया, चांदणी रात्र वगैरे. निसर्गचित्राचे वर्णन करावे, तसे त्यांनी केले. नंतर हे चित्र बदलले. इंग्रज भारतात आल्यानंतर काही शहरांत औद्योगिकीकरण झाले. खेड्यातील लोक शेती सोडून जगायला शहरात येऊ लागले, तेव्हा तथाकथित मध्यप्रवाह मानलेल्या मराठी साहित्यात शेतकरी ‘विदूषक’ म्हणून रंगविला गेला. काळ बदलला. कामगारांच्या बाजूने आवाज उठू लागला. मार्क्सवादी विचारांचा प्रभाव वाढला. वर्गसंघर्षाची भाषा बोलली जाऊ लागली. मालक आणि मजुरांचे तत्त्वज्ञान लोकप्रिय झाले. मालक शेतकरी आणि शेतीत काम करणारा मजूर. मजुरांचा कैवार घेण्यासाठी मालकावर हल्ला चढविला पाहिजे. या काळात ‘खलनायक’ म्हणून शेतकऱ्यांचे चित्र रेखाटले गेले. मराठी चित्रपटांत त्याचे प्रतिबिंब उमटलेले. गावचा पाटील, पिळदार मिश्या, खांद्याला बंदूक, घोड्यावर बसून येतो, रानातल्या मजुराच्या सुंदर पोरीला उचलून घेऊन जातो, अशी दृश्ये रेखाटली गेली. शेतकऱ्याला परंपरागतवाल्यांनी ‘विदूषक’ आणि पुरोगाम्यांनी ‘खलनायक’ ठरविले. ही दोन्ही चित्रे खोटी, भ्रामक आणि द्वेषमूलक होती.शेतकऱ्यांचे खरे दुखणे कोणीच मांडले नाही का? याचे उत्तर ‘मांडले होते,’ असे आहे. १५० वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ लिहिला. शेतकऱ्याचे वास्तव चित्र मांडले. फार कमी लोकाना माहीत आहे, की प्रबोधनकार ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक पुस्तक लिहिले आहे. प्रबोधनकार आज असते, तर त्यांनी सत्तेचे सिंहासन अक्षरश: पेटवून दिले असते, इतके जहाल लेखन त्यांनी केले आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी अनेकांनी शेतकऱ्यांच्या वेदनांना वाचा दिली. लोकांनी काय केले? या महात्म्यांचे जे आणि जेवढे सोयीचे होते, तेवढेच उचलले. शेतकऱ्यांबद्दलच्या विचाराकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. यावरून एकच गोष्ट लक्षात येते, की माणसे मेंदूने कमी आणि खिशाने जास्त विचार करतात. कारखानदार असो की औद्योगिक कामगार, नोकरदार असो की सरकार, यांना शेतकऱ्यांचे वाईट करूनच कल्याण साधायचे असेल, तर कोणता महात्मा तरी काय करू शकेल?