शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

कुटुंब रमलंय निवडणुकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 17:21 IST

निवडणूक म्हटली म्हणजे घरातल्या लग्नसोहळ्यासारखीच लगबग, धावपळ, काळजी अशा सगळ्या भावभावनांचा कल्लोळ

मिलिंद कुलकर्णीनिवडणूक म्हटली म्हणजे घरातल्या लग्नसोहळ्यासारखीच लगबग, धावपळ, काळजी अशा सगळ्या भावभावनांचा कल्लोळ असतो. हे मोठे कार्य यशस्वी करण्यासाठी नातेवाईक, मित्र, शेजारीपाजारी यांचे सहकार्य होत असते, पण कुटुंबप्रमुखाची खऱ्या अर्थाने कसोटी असते. कामे व्यवस्थित, नियोजनबध्द हवीत, साधनसामुग्रीची कमतरता राहू नये, योग्य व्यक्तीकडे जबाबदारीचे वाटप, नियमित संवाद आणि समन्वयातून रोजच्या कामाचा गाडा हाकला जातोय किंवा नाही, हे त्या कुटुंबप्रमुखाला बघावे लागते. रुसवेफुगवे, नाराजी हे दूर करावे लागते. लग्नात जशी वरपक्षाची काळजी घ्यावी लागते, तसे निवडणुकीत कार्यकर्त्यांची काळजी घ्यावी लागते. कार्यकर्ते कोठेही नाराज होणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यांच्या मागण्या अनिच्छेने पूर्ण कराव्या लागतात.खान्देशातील राजकारणात अनुभवी, ज्येष्ठ नेत्यांसोबत तरुण, उत्साही उमेदवारांचे संतुलन साधले गेल्याने संमिश्र चित्र आहे. ज्येष्ठांसोबत त्यांची पुढील पिढी सक्रीय आहे, तर तरुणांच्या पाठीशी त्यांचे पालक सक्षमपणे उभे आहेत. तरुणांच्या उत्साहाला ज्येष्ठांच्या अनुभवाची जोड मिळत असल्याने निवडणुकीतील रणनीती, प्रचार कार्याची दिशा, आपत्ती व्यवस्थापन उत्तम रीत्या होत आहे. ज्याठिकाणी अशा उणिवा आहेत, त्याठिकाणी मात्र खाजगी संस्थांची मदत घेतली जात आहे.जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या प्रचाराची धुरा ही पत्नी ‘महानंद’च्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, स्रुषा खासदार रक्षा खडसे, कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे सांभाळत आहेत. भुसावळला आमदार संजय सावकारे यांच्या मदतीला बंधू प्रमोद सावकारे व भावजयी जि.प.सदस्या पल्लवी सावकारे आहेत. रावेर मतदारसंघात आमदार हरिभाऊ जावळे यांच्या मदतीला पूत्र माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ अमोल तर माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मदतीला संपूर्ण ‘मधुस्रेह परिवार’ उभा ठाकला आहे. चोपड्यात आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या परिवारातील एका सदस्याला उमेदवारी मिळावी, यासाठी संपूर्ण सोनवणे परिवार प्रयत्नशील आहे. दुसरीकडे माधुरी पाटील यांच्यासाठी पती माजी महापौर किशोर पाटील जोर लावत आहेत. अमळनेरात आमदार शिरीष चौधरी यांच्यासाठी बंधू डॉ.रवींद्र चौधरी यांच्यासह संपूर्ण ‘हिरा समूह’ तर आमदार स्मिता वाघ यांच्यासाठी पती माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ, अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा हे रणांगणात उतरले आहेत. एरंडोलमध्ये तर ज्येष्ठ नेत्यांचे पूत्र प्रचाराची आघाडी सांभाळत आहेत. त्यात आमदार डॉ.सतीश पाटील यांचे पूत्र रोहन, माजी आमदार चिमणराव पाटील यांचे पूत्र जिल्हा बँक संचालक अमोल, तर नगराध्यक्ष करण पवार यांच्यासाठी त्यांचे वडील बाळासाहेब पाटील रणनीती आखत आहे. जामनेरात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे संपूर्ण उत्तर महाराष्टÑाची जबाबदारी असल्याने पत्नी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. जि.प.सदस्य संजय गरुड यांच्यासाठी संपूर्ण गरुड परिवाराने कंबर कसली आहे. जळगाव ग्रामीणमध्ये सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून पूत्र जि.प.सदस्य प्रताप पाटील मैदानात उतरले आहेत. चाळीसगावात पत्नी संपदा यांच्यासाठी खासदार उन्मेष पाटील मोर्चेबांधणी करीत आहे. मंगेश चव्हाण आणि चित्रसेन पाटील यांच्यासाठी मित्रपरिवार आघाडीवर आहे. पाचोºयात आमदार किशोर पाटील यांना काका स्व. आर.ओ.पाटील यांची उणिव जाणवत असली तरी मित्र परिवार, कुटुंबिय साथ देत आहेत. माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासोबत बंधू संजय वाघ सोबत आहेत. जळगाव शहरात आमदार सुरेश भोळे यांच्यासाठी पत्नी महापौर सीमा भोळे, पूत्र विशाल हे मोर्चेबांधणी करीत आहेत.धुळ्यात माजी आमदार अनिल गोटे यांच्या कुटुंबातील पत्नी माजी नगराध्यक्षा हेमा गोटे, पूत्र तेजस गोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यासाठी मित्र परिवार व नगरसेवक मंडळी, डॉ.माधुरी बोरसे यांच्यासाठी मातोश्री माजी मंत्री डॉ.शालिनी बोरसे यांचा आशीर्वाद आणि पती डॉ.विपुल बाफना यांची भक्कम साथ आहे. माजी आमदार प्रा.शरद पाटील यांच्यासाठी शिवसैनिक ठामपणे उभा आहे. धुळे ग्रामीणमध्ये आमदार कुणाल पाटील यांना वडील ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील हे आधारवडासारखे आहेत. तर राम भदाणे यांना आजोबा ज्येष्ठ नेते कै. द.वा.पाटील यांचा वारसा आणि वडील ज्येष्ठ नेते मनोहर भदाणे व आई माजी पं.स.सभापती ज्ञानज्योती भदाणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शिरपूर व साक्रीचे आमदार अनुक्रमे काशिराम पावरा व डी.एस.अहिरे यांना आमदार अमरीशभाई पटेल यांची भक्कम साथ लाभली आहे. डॉ.जितेंद्र ठाकूर यांच्यापाठीशी कार्यकर्त्यांसोबतच रंधे परिवार उभा आहे. मंजुळा गावीत यांच्यासोबत डॉ.तुळशीराम गावीत सक्रीय आहेत. शिंदखेड्यात पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांना वडील ज्येष्ठ नेते सरकारसाहेब रावळ व आई नगराध्यक्ष नयनकुंवर रावळ यांचा आशीर्वाद आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर व संदीप बेडसे यांच्यासाठी मित्र परिवार व कार्यकर्ते अग्रभागी आहेत.नंदुरबारात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचे संपूर्ण कुटुंब राजकारणात सक्रीय आहेत. पत्नी माजी जि.प.अध्यक्षा कुमुदिनी गावीत, कन्या खासदार डॉ.हीना हे प्रचारात सक्रीय आहेत. त्यांचे बंधू शरद हे नवापूरमध्ये तर राजेंद्र हे शहाद्यात प्रयत्नशील आहेत. शालक जगदीश वळवी हे चोपडा (जि.जळगाव) येथील माजी आमदार असून आताही राष्टÑवादीतर्फे इच्छुक आहेत. कन्या डॉ.सुप्रिया यांनीही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे.शहाद्यात आमदार उदेसिंग पाडवी यांच्यासाठी कुटुंबातील सदस्य, मित्रवर्ग प्रयत्नशील आहे. माजी आमदार अ‍ॅड.पद्माकर वळवी यांच्यासाठी काँग्रेसजन आघाडीवर आहेत. अक्कलकुव्यात आमदार डॉ.के.सी.पाडवी यांच्यासाठी पूत्र व निष्ठावंत कार्यकर्ते सोबत आहेत. नवापुरात आमदार सुरुपसिंग नाईक यांनी तर उमेदवारीसाठी पूत्र शिरीष यांचे नाव सूचविले आहे. तर माजी जि.प.अध्यक्ष भरत गावीत यांच्या पाठीशी वडील माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांची भक्कम साथ आहे.कुटुंब राजकारणात रमले असून महिनाभर ही लगबग सुरु राहणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव