शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

‘फेक न्यूज’ची फेकाफेकी..

By सचिन जवळकोटे | Updated: April 5, 2018 00:14 IST

पिंट्या, बंड्या, चिंट्या अन् गण्या काही पत्रकार नव्हते. दिवसभर मोबाईलवर चकाट्या पिटत बसणारे ते ‘पदवीधर बेरोजगार’ होते. न घडलेल्या घटना ‘बे्रकिंग न्यूज’ म्हणून सोशल मीडियावर फिरविण्यात त्यांचा हातखंडा होता. आजपावेतो त्यांनी किती सेलिब्रेटीजना जिवंतपणी स्वर्गलोकी पाठविलेलं, याची गणतीच नव्हती.

पिंट्या, बंड्या, चिंट्या अन् गण्या काही पत्रकार नव्हते. दिवसभर मोबाईलवर चकाट्या पिटत बसणारे ते ‘पदवीधर बेरोजगार’ होते. न घडलेल्या घटना ‘बे्रकिंग न्यूज’ म्हणून सोशल मीडियावर फिरविण्यात त्यांचा हातखंडा होता. आजपावेतो त्यांनी किती सेलिब्रेटीजना जिवंतपणी स्वर्गलोकी पाठविलेलं, याची गणतीच नव्हती. कितीवेळा मंगळावरचे धोकादायक किरण शनी ग्रहामार्गे चंद्रावर परावर्तित होऊन पृथ्वीतलावर आणलेले, हेही त्यांना आठवत नव्हतं. मात्र, अंटार्क्टिकेचा बर्फ आटपाडीच्या माळरानावर टाकून त्यांनी माणदेशाला थेट अटलांटिका खंडावर वसविलेलं, एवढंच आठवत होतं.काल ‘फेक न्यूज कारवाई’चा इराणी आदेश निघताच या चौकडीची थोडीशी तंतरलेली. ‘मात्र, मुळात आपण अधिस्वीकृत नाही. पत्रकार म्हणून तर समाजाकडूनही स्वीकृत नाही,’ असं स्वत:च्या मनाला समजावत त्यांनी या घोषणेकडं दुर्लक्ष केलेलं.असो. सकाळी-सकाळी माहिती अन् प्रसारण खात्याकडनं त्यांना एक धक्कादायक मेसेज येताच चौघेही ताडकन् उडाले. ‘आजपर्यंत आपण सोशल मीडियावर केलेली सत्य पत्रकारिता पाहता आपल्याला ‘सच न्यूज’ पुरस्कार देण्यात येतोय,’ अशा आशयाचा मजकूर वाचताच चौघेही गोंधळले. आपण खऱ्या बातम्या कधी दिल्या, या विचारात त्यांनी ‘स्मृती’लाही ताण दिला. मात्र, काहीच आठवत नव्हतं.तेव्हा चौघेही तत्काळ नेहमीच्या कॉर्नरवरील कॅन्टीनच्या अड्ड्यावर जमले. आजपावेतो आपण कोणती खरीखुरी बातमी दिली, याची चर्चा करू लागले. सर्वप्रथम पिंट्या म्हणाला, ‘मी तर गेल्या आठवड्यात एकच न्यूज अपलोड केलेली यारऽऽ.. केवळ व्यंगचित्रातून अन् सभेतूनच आग ओकणारे ‘राज’ आता प्रत्यक्षात कामाला लागणार. महाराष्ट्राची जुनीपुराणी ब्ल्यू प्रिंट ‘अपडेट’ करून फेसबुकवर ‘अपलोड’ करणार, या माझ्या पोस्टला बाराशे लाईक अन् अडीचशे कमेंटस् पडल्या रेऽऽ.’गण्याही बोलू लागला, ‘थोरले काका बारामतीकर म्हणं यापुढं भावकी-भावकीत भांडणं न लावता एकीचं राजकारण करणार.. ही माझी पोस्ट सातारा, माण अन् अकलूजमंदी तर लई गर ऽऽ गर फिरली बग लगाऽऽ’बंड्या आपला किस्सा सांगू लागला, ‘आगामी अधिवेशनाची तारीख उद्धो फॉरेनहून आल्यानंतरच ठरणार. त्यामुळं सरकार मजबूत होणार. वैयक्तिक कामासाठीच्या भेटीनंतर मातोश्रीवरची भूमिका बदलली, अशी न्यूज मी फिरविताच घाटकोपरपेक्षा दादरमध्ये जास्त आनंद झाला.’चिंट्यानं मात्र शेवटचा बॉम्ब टाकला, ‘मी मात्र ‘नमो’ची पोस्ट टाकली होती बुवाऽऽ. त्यांचे सर्व सहकारी पुढील वर्षभर मौनव्रत धारण करणार असून, एकहीजण आपली भलती-सलती भूमिका जाहीर करणार नाही. सोशल मीडियावरील माझ्या या विरोधी पोस्टला त्यांच्या भक्तांनीही टार्गेट न करता उलट लोकशाहीतील मतांचा आदर केला,’हे सारं ऐकताच चौघांचंही एकमत झालं की आपण सोडलेलं पिल्लू कदाचित खरं वाटलं म्हणून की काय हा पुरस्कार दिला जातोय; पण हाय.. चौघांच्याही मोबाईलवर अकस्मातपणे ‘नमो’ आॅफिसमधून नवा मेसेज धडकला, ‘स्मृतीबार्इंकडून आलेला संदेश म्हणजे ‘फेक न्यूज’ होती बरं काऽऽ.’ 

टॅग्स :Fake Newsफेक न्यूजnewsबातम्याMediaमाध्यमेSocial Mediaसोशल मीडियाGovernmentसरकार