शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

बेरोजगारांची फॅक्टरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 03:22 IST

जगभरात तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. आपल्या देशातील तरुणांची संख्या ३५६ दशलक्ष असून, २६९ दशलक्ष तरुणांचा चीन दुस-या क्रमांकावर आहे. आमचे हे तरुण हाताला काम मिळत नसल्याने एकतर व्हॉटस् अ‍ॅपवर चॅटिंग करतात, फेसबुकवर फुकटचे सल्ले देण्यात वेळ दवडतात किंवा टीव्हीवर क्रिकेटच्या मायाजालात अडकून पडतात.

जगभरात तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. आपल्या देशातील तरुणांची संख्या ३५६ दशलक्ष असून, २६९ दशलक्ष तरुणांचा चीन दुस-या क्रमांकावर आहे. आमचे हे तरुण हाताला काम मिळत नसल्याने एकतर व्हॉटस् अ‍ॅपवर चॅटिंग करतात, फेसबुकवर फुकटचे सल्ले देण्यात वेळ दवडतात किंवा टीव्हीवर क्रिकेटच्या मायाजालात अडकून पडतात. स्पर्धेचे जग, खासगी कंपन्यांमधील अस्थिर वातावरण आणि लहानपणापासून मनावर बिंबविले गेलेले सरकारी नोकरीचे महत्त्व यामुळे अख्ख्या पिढ्या आपला उमेदीचा काळ स्पर्धा परीक्षेच्या तयारीत घालवितात. त्यांच्या हाती काय पडते, हे सध्या राज्यभरात निघणाºया विद्यार्थ्यांच्या मोर्चांनी दाखवून दिले आहे. शेतावर पोट भरत नाही आणि किमान पोट भरेल, एवढ्या पैशांची नोकरी कुठेच मिळत नाही. हीच या तरुणांची मुख्य अडचण आहे. कॉलेजेस वाढले. स्पर्धा वाढली. एकट्या मराठवाड्यात ३० अभियांत्रिकी महाविद्यालये आणि ७५ तंत्रनिकेतन संस्था आहेत. वर्षाला सहा हजार पदवीधारक आणि १६ हजार पदविकाधारक अभियंते बाहेर पडतात. काय होते त्यांचे? पाच-सहा हजारांची नोकरी मिळाली तरी बेहतर. काय करायचे या पदव्यांचे? बेरोजगारांची फॅक्टरी बनलेल्या या महाविद्यालयांचे? २०१४-१५ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार देशभरातील बेरोजगारीचा दर ४.९ टक्के होता. २०१५-१६ साली तो वाढून ५ टक्क्यांवर आला. २०१४ ची निवडणूक लढविताना मोदी सरकारने दरवर्षी एक कोटी रोजगार देणार असल्याचे आश्वासन दिले. एका खासगी सर्वेक्षणानुसार, २०१४ नंतर तीन वर्षांत केवळ १५ लाख रोजगार निर्मिती झाली. याउलट २०१४ च्या आधी तीन वर्षांत २५ लाख रोजगार निर्मिती झाली. १ मार्च २०१६ च्या आकडेवारीनुसार देशभरात शासकीय नोकºयांमधील ४ लाख १२ हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. या लोकसेवा आयोगाला वेळेचे काही देणेघेणेच राहिले नाही. जागांची जाहिरात काढायची पहिल्या वर्षी. परीक्षा घ्यायची दुसºया वर्षी. निकाल तिसºया वर्षी. पुढे एखादा कोर्टात जातो आणि पूर्ण प्रक्रियेवरच स्थगिती मिळवितो किंवा निकाल लागूनही आॅर्डर हाती पडत नाही. जुन्या जागा भरल्या जात नाहीत आणि नव्या निघत नाहीत. कुणी म्हणेल, ‘नोकरीच कशाला हवी? धंदापाणी करावा. मोक्याच्या ठिकाणी साधे पकोडे विकले तरी भरपूर कमाई होईल तरुणांची.’ मग पकोडेच विकायचे असतील, तर शिक्षणावर लाखोंचा खर्च करायचा कशासाठी?

टॅग्स :Indiaभारत