शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
2
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
3
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
4
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
5
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
6
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
7
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
8
Panchayat 3 Web Series: प्रधानजींचं घर, पाण्याची टाकी, जाणून घ्या कुठे आहे 'पंचायत'मधलं खरं गाव?
9
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
10
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
11
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
12
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
13
कोस्टल रोड सुरक्षित, बोगद्यात झिरपणारे पाणी रोखण्यात यश- मुंबई महानगरपालिका
14
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
15
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
16
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
17
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
18
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
19
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
20
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण

बिघडलेले गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 8:49 AM

भारतीय राजकारणाचा पोत वेगळा आहे.

- मिलिंद कुलकर्णी

भारतीय राजकारणाचा पोत वेगळा आहे. राष्ट्रीय राजकारण आणि प्रादेशिक राजकारणात तर मोठा फरक जाणवतो. एक नेता, एक प्रदेश अशी राजकीय रचना देशभरात दिसून येते. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, नवीन पटनायक, मुलायमसिंह यादव, मायावती, लालूप्रसाद यादव हे नेते आपल्या प्रदेशावर प्रभुत्व राखून आहेत. देशपातळीवर नेहरु, इंदिरा गांधी यांच्या नावाचा दबदबा होता. त्यानंतर प्रथमच २०१४ मध्ये नरेंद्र मोदी देशाच्या राजकीय क्षितीजावर वेगवान पध्दतीने झळकले. ‘अब की बार, मोदी सरकार’ ही घोषणा चार वर्षांपूर्वी मोठी लोकप्रिय झाली होती. त्यालाही कारण मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ‘गुजरात मॉडेल’चा मोठा गाजावाजा केला, त्याचा प्रभाव मतदारांपर्यंत पोहोचविण्यात आला, हे होते. ‘फील गुड’चा फुगा फुटल्यानंतर भाजपाने प्रसिध्दीविषयी खूप गांभीर्याने घेतले नव्हते. परंतु २०१४ मध्ये माध्यमक्रांतीचा पुरेपूर उपयोग भाजपा आणि मोदी यांनी करुन घेतला. गुजराथमध्ये जसा अभूतपूर्व बदल घडला, तसा मोदी पंतप्रधान झाल्यास देशभरात होईल, असे वातावरण तयार करण्यात भाजपा यशस्वी ठरला. ‘गुजरात मॉडेल’ फसवे आहे, युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचे हवाले देत काही अभ्यासक, तज्ज्ञांनी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु मोदी लाटेत हा प्रयत्न क्षीण ठरला. अमिताभ बच्चन, राज ठाकरे यांच्यासारखे तरुणांचे आयडॉल ‘गुजराथ मॉडेल’चे कौतुक करीत असताना वास्तवाकडे लक्ष द्यायला वेळ होता कुणाला? काळे धन आणणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार या लोकप्रिय घोषणा सामान्य भारतीयांना भावल्या. मात्र चार वर्षात पुरता भ्रमनिरास झाला आहे. चार वर्षात मोदींचे कौतुक आणि राहुल गांधींची टर उडविण्यात ‘नेटकरी’ आघाडीवर होते. आता चित्र बदलले आहे. मोदी हे सर्वाधिक टीकेचे धनी ठरत असून राहुल गांधी यांच्या उक्ती आणि कृतीकडे गांभीर्याने बघीतले जात आहे. मोदी यांची वेशभूषा, ‘मित्रों’ हे भाषणातील संबोधन, परदेश दौरे या बाबी सर्वाधिक टीकेच्या धनी ठरल्या. त्याउलट गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी असलेल्या शंकांना पूर्णविराम मिळाला आहे. निसटत्या पराभवातही विजय मानण्याची परिपक्वता आणि खऱ्या अर्थाने ‘सब का साथ, सबका विकास’ ही काँग्रेसची विचारधारा पुढे नेण्याचा त्यांचा संकल्प मतदारांना भावू लागला आहे. याचा अर्थ २०१९ मध्ये एकदम परिवर्तन घडेल, असे म्हणजे घाईचे होईल. परंतु मोदी यांची चार वर्षांची कारकिर्द आणि अटलबिहारी वाजपेयी यांची कारकिर्द निश्चित उजवी ठरते. बहुमत नसताना आणि जयललिता, ममता आणि समता ( दल) यांच्या त्रासाला सामोरे जात वाजपेयी यांनी परराष्ट्र धोरणापासून तर विकासाच्या वाटचालीपर्यंत चांगले कार्य केले. मुख्यत: जहाल गटाला त्यांनी मर्यादेत ठेवले होते. आता मोदी यांच्याकडे बहुमत आहे. नोटाबंदी, जीएसटी, रेरा यासारखे मोठे आर्थिक निर्णय लागोपाठ घेण्याचे धाडस त्यांनी दाखविले. परंतु काळे धन आणणे, रोजगारनिर्मिती करणे ही आश्वासने पूर्ण करण्यात सपशेल अपयश आले आहे. गोमांस बंदीसारख्या निर्णयानंतर दलित समाजाला गोरक्षकांकडून लक्ष्य केले जात असल्याच्या घटनांनी ‘सब का साथ, सबका विकास’ या घोषणेतील फोलपणा ठळकपणे पुढे आला आहे. राम मंदीर, काश्मिरातील ३७० कलम, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील बदल या विषयावरुन दावे-प्रतिदावे होत असल्याने समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही राज्यातील धार्मिक दंगली चिंतेचा विषय बनल्या आहेत. महागाई, बेरोजगारीसारखे प्रश्न गंभीर होत असताना धर्म, जात, प्रतिके या विषयांना घेऊन समाज रस्त्यावर उतरत आहे. सरकारच्या कामगिरीविषयी नाराज असलेले चंद्राबाबू, शिवसेना, गोरखा लँड सारखे मित्र पक्ष सरकारपासून दूर जाऊ लागले आहेत. शरद पवार, राज ठाकरे यांच्यासारखे मोदीप्रेमी आता प्रखर मोदीविरोधक बनले आहेत. सारे काही आलबेल नाही, असा संदेश या कृतीमधून जात आहे. काँग्रेसमुक्त भारताच्या भाजपाच्या घोषणेला सरसंघचालकांनी समर्थन न देता ‘मुक्त’ पेक्षा ‘युक्त’ला संघ महत्त्व देतो, असे म्हणत मोदी आणि भाजपाला सूचक इशारा दिला आहे. काँग्रेसच्या ६० वर्षांचा पाढा पुन्हा वाचण्यापेक्षा चार वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा मांडण्याकडे मोदी सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हे बिघडलेले गणित आणखी बिघडत जाणार आहे.