शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातले कैदीही पोलिसांना भारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:18 IST

Pakistan: आता पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवरूनही जगभरात पाकिस्तानचे वाभाडे काढले जात आहेत. पाकिस्तानच्या ज्या जेलमध्ये खतरनाक कैदी ठेवलेले आहेत तिथे सुरक्षा व्यवस्था काटेकोर आणि मजबूत असणं हे ओघानं आलंच, पण त्या ठिकाणीही पाकिस्तानी सुरक्षा व्यवस्थेचा हलगर्जीपणा दिसून येतो. 

दहशतवादाला सातत्यानं खतपाणी घातल्यानं, अतिरेक्यांना पोसल्यानं पाकिस्तानची जगभर छी-थू होतेच आहे; पण आता पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवरूनही जगभरात पाकिस्तानचे वाभाडे काढले जात आहेत. पाकिस्तानच्या ज्या जेलमध्ये खतरनाक कैदी ठेवलेले आहेत तिथे सुरक्षा व्यवस्था काटेकोर आणि मजबूत असणं हे ओघानं आलंच, पण त्या ठिकाणीही पाकिस्तानी सुरक्षा व्यवस्थेचा हलगर्जीपणा दिसून येतो. 

कराची येथील मालिर तुरुंगातून दोन जूनच्या रात्री तब्बल २१६ कैदी फरार झाले. विशेष म्हणजे हे कैदी तुरुंगातून पळून गेल्यानंतर तिथला हेड कॉन्स्टेबल राशीद चिंगारीही फरार झाला. कैद्यांना पळून जाण्यास मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या घटनेमुळे पाकिस्तान हादरलं असून, आयजीसह २३ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.  कैदी पळून गेल्यानंतर सिंध सरकारनं लगेच त्यांच्या अटकेचे आदेश दिले, पण अजून तरीही बरेच कैदी फरार आहेत. तुरुंगातून कैदी पळून जाण्याची ही घटना कराचीच्या तुरुंग इतिहासातली सर्वांत मोठी सुरक्षा चूक समजली जात आहे. त्यामुळेच तुरुंग सुरक्षा विभागाचे मोठमोठे अधिकारी आयजी, डीआयजी, सुपरिंटेंडंट.. इत्यादी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

तुरुंगातून इतके कैदी पळून गेल्यामुळे झालेली नाचक्की टाळण्यासाठी सिंध सरकारनं या कैद्यांनाच आमिषही दाखवलं होतं.. ‘तुरुंगातून तुम्ही पळून गेलात, पण २४ तासांच्या आत जर तुम्ही पुन्हा तुरुंगात आलात तर तुमच्यावर दया दाखवली जाईल, तुमच्यावर सक्त कारवाई केली जाणार नाही; पण पळून गेलेल्यांपैकी जे कैदी या काळात परत येणार नाहीत, त्यांना तुरुंग तोडून पलायन केल्याच्या आरोपाखाली अतिरिक्त सात वर्षांची शिक्षा दिली जाईल!  आणखी नामुष्कीची गोष्ट म्हणजे तुरुंगातून एवढे कैदी पळून गेले, पण तुरुंगात साधे सीसीटीव्हीदेखील नव्हते. तुरुंग अधिकाऱ्यांच्या मते, यामुळे नेमके कोणते कैदी, केव्हा पळून गेले, हे कळण्यातही अडचणी आल्या. 

..पण पाकिस्तानी तुरुंगांतून कैदी फरार होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही गेल्या वर्षी जुलैमध्ये पाकव्यात काश्मीरमधील रावळकोट तुरुंगातून १९ कैदी फरार झाले होते. त्यातील सहा जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या घटनेनंतरही पाकिस्तानचे वाभाडे निघाले होते. रविवारचा दिवस होता. दुपारचे अडीच वाजलेले. एका कैद्यानं पहारेकऱ्यालाच आपल्यासाठी लस्सी आणायला सांगितली, तीही त्याच्या बरॅकपर्यंत. पहारेकरी लस्सी घेऊन त्याच्या बरॅकपर्यंत येताच कैद्यानंच त्याची मानगुट दाबली. त्याची बंदूक हिसकावून त्याच्यावर ताणली. त्याच्याकडच्या तुरुंगाच्या चाव्याही हिसकावून घेतल्या. या चाव्यांद्वारे त्यानं स्वत:च्या बरॅकचं कुलूप तर उघडलंच, पण इतरही बरॅकची कुलुपं उघडून त्यातल्या कैद्यांचीही सुटका केली. नंतर सर्वजण पळून गेले. हे कैदी पळून जात असताना पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यानंतर त्यातील एक कैदी ठार झाला होता.

इतरही अशा अनेक घटना घडल्या आहेत, पण २०१२च्या घटनेनंही पाकिस्तानी सुरक्षेचं नाक कापलं गेलं होतं. त्यावेळीही तब्बल ४०० कैदी तुरुंगातून पळून गेले होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPrisonतुरुंगInternationalआंतरराष्ट्रीय