शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘एपस्टीन फाईल्स’: सत्तेचा माज अन् सेलेब्रिटींना ‘मसाज’; सत्तावर्तुळ, माध्यमांची भूमिका आणि न्यायव्यवस्थेची निष्पक्षता यांवर थेट प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 06:56 IST

‘एपस्टीन फाईल्स’ हे प्रकरण केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्यांपुरते मर्यादित नाही, तर ते प्रभावशाली सत्तावर्तुळ, माध्यमांची भूमिका आणि न्यायव्यवस्थेची निष्पक्षता यांवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करते.

रवि टाले

कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

एपस्टीन फाईल्स! जगभरात हा शब्दप्रयोग गेल्या काही वर्षांपासून प्रचंड चर्चेत आहे; परंतु या शब्दाभोवती जितकी उत्सुकता आणि गूढता आहे, तितकीच गैरसमजांचीही गर्दी आहे. प्रत्यक्षात ‘एपस्टीन फाईल्स’ नावाची कोणतीही अधिकृत यादी अस्तित्वात नाही. अमेरिकेतील विविध न्यायालयीन कागदपत्रे, साक्षी, उड्डाण नोंदी, संपर्क पुस्तिका व तपासातील काही कागदपत्रे सार्वजनिक झाल्यानंतर, प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांनी त्या सर्व संचाला एकत्रितपणे ‘एपस्टीन फाईल्स’ असे नाव दिले.

जेफ्री एपस्टीन अमेरिकेतील उच्चभ्रू आर्थिक वर्तुळात वावरणारी व्यक्ती! त्याचे जगभरातील राजकारणी, उद्योगपती, शास्त्रज्ञ, सेलिब्रिटींशी संबंध होते. एपस्टीन आणि त्याच्या सहकाऱ्यांवर, १४ ते १७ वयोगटातील मुलींना ‘मसाज’ किंवा ‘मॉडेलिंग’च्या नावाखाली बोलावून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाले.

या प्रकरणातील काही पीडितांनी सांगितले की, त्यांना इतर मुली आणण्यासाठी पैसे देण्यात येत होते. न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन येथील आलिशान टाउनहाऊस, फ्लोरिडातील पाम बीच येथील मालमत्ता, न्यू मेक्सिकोतील रँच आणि यूएस व्हर्जिन आयलंड्समधील लिटल सेंट जेम्स या खासगी बेटावर, एपस्टीन जगभरातील विविध क्षेत्रांतील बड्या-बड्या व्यक्तींसाठी सामाजिक मेजवान्या, खासगी बैठकी, तसेच कथित ‘निधी संकलन कार्यक्रम’ आणि ‘बौद्धिक चर्चा’ आयोजित करत असे. यामध्ये त्या अल्पवयीन मुलींचा सहभाग असे.

एपस्टीनकडे होते स्वतःचे विमान, त्याच विमानातून बड्या लोकांनी केला प्रवास

एपस्टीनकडे स्वतःचे विमान होते. त्या विमानाने कोणकोणत्या लोकांनी प्रवास केला याच्या तारीखनिहाय नोंदी न्यायालयीन प्रक्रियेत समोर आल्या. त्यामध्ये काही प्रभावशाली राजकारणी, उद्योगपती, शास्त्रज्ञ आणि सेलिब्रिटींची नावे प्रवासी म्हणून आहेत.

या प्रकरणी पहिली तक्रार २००५ मध्ये नोंदवली गेली. फ्लोरिडातील पाम बीच येथे एका अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिस तपासात इतर मुलींच्या साक्षी मिळू लागल्या. त्यावरून आरोपांचा नमुना स्पष्ट झाला. ‘मसाज’च्या नावाखाली बोलावणे, पैसे देणे आणि इतर मुली आणण्यास प्रवृत्त करणे!

या टप्प्यावर प्रकरण गंभीर होते; पण पुढे ते वादग्रस्त वळणावर गेले. या प्रकरणी एपस्टीनवर २००८ मध्ये कारवाई झाली; मात्र त्याला मिळालेला ‘सौम्य करार’ (प्ली डील) वादग्रस्त ठरला. त्यानंतर २०१९ मध्ये त्याला पुन्हा अटक झाली आणि तुरुंगात असतानाच त्याचा मृत्यू झाला. अधिकृतरीत्या त्याच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असे नोंदवले गेले; पण त्यावर अनेक शंका उपस्थित झाल्या. तरीही या उल्लेखांमुळे ‘जागतिक एलिट नेटवर्क’मधील व्यक्ती आणि सत्ताधाऱ्यांवरील अविश्वास वाढला आहे, हे मात्र निश्चित!

एपस्टीन प्रकरणात न्यायालयीन साक्षी, विमान उड्डाण नोंदी, संपर्क क्रमांक व ईमेल आणि सीलबंद तपास नोंदी अशा प्रकारची कागदपत्रे समोर आली. या कागदपत्रांमध्ये कोणत्या बड्या व्यक्तींची नावे आहेत, यासंदर्भात जगभर प्रचंड उत्सुकता आहे; पण इथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे, की त्या कागदपत्रांमध्ये एखाद्याचे नाव आहे, म्हणजे त्या व्यक्तीने गुन्हा केला, असे सिद्ध होत नाही.

बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प, प्रिन्स अँड्रू अशा काही प्रसिद्ध व्यक्तींची नावे त्या कागदपत्रांत असल्याची चर्चा झाली. काही भारतीयांची नावेही समाजमाध्यमांतून चघळली जात आहेत. ज्यांची ज्यांची नावे समोर आली, त्यापैकी काहींनी आरोप नाकारले, तर काही प्रकरणांत नागरी समझोते झाले; परंतु कोणाचाही दोष अद्याप तरी सिद्ध झालेला नाही.

भारताच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, दोन प्रवाह दिसतात. एकीकडे समाजमाध्यमांमधून अनेक अप्रमाणित याद्या व्हायरल झाल्या आणि त्यामध्ये काही बड्या भारतीय व्यक्तींची नावे असल्याचे दावे झाले.

दुसरीकडे भारतातील मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रे आणि वृत्त वाहिन्यांनी या प्रकरणाची माहिती दिली; पण अप्रमाणित याद्यांना प्रसिद्धी देण्याचे टाळले. अधिकृत न्यायालयीन नोंदींमध्ये भारतीय नागरिकांविरुद्ध ठोस गुन्हेगारी आरोप सिद्ध झाल्याचे कोणतेही विश्वसनीय पुरावे उपलब्ध नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Epstein Files: Power, Celebrities, and Questions of Justice Arise.

Web Summary : The Epstein files reveal allegations of sexual abuse involving powerful figures. While names circulate, no guilt is proven. Indian media avoids unverified lists, focusing on confirmed legal records.