शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

एका थराराची समाप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:19 IST

तब्बल महिनाभर सुरू असलेल्या जागतिक फुटबॉलचा थरार रविवारी संपला. या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण जगावर फुटबॉल ज्वर चढला होता.

तब्बल महिनाभर सुरू असलेल्या जागतिक फुटबॉलचा थरार रविवारी संपला. या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण जगावर फुटबॉल ज्वर चढला होता. अनेक धक्कादायक निकाल यंदाच्या स्पर्धेत लागले असले तरी यंदाची स्पर्धा आतापर्यंतची सर्वात अटीतटीचीही ठरली. विशेष म्हणजे ज्या संघांकडून फारशा अपेक्षा ठेवल्या जात नव्हत्या त्या संघांनी चक्क बाद फेरीत धडक मारताना बलाढ्य संघांना बाहेरचा रस्ता दाखवला. यावरूनच जागतिक फुटबॉल किती उच्च स्तरावर पोहचले याची प्रचिती येते. महिनाभरापूर्वी कुणाच्याही खिजगणतीत नसलेल्या फ्रान्सने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवणे काहीसे आश्चर्यकारक असले तरी अनपेक्षित मात्र नव्हते. गेल्या दशकात या खेळातल्या एकंदर व्यूहरचनेत झपाट्याने झालेल्या बदलांची फलश्रुती केवळ या अंतिम सामन्यातच नव्हे तर स्पर्धेच्या पहिल्याच दिवसापासून दिसू लागली होती. एखाद्या नामचीन आणि अर्थातच कुशल खेळाडूभोवती संघाचा संपूर्ण खेळ बेतणाऱ्या संघावर उपउपांत्य फेरीपर्यंत कसेबसे जात मग माघार घेण्याची नामुष्की आली. लियोनेल मेस्सीचा अर्जेंटिना, ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल किंवा नेमारचा बलाढ्य ब्राझील ही याची ठळक उदाहरणे. आघाडीच्या फळीत खेळणाºया आपल्या स्टार खेळाडूला केंद्रस्थानी ठेवून या संघांच्या डावपेचांची रचना करण्यात आली होती. तिला प्रत्युत्तर देताना अन्य संघांनी या स्टार खेळाडंूना जखडून ठेवण्याची आणि त्याचबरोबर संधी मिळताच आपल्या आक्रमणाचे रूपांतर आघाडी मिळवण्यात करण्याची नीती अवलंबिली. या स्पर्धेतील उपविजेता क्रोएशिया, स्वीडन आणि बेल्जियमचे संघ काही तरी अकल्पित करून दाखवतील अशी अटकळ काही तज्ज्ञ व्यक्त करीत होते. या संघांचा बचावावर आधारलेला खेळ संधी मिळाल्यावर क्षणार्धात आक्रमकतेत परिवर्तित व्हायचा. सुसाट खेळासाठी परिचित असलेल्या उरुग्वे, ब्राझील, पेरू, अर्जेंटिना, कोलंबिया या लॅटिन अमेरिकन संघांना हे डावपेच भारी पडले. याचे एक कारण हेही आहे की, फुटबॉलचा केंद्रबिंदू आता युरोपकडे सरकलेला आहे. या केंद्रबिंदूत आहे ते अब्जावधींची उलाढाल असलेले क्लब स्तरावरचे फुटबॉल. ही उलाढाल अविश्वसनीय मोल देऊन खेळाडू विकत घेत असते. तिला अपयश मान्य नसते. त्यातून बेफाम फुटबॉलच्या डावपेचांना आवरून घेणारी संयत व्यूहरचना आकारास आली. ही व्यूहरचना आधी आपली बाजू सुरक्षित करते आणि मग प्रतिस्पर्ध्यांच्या रचनेतील कच्चे दुवे शोधते. रोनाल्डो, मेस्सी वा नेमारच्या यशात तिचा वाटा मोलाचा राहिला आहे. तिच्यात आघाडीच्या फळीइतकेच महत्त्व मध्य आणि बचावफळीला असते. मात्र देशाचा संघ घडवताना प्रशिक्षकांवर प्रचंड मर्यादा येत असतात. परिणामी उपांत्य फेरीत खेळलेले चारही संघ एकाच खंडातले निघाले. फुटबॉलला पेले ते मॅराडोना या मन्वंतरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया गेली दोन दशके सुरु होती; ती आता अंतिम टप्प्यात आली आहे, असेच या स्पर्धेतील उपांत्य फेरी व अंतिम सामना सुचवतो. या प्रक्रियेत आफ्रिका आणि आशिया या खंडांचेही महत्त्वाचे योगदान आहे. उर्वरित जगाबरोबर भारतालाही विश्वचषक स्पर्धेचा ज्वर चढला होता. लाखो भारतीयांनी रात्र जागवत ही स्पर्धा पाहिली. ‘मेरी दुसरी कन्ट्री’ म्हणत एकेका देशाला समर्थन दिले. पण सव्वाशे कोटींच्या या देशाला इतरांसाठी टाळ््या वाजवण्यावरच समाधान मानावे लागते आहे. जागतिक क्रमवारीतले आपले आजचे स्थान आहे ९७ वे. जपान, दक्षिण कोरिया, चीन, इराण, सौदी अरेबिया यासारखे आशियायी देश आपली अमीट छाप खेळावर सोडत असताना आपण मात्र आपल्याच पायात पाय घालून पडल्यासारखे पिछाडीवर आहोत. क्रिकेटच्या भावविश्वात रमलेल्या भारतीयांना आता फुटबॉलचा थरार समजला आहे. वेळ आहे ती या थरारमध्ये भारतीय तरुण किती लवकर उतरतो याची. त्यासाठी अंतिम सामन्यात धडकलेल्या छोट्या क्रोएशियाचे उदाहरण पुरेसे ठरेल, हे नक्की.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Franceफ्रान्सCroatiaक्रोएशिया