शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

श्रमाला मिळाली प्रतिष्ठा, गावे झाली पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 05:40 IST

कुदळ-फावडे खांद्यावर घेऊन मोलमजुरी करणाऱ्या मजुरांना मुलगी द्यायची म्हणजे हजार वेळा विचार करणारी मंडळी असताना याच कुदळ-फावड्याने गेल्या

कुदळ-फावडे खांद्यावर घेऊन मोलमजुरी करणाऱ्या मजुरांना मुलगी द्यायची म्हणजे हजार वेळा विचार करणारी मंडळी असताना याच कुदळ-फावड्याने गेल्या तीन वर्षात कोट्यवधी लिटर पाणी गोळा करून राज्याची तहान भागवण्यात मोलाची कामगिरी केली आहे. त्यांच्या श्रमाला खºया अर्थाने प्रतिष्ठा मिळाली असून आता सामूहिक श्रमदानाशिवाय पर्याय नसल्याचे दिग्गजांनाही पटले आहे. दुष्काळाने होरपळणाºया अन् शेतकºयांच्या आत्महत्येने विव्हळणाºया राज्याला दुष्काळातून मुक्त करण्यासाठी श्रमदानाच्या माध्यमातून एक वेगळा मार्ग सापडला आहे.सरकारने पाणी अडवणे व जिरवण्याबरोबर मोठी धरणे बांधून जलसिंचनावर अब्जावधी रुपये खर्च केले तरी शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र चालूच राहिले होते. दुष्काळात होरपळणाºया शेतकºयाला वाचवण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची गरज होती. हिवरेबाजारसारखे गाव केवळ एकीमुळे दुष्काळमुक्त होऊ शकते तर इतर का नाहीत? असा प्रश्न पडतो. हिंदी चित्रपट अभिनेता अमिर खान, सत्यजित भटकर या मंडळीनी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेऊन गावागावात श्रमाचे अन् एकीचे महत्त्व पटवून दिले. गावागावातील लोकांना यात सहभागी करून घेतले. मोजक्या लोकांना प्रशिक्षण देऊन २०१६ साली सुरू करण्यात आलेल्या या चळवळीमध्ये पहिल्या वर्षी केवळ तीन तालुक्यातील ११६ गावांनी सहभाग घेतला होता. पहिल्याच वर्षी १३६८ कोटी लिटर पाणी गोळा करण्यात या चळवळीला यश आले. पाणलोट क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे महसुली अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी माण खटाव तालुक्यात या क्षेत्रात मोठे काम केले आहे. साताºयाचे डॉ. अविनाश पोळ हे गेली २२ वर्षे याच क्षेत्रात जनजागृती करत आहेत. वॉटर कप स्पर्धेचे ते राज्य समन्वयक आहेत.गावागावात सुरू असलेलं काम अन् काम करणारी मंडळी आणि प्रत्यक्ष झालेला लाभ पाहून इतर गावांनाही या चळवळीचे महत्त्व पटले आणि गावेच्या गावे या चळवळीकडे आकृष्ट होऊ लागली आहेत. प्रशिक्षण घेण्यासाठी कार्यकर्ते फाऊंडेशनकडे धावू लागले.मागच्या वर्षी ३० तालुक्यातील १३२१ गावांमधील ६००० कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण घेऊन कार्यक्रम राबवला. दररोज ६५००० लोकश्रमदानात सहभागी होत होते. स्वत: अमिर खान व पत्नी किरण राव हातात फावडे घेत असल्याने गावागावातील सर्व थरातील लोक आपापल्या घरातून कुदळ-फावडे घेऊन कामाला लागले. त्याचा परिणाम असा झाला गेल्या तीन वर्षात श्रमदान करण्यासाठी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, सरकारी कर्मचारी, डॉक्टर मंडळी, चित्रपट अभिनेते, विविध स्वयंसेवी संघटना समूह सहभागी होऊ लागली आहेत. श्रम करण्यात प्रत्येकाला वेगळा अभिमान वाटू लागला. त्यामुळे गतवर्षी ८२१६ कोटी लिटर पाणीसाठा करण्यात चळवळीला यश आले.यावर्षी या चळवळीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून ७५ तालुक्यातील ४०२५ गावांनी यात सहभाग नोंदवला आहे. या गावातील २० हजार कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण घेतले. ८ एप्रिल ते २२ मे पर्यंत चाललेल्या या मोहिमेचे अद्याप मोजमाप झालेले नाही. तरीही श्रमकºयांनी बदलाचे ‘तुफान आलंया’ हा संदेश मात्र दिला आहे.-बाळासाहेब बोचरे