शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?

By सोमनाथ खताळ | Updated: June 15, 2025 07:47 IST

ऊसतोडीला जाण्यापूर्वी बीड जिल्ह्यातील ८४३ महिलांनी गर्भपिशवी काढल्याचे सत्य उजेडात आले.

सोमनाथ खताळ, उपसंपादक, लोकमत न्यूज नेटवर्क: ऊसतोडीला जाण्यापूर्वी बीड जिल्ह्यातील ८४३ महिलांनी गर्भपिशवी काढल्याचे सत्य उजेडात आले. प्रशासनाने मात्र हा आकडा एका हंगामातील नसल्याचा दावा केला आहे; पण या महिलांवर गर्भपिशवी काढण्याची वेळ का येते? त्यामागे नेमके कोणते कारण आहे? याचे स्पष्टीकरण मात्र सरकारी आरोग्य विभागाने दिलेले नाही.

सोमनाथ खताळ, उपसंपादक: ९ एप्रिल २०१९चा दिवस. बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर महिलांची गर्भपिशवी काढल्याचे आढळले होते. त्यानंतर शासन, प्रशासन खडबडून जागे झाले. सहकार आयुक्त, आरोग्य विभाग, कामगार विभाग आदींची बैठक घेण्यात आली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखालील तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांचा समावेश असलेली एक समिती बीडला आली आणि महिलांशी संवाद साधला. सर्वेक्षण केले. त्यातून १३ हजार महिलांवर गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रिया झाल्याचे सत्य उघडकीस आले होते. त्यानंतर कोणत्याही महिलेची गर्भपिशवी काढायची असेल, तर जिल्हा शल्य चिकित्सकांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले. परंतु हा ‘प्रकार’ काही केल्या थांबत नसल्याचे पुन्हा एकदा गेल्या आठवड्यात उघड झाले आहे. 

बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा. दरवर्षी पावणे दोन लाख मजूर सांगली, सातारा, कोल्हापूर कर्नाटक राज्यात जात असतात. परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्यापुढे ऊसतोडीशिवाय पर्याय नाही. ऊसतोडीत एका व्यक्तीला अर्धा, तर जोडीला पूर्ण कोयता समजला जातो. 

या जोडीला उचल म्हणून कारखान्याला जाण्यापूर्वी १ ते ३ लाख रुपये दिले जातात. कारखान्यावरून परत आल्यावर मजुरीचे पैसे वगळून इतर सर्व रक्कम मुकादमाला परत करावी लागते. ही रक्कम परत करण्याची वेळ येऊ नये, यासाठी हे मजूर, ऊन-वारा-थंडी यांचा विचार न करता दिवस-रात्र १४ ते १६ तास घाम गाळतात. त्यातून एका व्यक्तीला ३०० ते ४०० रुपये मिळतात. 

कमी पैसे मिळत असले, तरी अनेक दिवस सलग काम असल्याने हे मजूर ऊसतोडीला जातात. सहा महिने ऊसतोडणी केल्यानंतर त्यातून मिळालेल्या मजुरीवर त्यांचे वर्षाचे आर्थिक गणित अवलंबून असते. त्याच मजुरीतून मुलांचे शिक्षण, घरखर्च, औषधोपचार आदी खर्च भागवले जातात. 

या ऊसतोड मजूर महिलांमध्ये गर्भवतीही असतात. तर, काही ओल्या बाळंतीणी असतात. त्या तान्हुल्याला पाचटाच्या आडोशाला ठेवून काम करतात. सुट्टी घेतली, तर एक दिवसाचा रोजगार बुडतो. तो बुडू नये यासाठी त्यांची धडपड असते. तर, दुसऱ्या बाजूला मासिक पाळीत त्रास होत असतानाही काही महिला काम करतात. ऊसतोडीच्या ठिकाणी राहण्याची सोय नसणे, अस्वच्छता असते, शौचालय, स्वच्छतागृहे आदी सुविधा नसतात. त्यामुळे त्यांना अतिरक्तस्राव, पोटात दुखणे, अंगावरून जाणे यांसह अन्य आजार जडतात. 

एक दिवसही खाडा पडू  नये म्हणून टोकाचे पाऊल -एक दिवस जरी आराम केला, तरी मुकादम खाडा मारतो. हाच खाडा पडू नये, यासाठी काही महिला गर्भपिशवीच काढून टाकण्याचा टोकाचा निर्णय घेतात, असे २०१९ मध्येच निदर्शनास आले होते. परंतु पुन्हा एकदा असाच प्रकार उघड झाल्यानंतर नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. पण, आता ज्या ८४३ महिलांनी गर्भपिशवी काढली आहे त्यांना आरोग्य विभागाने परवानगी दिली होती का? असा प्रश्न उपस्थित होतो. 

- याबाबतीत प्रशासन आणि आरोग्य विभागाने या शस्त्रक्रियांपैकी २६७ शस्त्रक्रिया  २०१९ नंतर तर उर्वरित ५७६ त्यापूर्वी झाल्याचा दावा केला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की २६७ पैकी २६० शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयांत झालेल्या आहेत.  जिल्ह्यात १७ अद्ययावत शासकीय आरोग्य संस्था असतानाही ४०० रुपयांत १६ तास जनावरांप्रमाणे राबणाऱ्या महिला २५ ते ४० हजार रुपये खर्च करून खासगी रुग्णालयात कशा जातील?

- रुग्णांनी उपचार कोठे घ्यावेत, हा त्यांचा अधिकार. पण, शासकीय रुग्णालयांमध्ये केवळ ७ शस्त्रक्रिया होत असतील, तर याबाबतीत आत्मचिंतनाची गरज आहे. आरोग्य विभाग आणि प्रशासन याची दखल कधी घेणार? तर दुसऱ्या बाजूला पाच महिने किंवा त्यापेक्षा जास्त महिन्यांच्या गर्भवतीला ऊसतोडीचे काम देऊ नका आणि दिले तर मुकादम आणि कारखान्यांवर कारवाई करा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. परंतु, आता आगामी हंगामात याची अंमलबजावणी होते की, हा न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होते, ते दिसेलच.

टॅग्स :BeedबीडMaharashtraमहाराष्ट्र