शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

भावी डॉक्टरांसाठी कोरोनाने दिलेले नवीन धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 08:34 IST

वैद्यकीय शिक्षण आरोग्य सेवेशी संलग्न करून प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षणावर भर दिला पाहिजे. वैद्यकीय सेवेच्या व्यवस्थापनाचा अभ्यासक्रमात समावेश झाला पाहिजे.

ठळक मुद्देवैद्यकीय शिक्षण आरोग्य सेवेशी संलग्न करून प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षणावर भर दिला पाहिजे. वैद्यकीय सेवेच्या व्यवस्थापनाचा अभ्यासक्रमात समावेश झाला पाहिजे.

डॉ. राजीव येरवडेकर, अधिष्ठाता, आरोग्यविज्ञान शाखा, सिम्बायोसिस कोविड महामारी किंवा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कुठलीही आपत्ती आल्यास वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालये यांचे कार्य एकमेकांशी काही प्रमाणात संलग्न असते. आरोग्यासंबंधीच्या प्रबोधनकारक उपक्रमांमध्ये या दोघांचाही महत्त्वाचा वाटा आहे. संसर्गजन्य साथींच्या काळात आजाराची सखोल माहिती, त्याचा प्रसार, उपचार आणि प्रतिबंध कसा करावा याबाबत तज्ज्ञांमार्फत माहिती देणे गरजेचे असते. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी पुढाकार घेतला पाहिजे. साध्या सोप्या भाषेत अशी माहिती पोहचविण्याची कामगिरी पार पाडून  जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तंबाखू व्यसन व धूम्रपानाला आळा घालण्यात मोठे यश संपादन केले आहे. प्रथम जागतिक आरोग्य संघटनेने धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे, असे विधान प्रसिद्ध केले. त्यानंतर धूम्रपानामुळे कर्करोग होऊ शकतो, असा उत्तरार्ध सांगितला. तरीदेखील धूम्रपानाचे प्रमाण फारसे कमी झाले नाही. शेवटी WHO ने ‘शॉक कम्युनिकेशन’ या सिद्धांतानुसार “smoking kills” असे घोषवाक्य प्रसारित केले.  प्रभावशाली संवाद कौशल्याचा वापर करून ध्येय साध्य केलेले हे महत्त्वाचे उदाहरण आहे. वैद्यकीय महाविद्यालये या आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण करणाऱ्या संस्था आहेत.  सध्या प्रचलित असलेल्या शिक्षण पद्धतीमध्ये वैद्यकीय आणि परिचारिका शिक्षणात ‘मेमरी रिकॉल’ आणि ‘पाठांतर’ यावर जास्त लक्ष केंद्रित केले जाते. वैद्यकीय शिक्षण आरोग्य सेवेशी संलग्न करून प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षणावर भर दिला पाहिजे.  वैद्यकीय सेवेच्या व्यवस्थापनाचा अभ्यासक्रमात समावेश झाला पाहिजे.

नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) ने AETCOM module म्हणजेच Attitude, Ethics and Communication skills हा उपक्रम दोन वर्षांपासून अमलात आणलेला आहे.   त्यामध्ये चार टप्पे आहेत : Know, Know How, Show, Show How and Actually Perform - हे किती महत्त्वाचे आहे, याचे भान कोविडने दिले. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न  असलेल्या रुग्णालयांना कोरोनादरम्यान रुग्ण सेवा उपलब्ध करणे बंधनकारक केले पाहिजे; कारण असा प्रात्यक्षिक अनुभव आणि सामाजिक आरोग्याच्या व्यवस्थापनाचे  बारकावे समजून घेण्याची संधी क्वचितच मिळते. 

आजचा विद्यार्थी व रुग्ण दोघेही तंत्रज्ञान पारंगत असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवेत टेलिमेडिसीन, अप्लाइड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाऊड कम्पुटिंगचे महत्त्व व उपयुक्तता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. Simulation Clinical Experience मध्ये आजाराचं सिम्युलेशन करून आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. देहदानाचे प्रमाण कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शवविच्छेदनाचा अनुभव मिळणे कमी होत आहे, म्हणून Anatomage यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने virtual desection (आभासी शवविच्छेदन) करता येते. अर्थात विद्यार्थ्यांना रुणालयात मिळणाऱ्या प्रदीर्घ अनुभवाची जागा हे शिक्षण घेऊ शकत नाही. शिक्षण संपल्यावर रुग्णाशी नाते कसे प्रस्थापित करावे यावर भर देण्याची गरज आहे.

वैद्यकीय शिक्षण कमी खर्चिक व्हावे, यासाठी  शासकीय धोरणामध्ये काही आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे.  साधनसामग्री, उपकरणे आणि  मनुष्यबळाबाबतचे नियम सध्याच्या कठीण परिस्थितीत लवचीक करता येऊ शकतील. चीन, रशिया  किंवा इतर परदेशी राष्ट्रांमधून  प्रशिक्षित झालेल्या   डॉक्टरांना भारतात रुग्णसेवा करण्याच्या परवान्यासाठी द्यावी लागणारी  परीक्षा (Foreign Medical Graduate Examination) अधिक वेळा घेतल्यास मोठ्या संख्येने डॉक्टर उपलब्ध होऊ शकतील. अनेक विकसनशील देशांनी प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर जास्त भर दिला आहे.  भारतात देखील आपण प्राथमिक आरोग्य सेवेवर जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे. आरोग्यसेवेसाठी सध्या राष्ट्रीय अंदाजपत्रकात १.२ टक्के इतके  अनुदान मिळते. हे प्रमाण अतिशय तुटपुंजे आहे. ते किमान ३ टक्क्यांवर गेले पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातील मूलभूत संशोधनासाठीसुद्धा पुरेसा निधी उपलब्ध असला पाहिजे. त्याची तातडीने तजवीज केली पाहिजे.

कोरोनाकाळात सर्वच खाजगी रुग्णालयांनी रुग्णांची अक्षरश: लूट केली, या सरसकट विधानाशी मी पूर्णपणे सहमत नाही. रुग्णालये चालवण्यासाठी मोठी  किंमत मोजावी लागते. रुग्णालयाची वास्तू, पाणी, वीज याचा खर्च, नवीन साधनसामग्री, देखभाल-दुरुस्ती, मनुष्यबळाचे वेतन, शासकीय / प्रशासकीय नियमावल्या या सगळ्यांतून वाट काढावी लागते. हे फार खर्चिक बनत चालले आहे. 

अर्थात, व्यावसायीकरण आणि बाजारीकरण यामध्ये फरक आहे. व्यावसायीकरण  गरजेचे आहे; पण बाजारीकरण मात्र होऊ नये.  अत्यंत कठीण, अडचणीच्या काळातून वाट काढत कोविडकाळात डॉक्टर्स आणि नर्सेस यांनी जी कामगिरी बजावली, तिला तोड नाही, हे कुणीही अमान्य करू शकणार नाही !

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलCigaretteसिगारेटWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाchinaचीनrussiaरशियाHealthआरोग्यEconomyअर्थव्यवस्था