शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

उद्दाम आणि मुद्दाम! चीन अंतर्गत असंतोषाने अस्वस्थ, म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 10:10 IST

पुतीन आणि जिनपिंग यांच्या विस्तारवादाचे भय अवघ्या जगापुढे आहे. कोणाचाही विरोध न जुमानता जिनपिंग यांनी आपला राज्याभिषेक करवून घेतला. ‘एकात्म चीन’ ही त्यांची आवडती घोषणा. त्यात तैवान येतो; तसा चीनचा दावा असणारा भारतीय भूभागही येतो.

चीनवर विश्वास ठेवणे कठीण आहे’ अशा आशयाचे विधान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच केले होते. त्याचा पुरावा पुन्हा मिळाला आहे. सीमेवर जोवर शांतता नाही, तोवर उभय देशांमध्ये कोणतेही संबंध विकसित होऊ शकत नाहीत, असेही जयशंकर म्हणाले होते. भारत आणि चीन हे परस्परांचे शेजारी. लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश हे भारत-चीन सीमेवरचे भारतीय प्रदेश. १९६२च्या युद्धानंतर या दोन देशांमधील प्रत्यक्ष ताबारेषा या क्षेत्रांमध्ये विभागली गेली. भारताचे भूराजकीय स्थान, लोकसंख्या, आंतरराष्ट्रीय पटलावरील महत्त्व आणि सर्वंकष क्षमता यामुळे भारताच्या विरोधात पाकिस्तानला बळ देण्याचा प्रयत्न चीनने सातत्याने सुरू ठेवला आहे. याचा अर्थ चीनचे सारे आलबेल सुरू आहे, असे नाही. सध्या तर चीन अंतर्गत असंतोषाने अस्वस्थ आहे. अशाच कालखंडात बाह्य आक्रमण करून स्थानिक मुद्यांवरून लक्ष विचलित करणे ही जिनपिंग यांची व्यूहरचना असू शकते.

पुतीन आणि जिनपिंग यांच्या विस्तारवादाचे भय अवघ्या जगापुढे आहे. कोणाचाही विरोध न जुमानता जिनपिंग यांनी आपला राज्याभिषेक करवून घेतला. ‘एकात्म चीन’ ही त्यांची आवडती घोषणा. त्यात तैवान येतो; तसा चीनचा दावा असणारा भारतीय भूभागही येतो. चीनमध्ये नुकतेच कम्युनिस्ट पक्षाचे  जे अधिवेशन झाले, त्या अधिवेशनात गलवान खोऱ्यामध्ये उडालेल्या चकमकीची फिल्म दाखवण्यात आली. जिनपिंग यांच्यासाठी भारत किती ‘महत्त्वाचा’ आहे, हे तेव्हाच सिद्ध झाले. दक्षिण आशियात भारत हा बलशाली देश आहे. मात्र, भारताच्या सोबत कोणताही देश असू नये, हा चीनचा प्रयत्न जुना आहे. भूतान हा भारताचा खात्रीचा मित्र. त्यामुळे चीनने भूतानलाही धमकावले. गेल्या आठवड्यातच ही माहिती उजेडात आली. काही दिवसांपूर्वी भारत आणि अमेरिकेच्या सैन्याने उत्तराखंडमधील औली येथे संयुक्त सराव केला. त्यावर चीनचा तीव्र आक्षेप होता. भारताकडे चीनचे बारकाईने लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर तवांगमध्ये भारत आणि चीनमध्ये झालेला सैन्यसंघर्ष नवा पेच निर्माण करणार आहे. लडाखमधील तणाव कायम असताना या संघर्षाने भारताची चिंता वाढली आहे. तवांगची प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडण्याचा प्रयत्न चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने केला. त्याला भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तरही दिले. अरुणाचलच्या तवांग क्षेत्रात प्रत्यक्ष ताबारेषेवरून काही ठिकाणी वाद आहेत. दोन्ही देशांचे सैनिक तिथे गस्त घालत आहेत. गेली दीड दशके हेच चित्र आहे.

भारत-चीनमध्ये असणारा ताण नवा नाही. मात्र, लडाखमधील गलवान खोऱ्यात अडीच वर्षांपूर्वीच्या संघर्षानंतरची ही अशी पहिलीच चकमक आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय लष्कराने तवांग परिसरात प्रत्यक्ष ताबारेषेजवळ बरीच जमवाजमव केली आहे. चीनही शांत बसलेला नाही. प्रत्यक्ष ताबारेषेच्या जवळ सरकण्याचा चीनचा प्रयत्न  सुरू आहेच. पश्चिम क्षेत्रामध्ये ताबारेषेचा भंग करण्याचा प्रयत्न चीनने अनेक वेळा केला आहे. आताचा हल्ला आकस्मिक नाही. तो पूर्वनियोजित असावा, असे दिसते. चीन योग्य वेळेची  वाट पाहत होता. ढगाळ वातावरण आणि बर्फवृष्टी यामुळे चीनला हा संघर्ष सोपा जाईल, असा आडाखा असणार. भारतीय सैनिकांनी हा हल्ला परतवून लावला. त्यामुळे मूळ चिंता मात्र संपलेली नाही. संसदेत या मुद्यावर मंगळवारी जी चर्चा झाली, ती पक्षीय स्वरूपाची आणि उथळ होती. राजकीय आरोप-प्रत्यारोप करून या प्रश्नाकडे पाहता येणार नाही. पंतप्रधान नेहरू असोत अथवा मोदी, चीन तेवढाच धोकादायक आहे. तरीही चीनशी संबंध, संवाद कायम ठेवण्याचे आव्हान आहे.

चीन हा सामरिक-राजकीय क्षेत्रांप्रमाणेच आर्थिक क्षेत्रातही आक्रमक धोरण राबवणारा देश आहे. चीनच्या विस्तारवादाचा भारत विरोधक आहे; पण दुसऱ्या बाजूला चीनवरचे आपले जे आर्थिक अवलंबित्व आहे, ते आपण पूर्णपणे झुगारून देऊ शकलेलो नाही. साठच्या दशकातील ‘हिंदी-चिनी भाई भाई’ हे खरे नाही, तसेच एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातले ‘चिंडिया’चे स्वप्नही खरे नाही. तरीही दोन्ही देश एकमेकांचे शत्रू होणे दोघांच्याही हिताचे नाही. अशावेळीच  राजकीय शहाणपणाची खरी परीक्षा असते. ‘जी-२०’ शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. या कार्यगटांच्या बैठका देशभर सुरू आहेत. अशावेळी उद्दाम चीन मुद्दाम या चकमकी घडवत असताना तर ही परीक्षा आणखी तातडीची झाली आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीन