शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कोठेवाडी ते तोंडोळी; महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 06:26 IST

गाव गोळा झाला तर महिलांच्या अब्रूला हात घालण्याची हिंमत कुणीच दाखवू शकत नाही. गाव सर्वार्थांनी पांगलेला आहे; म्हणून गुन्हेगारांचे फावते आहे.

दरोडेखोरांनी महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचारांमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील तोंडोळी वस्ती हादरली. दरोडेखोरांनी अगोदर घरातील पुरुषांचे हातपाय बांधले. त्यानंतर दोन महिलांवर सामूहिक अत्याचार केला. ते केवळ पैसे लुटून थांबले नाहीत, तर मायभगिनींना उद्ध्वस्त करून गेले. दरोडेखोरांचा हा असा काही पहिलाच हैदोस नव्हे. महिलांच्या अशाच असाहाय्य किंकाळ्या राज्यात नगर जिल्ह्यातील कोठेवाडी येथे २००१ साली ऐकायला मिळाल्या होत्या. कोठेवाडीतही दरोडेखोरांनी महिलांवर सामूहिक अत्याचार केले. त्या घटनेने ग्रामीण महाराष्ट्राची असुरक्षितता चव्हाट्यावर आली.  कोठेवाडी इतकी दुर्गम होती की, दरोड्यानंतर त्या हादरलेल्या वाडीला धीर देण्यासाठी तेथे  विशेष पोलीस चौकी सुरू करावी लागली. आता वीस वर्षांनंतर त्या घटनेतील आरोपी शिक्षा भोगून बाहेर आले. त्यातून ही वाडी आजही भेदरलेली आहे. तेथे सध्याही रोज पोलिसांचा बंदोबस्त आहे.

ग्रामीण भागात दरोड्यासारख्या गंभीर घटना व त्यात जे अत्याचार होतात, त्यांचे संबोधन म्हणून ‘कोठेवाडी’ समोर येते, एवढी ती घटना क्रूर होती. कोठेवाडी प्रकरणानंतर आपण काय धडा घेतला? हा प्रश्न तोंडोळीमुळे जिवंत झाला आहे. आता कदाचित आपले गृह खाते दावा करील की ‘आम्ही गुन्हेगारांचे धागेदोरे लवकरच शोधू’. पण, अशा धागेदोऱ्यांच्या गाठी बांधून नंतर पतंगबाजी करण्यात काय फायदा? अशा घटनांचे सामाजिक ऑडिट कधी होणार?  कोठेवाडी व तोंडोळीत एक साम्य आहे. या दोन्ही दरोड्यांच्या पूर्वी दरोडेखोरांनी मद्यप्राशन केले होते. म्हणजे त्यांच्या हाती शस्त्रे होती व मेंदूवर मद्याचा अंमल. पोलीस दरोडेखोरांची शस्त्रे जप्त करतात. पण, पोटातील दारूने त्यांना झिंगविले व पशू बनविले ती जबाबदारी कुणाची?
जुलै २०१६ साली कोपर्डीत शालेय मुलीवर अत्याचार झाला. त्यातून महाराष्ट्र पेटला. तेही आरोपी दारू प्यायलेले होते. म्हणजे एकप्रकारे दारू अत्याचाऱ्यांना पेटविते, गुन्ह्यांना जन्म देते. या महिलांवर दरोडेखोरांसोबत दारूनेही अत्याचार केला, असाही श्लेष यातून निघतो.  सरकारला दारूतून महसूल हवा आहे. पण, ‘दारू’ आणि गुन्हेगार यांची ‘सोयरिक’ सरकार तपासात नाही. दारू पिणे हा माणसांचा अधिकार असेल, तर त्यातून आपण बेताल व विकृत होणार नाही, सामाजिक हानी करणार नाही, याची हमी या दारुड्यांकडून घ्यायला हवी. दारू पिण्यासाठी व जवळ बाळगण्यासाठी  परवाना लागतो. दारूविक्रेते असा परवाना तपासत नाहीत व त्याची नोंदही ठेवत नाहीत. रेशनवरील ग्राहकांची नोंद आहे. मद्यप्यांची मात्र नाही. दारू पिऊन बेभान होणाऱ्या या ठगांची नोंद झाली तर अनेक गुन्हे तत्काळ उघडकीस येतील. गुन्हेगार जन्माला घालणाऱ्या अनेक कारणांपैकी दारू हेही एक कारण आहे; पण, सरकार त्यावर इलाज करायला तयार नाही.तोंडोळी खटला आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी होईल. हाही एक सोपस्कारच झाला आहे. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी म्हणून लाखोंचे मोर्चे निघाले. त्या प्रकरणात आजही तारीख पे तारीख सुरू आहे. न्यायालयांच्या तारखा वाढत आहेत, दुसरीकडे महिलांवरील अत्याचारही. वर्षानुवर्षे अत्याचारही कोर्टांच्या फायलींमध्ये निपचित पडून असतात. न्यायाचा पुकारा तेवढा सुरू असतो. गुन्हे घडले की समाज पोलिसांना दोष देतो; पण, सामाजिक ‘पोलिसिंग’ची जबाबदारी समाजही घेत नाही. नगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या गावाकडे ग्रामसुरक्षेसाठी एक टोल फ्री क्रमांक आहे. आपत्तीच्या प्रसंगी त्याद्वारे प्रत्येक गावकऱ्याच्या मोबाईलवर संदेश येतो. साधा डोंगर पेटला तर दहा मिनिटांत गाव गोळा होते. ‘ग्रामसुरक्षा यंत्रणा’ या संस्थेने साडेतीन हजार गावांत अशी सुविधा दिली आहे. सरकारने ही यंत्रणा प्रत्येक गावात कार्यान्वित करावी यासाठी या संस्थेने सरकारचे उंबरठे झिजविले. पण, तिची दखल घेतली गेली नाही.मोबाईल व इंटरनेटची संवाद यंत्रणा खेडोपाडी पसरलेली आहे. आपल्या ग्रामपंचायती ‘ई पंचायती’ असल्याचा डांगोरा पिटला जातो. मंदिर, मस्जिद व इतरही प्रार्थनास्थळांवर गावोगावी भोंगे आहेत. ही सर्व यंत्रणा आपत्तीच्या प्रसंगी व महिलांची अब्रू वाचविण्यासाठी गावाला हाळी का देत नाही?  गाव गोळा झाला तर महिलांच्या अब्रूला हात घालण्याची हिंमत कुणीच दाखवू शकत नाही. गाव सर्वार्थांनी पांगलेला आहे; म्हणून गुन्हेगारांचे फावते आहे.

टॅग्स :kopardi caseकोपर्डी खटला