शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 08:41 IST

आपल्या ‘कोल्हापुरी चपले’ची कहाणी आपण जगाला सांगणार नसू, तर मग तिला रॅम्पवर मिरविणाऱ्या ‘प्राडा’च्या नावाने बोंब ठोकण्याचा काय अधिकार?

भूषण कांबळे, संस्थापक, ‘वहाण’

एक-दोन दिवसांपूर्वी अचानक भराभर मेसेजेस येऊ लागले, सगळे एका पाश्चिमात्य ब्रांडबद्दल बोलत होते. - Prada. इथले-तिथले फोटो आणि व्हिडीओच्या भरमसाठ लिंक्स आलेल्या. सगळ्या फोटो-व्हिडीओमध्ये एक फॅशन शो सुरू आहे इटलीच्या मिलानमध्ये. प्रकाशानं भरलेल्या रॅम्पवर मॉडेल येतो. टी-शर्टवर टोपी आणि पायात एकदम ओळखीची लेदर अंगठा-पट्टी चप्पल. तिथून सगळ्या इतक्या साऱ्या मेसेजेसचा उलगडा व्हायला सुरुवात झाली. पहिला विचार काही आला असेल, तर हाच - ‘अरे, ही तर आपली कोल्हापुरी वहाण!’

पुढे उत्सुकतेने मग इंटरनेटवर शोधाशोध सुरू झाली. एकदम भारी वाटत होतं. आपली कोल्हापुरी मिलान फॅशन शोमध्ये पोहोचली! ‘प्राडा’सारख्या जगप्रसिद्ध ब्रँडने या कारागिरीची दखल घेतली. ऊर आनंदाने भरून आलेला. बराच वेळ आनंदाने शोधत होतो, पण कोल्हापुरी चपलेचं नावच कुठे दिसेना. हिरमोड झालाच म्हणा. ‘अरे, आमची कोल्हापुरी जगात भारी आहे, नाव घ्यायला लाजताय का?’ असं  प्राडाला   खडसावून विचारावंसं वाटलं. कोल्हापुरीचा उल्लेख कुठेच नाही. इंडिया नाही, कोल्हापूर तर नाहीच!

खूप मनाला लागलं. वाईट वाटलं. कारण, ते म्हणतात तसं - चामड्याची प्रत्येक फ्लॅट चप्पल म्हणजे कोल्हापुरी नसते. कित्येक वाकबगार कारागिरांच्या हाताची कसब असते कोल्हापुरी. पिढ्यान‌्पिढ्यांची परंपरा म्हणजे कोल्हापुरी. कुठेही पाहताच, लगेच ओळखू येते ही कोल्हापुरी. कोल्हापुरी चपलेला जीआय टॅग  २०१९ मध्ये मिळाला, तिची ओळख जागतिक झाली. पण प्राडाच्या रॅम्पवर ती  अजूनही बेनामी?

भारतामध्ये पहिल्यांदाच अस्सल कोल्हापुरीला ऑनलाइन जगात  आणण्याचा पाया रचताना, ‘वहाण’ या संकेतस्थळामुळे जगलो आहे ते कोल्हापुरी वेड. तेव्हा अशा आपल्या मोठ्या कलेच्या वारशाला कोणी ‘बेनामी फ्लॅट’ म्हणून मांडत असेल, तर थोडा (जास्तच) त्रास होतो.

माझ्या मते प्राडा चुकलं का? - अर्थातच! एवढा मोठा फॅशन  ब्रँड - त्याची एक नैतिक जबाबदारी नक्कीच होती. ज्या कलेचा आपण वापर करतोय, त्या कलेला क्रेडिट द्यायलाच हवं.

पण मग  आपलं काय? आज प्राडाच्या निमित्ताने कोल्हापुरी चपलेबद्दल अचानक जागृत झालेला जिव्हाळा, ही जाणीव एरवी कधी दिसते का? दाखवतो का आपण? प्राडाने कोल्हापुरीची किंमत १.२ लाख की काही केली, ही बातमी सांगताना एक न्यूज अँकर ओरडून ओरडून म्हणत होती, ‘अरे, ही चप्पल तर आमच्याकडे १५० ते ५०० रुपयांत मिळते!’ ते ऐकताना मला वाटलं, यात कसलं कौतुक? आपल्या कारागिरांनी हाताने घडविलेल्या कोल्हापुरीची किंमत आपल्याच लोकांना नाही, याचीच तर कबुली देतोय की आपण!

आपल्या ‘साध्या’ कोल्हापुरी चपलेला प्राडाने सव्वा लाख रुपयांचा प्राईस टॅग लावला म्हणून इतकी चर्चा करणाऱ्यांना हे माहिती आहे का, की अस्सल कोल्हापुरी बनायला किती दिवस लागतात? ती मशीनमेड नाही. ती पिढ्यानपिढ्यांनी अनुभवलेली, शिकलेली आणि जपलेली असते. ती फक्त वहाण नसते, ती इतिहासाची चालती सावली असते. आता  आपल्या कारागिरांची कोल्हापुरी विकली जात असेल दीड  लाखाला, तर  जाऊ दे की! काय मजा येईल!

आपल्या मातीतली कला म्हणून आपण मिरवायला हवीच आहे. हे वेड, ही जबाबदारी आहे आपल्या मातीच्या कलेची गोष्ट जगाला सांगण्याची. जर आपणच ती सांगणार नसू, तर मग प्राडाच्या नावाने बोंब ठोकण्याचा काय अधिकार आपल्याला?

शेवटी फक्त इतकंच : कोल्हापुरी चप्पल हा आपल्या संस्कृतीचा एक मौल्यवान वारसा आहे. आपल्या कारागिरांनी पिढ्यानपिढ्या जपलेला अमूल्य ठेवा आहे. प्राडासारखे ब्रँड जेव्हा उचलेगिरी करतात, तेव्हा त्यांना सांगावंसं वाटतं, ‘ही आमची कोल्हापुरी आहे; जी पिढ्यानपिढ्या कारागिरांच्या हातून दर्दी लोकांच्या हृदयावर राज्य करतेय. तेव्हा क्रेडिट हे मिळालंच पाहिजे!’

                bhushankamble90@gmail.com