शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
4
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
5
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
6
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
7
भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."
8
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
9
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
10
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
11
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
12
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
13
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
14
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
15
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
16
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
17
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती कृती भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
18
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
19
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
20
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा

आता अभियंत्यांसमोर तंत्रज्ञानाबरोबरच ‘नैतिक’ आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 05:46 IST

आधुनिक भारताच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख शिल्पकार सर विश्वेश्वरय्या यांच्या गौरवार्थ आज देशभर ‘अभियंता दिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्ताने..

डॉ. दीपक शिकारपूर

अभियंता व माहिती तंत्रज्ञान अभ्यासक

जगभरातील अभियांत्रिकी क्षेत्राचे स्वरूप सतत  बदलत आहे. विसाव्या शतकात अभियांत्रिकीने जगात मोठी क्रांती घडवून आणली. सुरुवातीला, हेन्री फोर्डच्या असेम्ब्ली लाईनमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य झाले. यामुळे गाड्या आणि इतर वस्तू स्वस्त झाल्या. यानंतर, नागरी अभियांत्रिकीने मोठे पूल, धरणे आणि गगनचुंबी इमारती बांधल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर, अणुऊर्जा आणि अवकाश संशोधनाला गती मिळाली.

मानवाला चंद्रावर पाठवणे, हे एक मोठे यश होते. शतकाच्या उत्तरार्धात, ट्रान्झिस्टर आणि मायक्रोप्रोसेसरच्या शोधाने डिजिटल युगाचा पाया रचला. २०००च्या दशकात, भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रात एक नवीन युग सुरू झाले. माहिती तंत्रज्ञान आणि संगणक अभियांत्रिकीच्या आगमनाने या क्षेत्राला नवीन दिशा मिळाली. भारताने सॉफ्टवेअर विकास, आउटसोर्सिंग आणि माहिती तंत्रज्ञान सेवांमध्ये जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केली. आयटी क्षेत्रात प्रचंड रोजगार संधी निर्माण झाल्या आणि इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार  आणि जैवतंत्रज्ञान  यांसारख्या नवीन शाखांचा विकास झाला. पारंपरिक अभियांत्रिकी शाखांमध्येही आधुनिकीकरण आणि ऑटोमेशनचा वापर वाढला. कामाची गती आणि गुणवत्ता सुधारली. या काळात, भारताने अनेक प्रकल्पांमध्ये (उदा.  मेट्रो रेल्वे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ) आपली तांत्रिक क्षमता दर्शविली.

सध्या, अभियांत्रिकी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, रोबोटिक्स, ड्रोन आणि सायबर सुरक्षा  यांसारख्या नवीन शाखांचा उदय झाला आहे. यामुळे केवळ पारंपरिक उद्योगांमध्येच नव्हे, तर आरोग्यसेवा, वित्त, मनोरंजन आणि कृषी क्षेत्रातदेखील अभियंत्यांची मागणी वाढली आहे. पारंपरिक अभियांत्रिकीच्या कल्पनाही बदलत आहेत. उत्पादन क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणामुळे स्मार्ट कारखाने स्वायत्त रोबोट्स, डेटा ॲनालिटिक्स आणि रिअल-टाइम मॉनिटरिंगसह सुसज्ज झाले आहेत. या घडामोडींमुळे केवळ उत्पादकता वाढली नाही तर मानवी चुका कमी झाल्या आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारली.

याचबरोबर इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि क्लाउड कंप्युटिंगसारख्या तंत्रज्ञानांनी उत्पादनांना आणि सेवांना जोडले. दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय शोधले जात आहेत. यामुळे, अभियंत्यांना केवळ तांत्रिक ज्ञानच नाही, तर व्यवस्थापन, संवाद आणि समस्या सोडवण्याचे कौशल्यदेखील आवश्यक झाले आहे.

भविष्यात, अभियांत्रिकी क्षेत्र अधिक वैयक्तिकृत  आणि शाश्वत  बनणार आहे. क्वांटम कंप्युटिंगसारख्या तंत्रज्ञानामुळे डेटा विश्लेषण आणि गणना (Computation) अधिक वेगाने शक्य होईल. बायोइंजिनिअरिंग  आणि नॅनो टेक्नॉलॉजी  या शाखांचा प्रभावी वापर मानवी आरोग्य सुधारण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केला जाईल. २०४० पर्यंत, रोबोटिक्स आणि ॲटोमेशन  अनेक उद्योगांमध्ये मानवी श्रमाची जागा घेतील, ज्यामुळे अभियंत्यांचे काम अधिक संशोधनात्मक आणि धोरणात्मक बनेल. ग्रीन एनर्जी  आणि सर्क्युलर इकॉनॉमी यांसारख्या संकल्पनांमुळे पर्यावरण अनुकूल उत्पादने आणि प्रक्रिया विकसित करण्यावर भर दिला जाईल. भविष्यातील अभियंत्यांना सायबर सुरक्षा आणि नैतिकता  यांसारख्या विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे, कारण तंत्रज्ञानाचा वापर मानवी जीवनावर थेट परिणाम करणार आहे.

भारतीय अभियांत्रिकी क्षेत्राचा प्रवास पारंपरिक ते आधुनिक आणि स्थानिक ते जागतिक असा राहिला आहे. भविष्यात, हे क्षेत्र केवळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीपुरते मर्यादित राहणार नाही, तर मानवी जीवनातील आव्हानांवर नावीन्यपूर्ण आणि नैतिक उपाय शोधण्याचे केंद्र बनेल. अभियंते हे तंत्रज्ञानाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्या  नवनवीन शोध व निर्मितीमुळे समाजाचे जीवनमान सुधारते. बदलत्या जमान्याची पावले ओळखून त्यानुसार स्वतःला बदलत राहणाऱ्या, नवनवीन कौशल्ये शिकत राहणाऱ्या आणि अर्थातच थोडा वेगळा ऊर्फ ‘हटके’ विचार करणाऱ्या अभियंत्यांना  कायम ‘अच्छे दिन’ येणार. गरज आहे ती मानसिकता बदलायची. आजच्या अभियांत्रिकी दिवसाचा हाच संदेश आहे.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स