शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय: तीन राज्यातला तमाशा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 07:33 IST

केंद्रात भाजप सत्तेवर आल्यापासून बहुमत नसताना विरोधी पक्षात फूट पाडणे किंवा विरोधी पक्षांच्या आमदारांना राजीनामे द्यायला लावून राज्यपालांच्या मदतीने स्वपक्षाचे सरकार स्थापन करण्याची पद्धत पडली. कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, बिहार आदी राज्यांत हे प्रयोग झाले.

भारतीय  राजकारणात पक्षांतर नवीन नाही. मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ आणि बहुमतासह सत्ताधारी पक्षानेच पक्षांतर केल्याची उदाहरणे आहेत. मध्यंतरीच्या काळात पक्षांतरबंदी कायद्याने थोडी वेसण घातली गेली. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यापासून बहुमत नसताना विरोधी पक्षात फूट पाडणे किंवा विरोधी पक्षांच्या आमदारांना राजीनामे द्यायला लावून राज्यपालांच्या मदतीने स्वपक्षाचे सरकार स्थापन करण्याची पद्धत पडली. कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, बिहार आदी राज्यांत हे प्रयोग झाले. अलीकडच्या काळात ज्या प्रदेशात भाजपचा विस्तार नाही, तेथे सत्ताधारी किंबहुना जनाधार असलेल्या पक्षातील आमदार-खासदार तसेच प्रभावी नेत्यांना आमिषे दाखवून पक्षांतर करायला भाग पाडले जाऊ लागले आहे.

आसामचे नवनियुक्त मुख्यमंत्री हेमंता बिस्वा हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालचे राजकारण पक्षांतरांमुळे बरेच गाजले होते. तृणमूल काँग्रेस पक्षाला नामोहरम करताना भाजपने असंख्य आमदारांना फोडले. त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. असे पूर्वाश्रमीचे तृणमूल काँग्रेसचे तेवीसजण भाजपकडून विधानसभेवर निवडूनही आले आहेत. सध्या उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सत्तारूढ पक्षांचा अपवादवगळता सर्वच राजकीय पक्षांतून पक्षांतरबंदी कायद्याला बगल देत दोनतृतीयांश संख्या जमवून पक्षांतर करण्याच्या हालचाली चालू आहेत. बिहारमधील लोकजनशक्ती पक्षामध्ये फूट पडली आहे. या फुटीस मुख्यमंत्री नीतिशकुमार आणि त्यांचा संयुक्त जनता दल पक्ष जबाबदार असल्याची चर्चा आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोकजनशक्तीचे एकमेव आमदार निवडून आले होते. त्यांना पक्षात घेण्यात आले आणि विधानसभेतील त्या पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आणले. ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांनी हा पक्ष स्थापन केला आहे. त्यांचे चिरंजीव चिराग पासवान, बंधू पशुपती पारस यांच्यासह लोकजनशक्तीचे सहा सदस्य लोकसभेत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा हा घटक पक्ष आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत या पक्षाने वेगळी भूमिका घेत संयुक्त जनता दलास प्रखर विरोध केला. परिणामी संयुक्त जनता दलाच्या ४६ उमेदवारांचा पराभव झाला, असा दावा आहे. त्याचा रोष नीतिशकुमार यांच्या मनात होताच. शिवाय लोकजनशक्तीच्या भूमिकेमुळे संयुक्त जनता पक्षास भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या आणि आता सरकार चालविताना भाजपची मनमानी खपवून घेण्याची वेळ आली आहे, असे नीतिशकुमार यांना वाटते आहे. आपल्या पक्षाच्या ४३ आमदारांचा आकडा भाजपच्या ७४ पेक्षा मोठा करण्याची त्यांना घाई झाली आहे.

लोकजनशक्तीच्या संसदीय पक्षात फूट पडून आपलाच पक्ष खरा, हे सिद्ध करण्याची चढाओढ काका-पुतण्यामध्ये (पशुपती पारस - चिराग पासवान) लागली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नजीकच्या विस्तारात पशुपती पारस यांना घेतले जाण्याची शक्यता आहे. हा घटक पक्ष संपविल्यास भाजपचे बिहारमधील राजकारण बदलू शकते. शिवाय नीतिशकुमार यांच्यावर अंकुश ठेवता येतो. याउलट पश्चिम बंगालमध्ये भाजपमध्ये धुसफूस चालू आहे. ममता बॅनर्जी यांचे उजवे हात समजले जाणारे मुकुल रॉय यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षही केले होते. ममतादीदींची पुन्हा सत्ता येताच रॉय माघारी फिरले. आता पूर्वाश्रमीचे तृणमूलचे असणारे भाजपचे तेवीस आमदार परत फिरण्याच्या तयारीत आहेत. राज्यपालांना भेटायला जाणाऱ्या सर्व (७७) आमदारांच्या शिष्टमंडळात तेवीस आमदारांनी गैरहजेरी लावली होती. भाजपने तृणमूलच्या तीस आमदारांना निवडणूकपूर्व संध्येला पक्षांतर करण्यास भाग पाडले होते.

उत्तर प्रदेशातील सर्वच राजकीय पक्षांत खदखद आहे. भाजपमध्येही असंतोष वाढला आहे. बहुजन समाज पक्षाने एकोणीसपैकी नऊ आमदारांना पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षातून निलंबित केले आहे. ते सर्व समाजवादी पक्षाच्या वाटेवर आहेत. कर्नाटकात भाजपमध्ये सुंदोपसुंदी चालू आहे. गोव्यात लवकरच निवडणूक आहे. तेथे भाजपमध्ये कोणाचा पायपोस कोणामध्ये नाही. काँग्रेसची हालत देशपातळीवर चांगली नसतानाही राजस्थान आणि पंजाबमध्ये सत्ता असताना गटबाजीने ऊत आणला आहे. तीन राज्यांतील मोठ्या तमाशाप्रमाणे उत्तर प्रदेशचे राजकारण ढवळून निघणार आहे. तेथे सहा महिन्यांत विधानसभेची निवडणूक आहे. पक्षांतराचा हा तमाशा तोवर चालतच राहणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहारKarnatakकर्नाटक