शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

महागाईचे चटके मुकाट सोसा अन् गप्प बसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 05:50 IST

आर्थिक आघाडीवर अपयशी ठरलेल्या सरकारला जाब विचारण्याच्या जबाबदारीचे मध्यमवर्गाला विस्मरण झाले आहे. आभासी शत्रूशी झुंज देण्यात तो मग्न आहे.

सध्या महाराष्ट्र उष्णतेच्या तीव्र झळांनी पोळून निघाला आहे. तब्बल दोन वर्षे कोरोनाच्या संकटांमुळे जायबंदी झाल्यानंतर आता हळूहळू आरोग्यापासून आर्थिक आघाडीवर एकेक पुढचे पाऊल पडत असताना रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध छेडल्याने पुन्हा एकदा जग आर्थिक संकटाच्या खाईत लोटले जाण्याचे स्पष्ट संकेत प्राप्त होत आहेत. पेट्रोल, डिझेल, आदी इंधनांच्या दरात झपाट्याने वाढ झाली. तब्बल १३७ दिवसांनंतर पेट्रोल, डिझेलचे दर वाढले. यामुळे तेल, भाज्यांपासून वाहतूक सेवेच्या दरांत नजीकच्या भविष्यात मोठी दरवाढ होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी इंधनाची अखेरची दरवाढ ऑक्टोबरमध्ये केली होती. गेले काही दिवस उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, आदी राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे इंधनाची दरवाढ होणार नाही, याची काळजी केंद्रातील सरकारने घेतली होती. उलटपक्षी नोव्हेंबर महिन्यात इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करून मतदारांना दिलासा देण्याचा आभास सरकारने निर्माण केला होता.

रशिया-युक्रेन युद्धापूर्वी कच्च्या तेलाचे प्रतिबॅरल दर ८६ डॉलर होते. रुपयाशी डॉलरचा विनिमय दर ७२ रुपये होता. युद्धाचा भडका उडताच कच्च्या तेलाचे प्रतिबॅरल दर १३० डॉलरपर्यंत भडकले. रुपयाशी डॉलरचा असलेला विनिमय दर ७५ रुपये झाला. यामुळे मालवाहतुकीचे दरभाडे वाढणार आहे. हे दर डिझेलचा प्रतिलीटर दर ८१ रुपये असताना निश्चित केले होते. आता डिझेलचा प्रतिलीटर दर ९५ रुपयांच्या घरात गेला आहे. मालवाहतुकीचे दर वाढले तर भाजीपाला, फळफळावळ, खाद्यतेले, डाळी अशा सर्वच वस्तूंची दरवाढ होणार आहे. अकरा कोटींच्या महाराष्ट्रात साडेचार कोटी कामगार असून त्यांपैकी केवळ ८० लाख संघटित क्षेत्रात काम करतात. जवळपास चार कोटी असंघटित क्षेत्रातील कामगार असून त्यांना किमान वेतनही मिळत नाही.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत अनेकांचा रोजगार गेला. काहींना निम्म्या वेतनावर काम करावे लागत आहे. अनेक कुटुंबांनी कोरोनाच्या लाटेत कुटुंबप्रमुख गमावला असल्याने देशात महागाईचा भडका उडाल्यास मोठ्या समाजवर्गाची होरपळ होणार आहे. मजूर वर्गाची या संकटात पुन्हा फरफट होणार आहे. देशासमोरील महागाईचे संकट अक्राळविक्राळ स्वरूप धारण करीत असताना त्याबद्दल फारसे कुणी बोलायला तयार नाही, ही खरी शोकांतिका आहे. देशातील जनता काश्मीरमध्ये तीन दशकांपूर्वी झालेल्या दुर्दैवी नरसंहाराच्या इतिहासरंजनात रमली आहे. मुलींनी हिजाब परिधान करावा की नाही यावर काथ्याकूट सुरू आहे. शिक्षणाच्या भगवेकरणाचा आग्रह धरला जात आहे. वेगवेगळ्या राज्यांमधील भाजपेतर सरकारेही केंद्र सरकारशी संघर्ष करण्यात दंग आहेत. लोकांच्या दैनंदिन जीवनमरणाच्या प्रश्नांवर साऱ्यांनीच मिठाची गुळणी घेतली आहे.रशिया-युक्रेन युद्धामागील मूळ कारण हेही इंधन हेच आहे. रशिया ते जर्मनी या देशांदरम्यान नैसर्गिक वायूच्या १२०० कि.मी. लांबीच्या पाईपलाईनचे काम अलीकडेच पूर्ण झाले. या कामावर झालेल्या १२ अब्ज डॉलर खर्चापैकी निम्मे पैसे रशियाने, तर उर्वरित पैसे युरोपीय देशांनी खर्च केले. रशिया हा जगातील क्रुड ऑईलची निर्मिती करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जर्मनीची नैसर्गिक वायूची भूक रशियाच भागवत आहे. रशियाकडून जर्मनीला पाईपलाईनद्वारे होणाऱ्या गॅस पुरवठ्याकरिता युक्रेनला वार्षिक सात अब्ज डॉलर इतके भाडे दिले जात होते. रशिया-युक्रेन यांच्या संबंधात बिब्बा घातला तर रशियाला मिळणाऱ्या उत्पन्नावर घाला घालता येईल व जर्मनीला इंधनाकरिता अमेरिकेवर अवलंबून राहावे लागेल. त्यातूनच रशियाशी व्यापारी संबंध तोडून युरोपीयन महासंघासोबत संबंध घट्ट करण्याकरिता युक्रेनला चिथावणी दिली गेली. रशियाकडून इंधन खरेदी न करण्याचे सूतोवाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केल्यानंतर इंधन दरवाढीचा भडका सुरू झाला. मात्र रशियाकडून होणारा गॅसचा पुरवठा बंद झाला किंवा केला तर युरोपात लाखो लोक गारठून मरण पावतील.युद्धामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळले आहेत. सोन्या-चांदीची बाजारपेठ तापली आहे. मात्र खरे संकट इंधन दरवाढीचे असून ते देशातील सामान्यांच्या पोटापाण्याशी निगडित आहे. या संकटामुळे कुणी कावकाव करू नये याकरिता धर्मांधतेच्या अफूची गोळी उगाळून सामान्यांना त्याचे वळसे देण्याचे प्रयोग सुरू आहेत. अर्थात आर्थिक आघाडीवर अपयशी ठरलेल्या सरकारला जाब विचारण्याच्या जबाबदारीचे मध्यमवर्गाला विस्मरण झाले आहे. आभासी शत्रूशी झुंज देण्यात तो मग्न आहे.

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढInflationमहागाई