शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी खूप जास्त ताणले; आता तुटू देऊ नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 10:20 IST

एसटी कर्मचाऱ्यांचा संप पासंगालाही पुरणार नाही, एवढा प्रदीर्घ काळ संप मुंबईतील गिरणी कामगारांनी चालवला होता. त्याचे काय झाले, हे संपकरी कर्मचाऱ्यांनाही चांगले ठाऊक आहे. त्यांनी खूप जास्त ताणले आहे, आता तुटू देऊ नये!

अखेर ज्याची आशंका होती तेच झाले! अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून सुरू असलेला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा सोमवारी कामगार न्यायालयाने दिला. एसटीच्या इतिहासातील हा सर्वात प्रदीर्घ काळ चाललेला संप! वेतनवाढ आणि एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण या संपकरी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यापैकी वेतनवाढ ही मागणी बव्हंशी पूर्ण झाली आहे. राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी मात्र मान्य होण्यासारखी नव्हतीच! भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी प्रारंभी या मागणीला बळ दिले होते. परंतु वस्तुस्थिती ही आहे, की त्या पक्षाचे सरकार सत्तेत असते तरी त्यांनाही ती मागणी मान्य करता आली नसती! तांत्रिक अडचणी हे त्यामागचे सर्वात प्रमुख कारण; पण त्यापेक्षाही मोठे कारण हे आहे, की सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी मान्य केल्यास, राज्य सरकारच्या अखत्यारीतील इतरही अनेक महामंडळांच्या कर्मचाऱ्यांनीही तशाच मागण्या रेटून धरल्या असत्या.

विलिनीकरणाची मागणी मान्य होणे शक्य नाही, हे संपकरी कर्मचाऱ्यांनी समजून घेणे गरजेचे होते. दुर्दैवाने काही निहित स्वारस्य असलेल्या मंडळीनी एसटी कर्मचाऱ्यांची जाणीवपूर्वक दिशाभूल केली आणि त्यांना संप रेटून धरण्यास भाग पाडले, असे दिसते. वस्तुत: सरकारने कमाल ४२ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ यापूर्वीच जाहीर केली आहे. त्या टप्प्यावर संपकरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असता आणि इतर वैधानिक मार्गांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठीचा लढा सुरु ठेवला असता, तर त्यांच्यावर सर्वसामान्य नागरिकांची सहानुभूती गमावण्याची वेळ आली नसती. दुर्दैवाने त्यांना ते तारतम्य बाळगता आले नाही आणि त्यामुळेच आज संप बेकायदा ठरविला गेल्याचे बघण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.सर्वसामान्य मराठी माणसाचे एसटीसोबत एका वेगळेच जिव्हाळ्याचे नाते आहे. तो दैनंदिन प्रवासासाठी `लाल परी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीच्या सर्वसाधारण बसेसवरच अवलंबून असतो. त्याला कोणत्याही सुखदु:खाच्या प्रसंगाच्या निमित्ताने प्रवास करावा लागतो, तेव्हा एसटीच वर्षानुवर्षांपासून त्याच्या सेवेत तत्पर असते. नादुरुस्त, गळक्या, खडखडाटामुळे डोके उठवणाऱ्या एसटी बसेसला मराठी माणूस लाख शिव्याशाप वाहत असेल, प्रसंगी विलंबाने धावणाऱ्या बसेससाठी कर्मचाऱ्यांवर त्याची चिडचिड होत असेल; पण प्रवासासाठी त्याची पहिली पसंती एसटीलाच असते! त्यामुळेच संपाच्या प्रारंभीच्या टप्प्यात सर्वसामान्यांची संपूर्ण सहानुभूती संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना लाभली होती. दुर्दैवाने आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. वाचकांच्या पत्रव्यवहारात प्रसिद्ध करण्यासाठी आमच्याकडे जी पत्रे प्राप्त होतात, त्या पत्रांचा बदललेला सूर त्याची प्रचिती देत आहे.
सरकारने वेतनवाढ जाहीर केल्यानंतर आता संपकरी कर्मचाऱ्यांनी पुरे करायला हवे, तुटेपर्यंत ताणू नये, अशीच सर्वसामान्य माणसाची भावना होती. कोणत्याही लढाईत कुठे थांबायला हवे, याची सेनापतींना जाण असणे फार महत्त्वाचे असते. प्रत्येक लढाईचा अंत एका पक्षाच्या संपूर्ण नि:पाताने होत नसतो. तह हादेखील लढाईतील महत्त्वाचा भाग असतो. प्रत्यक्ष खडाजंगीपेक्षाही यशस्वी तह करणे यामध्येच सेनापतीचे खरे नैपुण्य असते. ती जाण ज्यांना असते, ते इतिहासाच्या पानांवर अजरामर होतात; अन्यथा प्रचंड शूर योद्ध्यांचेही नामोनिशाण शिल्लक राहात नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे नेतृत्व करीत असलेल्या मंडळींना दुर्दैवाने ती जाण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, या प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे.संपापूर्वी अर्धीमुर्धी भाकर खाऊन निदान पित्याच्या छत्राखाली जगत असलेली त्यांची चिल्लीपिल्ली आज उघड्यावर आली आहेत. आताही संपाच्या नेत्यांनी समजूतदारपणा दाखवावा आणि जे पदरात पडले आहे, ते पावन करून घेत, उर्वरित मागण्यांसाठी वैधानिक मार्गांनी लढा द्यावा! अन्यथा गत काही दिवसात संपकरी कर्मचाऱ्यांची जी फाटाफूट सुरु झाली आहे, तिला न्यायालयाच्या निर्णयामुळे आणखी वेग येण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप पासंगालाही पुरणार नाही, एवढा प्रदीर्घ काळ संप मुंबईतील गिरणी कामगारांनी चालवला होता. त्याचे काय झाले, हे संपकरी कर्मचाऱ्यांनाही चांगले ठाऊक आहे. त्यांनी खूप जास्त ताणले आहे, आता तुटू देऊ नये!

टॅग्स :ST Strikeएसटी संप