शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 07:55 IST

स्वतः स्थलांतरित असलेले मस्क अमेरिकेतील धनाढ्य उद्योजक झाले, तेच मुळी अमेरिकेच्या सहिष्णुतेमुळे.

एक चुकीचा माणूस मुख्य खुर्चीत बसला की त्याच्याभोवती मूर्खाचा गोतावळा कसा तयार होतो आणि त्यातून अवघ्या देशाची वाट कशी लागते, हा अनुभव सध्या अमेरिका घेत आहे. फरक इतकाच की, तेथील माध्यमे, प्रशासन आणि नागरिक यांच्या पाठीचा कणा अद्याप तरी ताठ आहे. इलॉन मस्क यांना 'व्हाइट हाउस' सोडावे लागले, त्याचे खरे कारण हे! डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे पुन्हा अध्यक्ष झाल्यानंतर जे विजयी भाषण त्यांनी केले, तेव्हा त्यांच्यासमोरच्या पहिल्या रांगेत त्यांचे तीन लाडके लोक बसले होते. 'अॅमेझॉन'चे जेफ बेझोस, 'फेसबुक'चे मार्क झुकेरबर्ग आणि अर्थातच 'एक्स'चे इलॉन मस्क. या माध्यमवीरांचा ट्रम्प यांच्या विजयात वाटा मोठा. ट्रम्प थापा मारण्यात पटाईत. विखार पसरविण्यात तरबेज. अमेरिकेत स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून असंतोष आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्याच मुद्द्याला त्यांनी प्रचाराचा केंद्रबिंदू केले. अमेरिका आज जी काही आहे, ती स्थलांतरितांच्याच भरवशावर. मात्र, त्या अमेरिकेला ट्रम्प यांनी एकदम संकुचित करून टाकले.

आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी ट्रम्प रोज नव्या थापा ठोकत आणि अनेक माध्यमवीर त्या थापांना मान्यता मिळवून देत. असे करणाऱ्या टोळीमध्ये इलॉन मस्क सगळ्यात आघाडीवर. स्वतः स्थलांतरित असलेले मस्क अमेरिकेतील धनाढ्य उद्योजक झाले, तेच मुळी अमेरिकेच्या सहिष्णुतेमुळे. मात्र, त्या औदार्याला पायदळी तुडवत मस्क कडव्या विचारधारेचे 'आयकॉन' झाले. अत्यंत प्रतिगामी, श्वेतवर्णीय वर्चस्ववादी झालेल्या मस्क यांना कुठलेच विधिनिषेध उरले नाहीत. असा माणूस रिपब्लिकन पक्षाकडे वळणे स्वाभाविक, पुढे त्यांचे आणि ट्रम्प यांचे जमणे तर अगदीच नैसर्गिक. ट्रम्प निवडून यावेत म्हणून त्यांनी पाण्यासारखा पैसा ओतला. ट्रम्पही मस्क यांच्या आकंठ प्रेमात होते. मात्र, हा 'हनिमून' आता संपला आहे. अवघ्या चार महिन्यांत सरकारमधून मस्क बाहेर पडले आहेत. 

ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर त्यांनी मस्क यांच्यावर कौतुकाची भरपूर फुले उधळली होती. मुळात, अहंकारी, विखारी आणि महत्त्वाकांक्षी असलेली दोन माणसे फार काळ एकत्र राहू शकतील, असे अनेकांना तेव्हाही वाटत नव्हते. शिवाय, मस्क थेटपणे सरकारमध्ये सहभागी झाले. ट्रम्प प्रशासनाच्या 'डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी' (DOGE) म्हणजे खर्च कपात विभागात मस्क दाखल झाले. मात्र, कंपनी चालवणे वेगळे आणि देश चालवणे वेगळे हे त्यांच्या तसे लवकरच लक्षात आले. त्यातही ट्रम्प यांच्यासोबत काम करणे आणखी अवघड. दोघेही उद्योजक असल्याने हितसंबंधांचे मुद्देही आडवे येऊ लागले. यात कौतुक केले पाहिजे अमेरिकी प्रशासनाचे. ट्रम्प यांचा 'उजवा हात' म्हणून मस्क वाटेल ते निर्णय घेऊ लागले, तेव्हा प्रशासनाने त्यांचे आदेश ऐकणेच बंद करून टाकले. तिकडचे ट्रम्पभक्तही तसे शहाणे. त्यांनी मस्क यांना आणि ट्रम्पनाही सुनावले. सगळ्यात भारी अमेरिकी नागरिक. त्यांनी मस्क यांच्या उत्पादनांवरच बहिष्कार घातला. 

अखेर मस्क यांना पद सोडण्याशिवाय पर्यायच उरला नाही. ट्रम्प यांच्या अर्थसंकल्पाबद्दल निराशा व्यक्त केल्यानंतर मस्क सरकारमधून बाहेर पडले. या अर्थसंकल्पामध्ये मल्टी ट्रिलियन डॉलरच्या कर सवलती आणि संरक्षण खर्च वाढवण्याचे प्रस्ताव होते. ट्रम्प यांनी त्या विधेयकाला 'बिग अँड ब्युटिफूल' असे म्हटले होते. मस्क यांनी त्यावर टीका केली. हे विधेयक ट्रम्प यांच्या धोरणाचा मुख्य भाग आहे. मस्क मात्र त्यावर तुटून पडले. एक तर 'बिग' असू शकते अथवा 'ब्युटिफूल'; दोन्ही एकत्र नसते, असे सांगत त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणात्मक भूमिकेवरच हल्ला चढवला. खरे म्हणजे, मस्क हे रिपब्लिकन पक्षाचे सर्वांत मोठे देणगीदार. त्यांनी गेल्यावर्षी अडीचशे दशलक्ष डॉलरची देणगी दिली होती. अशा मोठ्या देणगीमुळेच ट्रम्प आणि मस्क यांच्यातील संबंध दृढ झाले. मात्र, याच काळात मस्क यांच्या 'टेस्ला'च्या नफ्यात मोठी घसरण झाली. त्यामुळे कंपनीशी संबंधित सगळेच घटक अस्वस्थ होते. शिवाय, तिकडे ट्रम्प प्रशासनासोबतही त्यांचे टोकाचे खटके उडू लागले. हा ताण वाढत गेला. मस्क यांना भारताने मस्का लावला असला तरी 'व्हाइट हाउस'ने मात्र त्यांना घराबाहेर काढले. जोडीतील एकाला अमेरिकेने चार महिन्यांत हाकलले आहे. दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील! 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका