शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सारेच शेजारी उपद्रवी; दररोज वाढवताहेत अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 05:56 IST

निंदकाचे घर असावे शेजारी, परि चेष्टेकरी असू नये,’ असे संत तुकारामांनी लिहिले तेव्हा त्यांना भारताचे सारेच शेजारी केवळ निंदकच नव्हे, तर उपद्रवीही असतील, हे माहीत नव्हते. आज आपले सारे शेजारी रोजच्या रोज आपल्याला उपद्रव देत आहेत.

निंदकाचे घर असावे शेजारी, परि चेष्टेकरी असू नये,’ असे संत तुकारामांनी लिहिले तेव्हा त्यांना भारताचे सारेच शेजारी केवळ निंदकच नव्हे, तर उपद्रवीही असतील, हे माहीत नव्हते. आज आपले सारे शेजारी रोजच्या रोज आपल्याला उपद्रव देत आहेत. अगदी आताचे उदाहरण म्हणजे बांग्लादेशचे. दुर्गापूजेचा उत्सव पश्चिम बंगालमध्येही वर्षानुवर्षे उत्साहाने, आनंदाने साजरा होतो; कारण बांग्लादेश व पश्चिम बंगाल यांचे पूर्वापर नाते आहे. ते जसे भाषिक आहे, तसेच सांस्कृतिकही आहे. धर्म भलेही वेगळे असोत; पण दोन्हीकडील लोकांमधील सांस्कृतिक वीण इतकी वर्षे टिकून आहे. खरे तर आता ती टिकून होती, असे म्हणायची वेळ आली आहे, याचे कारण दुर्गापूजेच्या काळात यंदा बांग्लादेशात झालेला हिंसाचार. यंदाचा हा हिंसाचार धार्मिक आहे. हिंदू विरुद्ध मुस्लीम असे स्वरूप त्याला आले आहे. त्यामुळेच बहुसंख्य हिंदू राहत असलेल्या भारताला त्याची दखल घेणे, काळजी वाटणे स्वाभाविक आहे.

या हिंसाचारात दुर्गापूजेचे मंडप तोडून टाकण्यात आले, इस्कॉन मंदिराचे नुकसान करण्यात आले आणि काहींना तर ठारच मारण्यात आले. अलीकडील काळातच काय, पण पूर्वीही बांग्लादेशात हिंदूंवर इतके हल्ले झाले नव्हते; पण सर्वच देशांत अतिरेकी वा टोकाचा धार्मिक विचार करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे असहिष्णुता वाढणे स्वाभाविकच आहे. याला बांग्लादेशही अपवाद राहिलेला नाही. बांग्लादेशचे सरकार हिंसाचाराच्या विरोधात बोलत आहे, अनेक जणांवर पोलिसांनी कारवाईही केली आहे. पण दुर्गापूजा उत्सवामुळे एरवी जो धार्मिक सलोखा वाढत असे, त्याला यंदा तडाच गेला आहे. त्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे. अगदी अमेरिकेतही बांग्लादेशातील हिंसाचाराविरोधात निदर्शने झाली, अन्य देशांनीही त्याची निर्भर्त्सना केली. भारतात त्याची उलटी प्रतिक्रिया आली नाही, हे सुदैवच म्हणायला हवे. आपल्याकडेही टोकाचा विचार करणारे व असहिष्णू लोक आणि त्यांच्या संघटना बक्कळ आहेत. तरीही इथे अद्याप शांतता आहे, ही बाब समाधानाची.
बांग्लादेश हे अलीकडील काळातील उदाहरण; पण भारताचे अन्य शेजारी देशही गेल्या काही काळात उपद्रवी बनले आहेत किंवा त्यांच्या उपद्रवाचे प्रमाण वाढले आहे, असे म्हणता येईल. भारत आणि या शेजारी राष्ट्रांमधील संबंध पूर्वीइतके मधुर वा चांगले न राहिल्याचाच हा परिणाम म्हणता येईल. पाकिस्तान तर कायमच त्रास देणारा शेजारी आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवर सतत तणाव असतो, तेथून घुसखोरी होत असते. तेथील गुप्तचर यंत्रणा भारतातील तरुणांना, गुन्हेगारांना दहशतवादाचे प्रशिक्षण देत असतात. काश्मीरमध्ये भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यात आणि दहशतवादी हल्ले घडवून आणण्यात पाकिस्तानचाच हात असतो. आपण भारताविरुद्धचे युद्ध कधीही जिंकू शकणार नाही, हे माहीत असल्याने पाकिस्तान अशा उपद्रवी कारवाया करीत असतो. पाकिस्तानच्या कारवायांमुळेच गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये अशांतता आहे. रोज चकमकी होत आहेत, अतिरेकी मरत आहेत आणि भारताच्या सुरक्षा दलाचे जवानही शहीद होत आहेत.
लडाख आणि अरुणाचलच्या सीमेवर चीनचे सैनिक रोजच त्रास देत आहेत. गेल्या वर्षी ते गलवान खोऱ्यात घुसले. यंदा उत्तराखंडात घुसून त्यांनी एक पूल तोडून टाकला. अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भाग आहे, असा दावा चीन सतत करतो आणि तिथेही कुरापती काढत असतो. आता तर चीनने युद्धाची भाषा सुरू केली आहे. तसे प्रत्यक्ष घडणार नाही, ही बाब वेगळी; पण त्या सीमेवरही आपल्याला सावध राहावे लागणार आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ज्या भूतानच्या सीमा सांभाळण्याचे काम आपण आतापर्यंत करीत आलो, त्या भूताननेच अलीकडे चीनशी परस्पर व आपल्याला अंधारात ठेवून एक करार केला आहे.  नेपाळ हा भारताचा दोस्त असे आपण मानत राहिलो; पण आता नेपाळलाही आपल्यापेक्षा चीनच अधिक जवळचा वाटू लागला आहे. नेपाळ, भूतान, पाकिस्तान, श्रीलंका यांना अर्थसाहाय्य करून चीन त्यांना आपल्या कवेत घेत आहे. आपणही या देशांना मदत करतोच; पण त्या देशांशी आपले संबंध पूर्वीइतके उत्तम राहिले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ते सुधारावे लागतील. पाकिस्तान व बांग्लादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत, म्हणून आपण तसे वागून चालणार नाही. तसे केल्याने संबंध आणखी बिघडतील. चीनच्या हातात कोलीत मिळता कामा नये. त्यासाठी शेजारी अधिक उपद्रवी असून चालणार नाही. ती जबाबदारीही आपलीच आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेशindia china faceoffभारत-चीन तणावPakistanपाकिस्तानNepalनेपाळ