शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

...हे हृदय कसे आईचे?

By किरण अग्रवाल | Updated: June 6, 2019 04:39 IST

वंशाच्या दिव्यासाठी मुलगाच हवा या खुळचट कल्पनेत वावरणा-या एका मातेने तिसरीही मुलगीच झाल्याने अवघ्या दहा दिवसांच्या आपल्याच बाळाचे जगणे गळा आवळून संपविल्याची घटना नाशकात घडली आहे.

किरण अग्रवालकाळाच्या बदलाचा वेग कितीतरी पटीने वाढला आहे, असे आपण म्हणतो व ते खरेही आहे. परंतु या बदलात पारंपरिक किंवा बुरसटलेल्या संज्ञेत मोडणाऱ्या विचारांचा बदल कितपत होताना दिसतोय असा प्रश्न केला तर त्याचे मात्र समाधानकारक उत्तर देता येऊ नये. कारण, बदलाच्या ओघात भौतिक गरजांच्या अनुषंगाने साधन-सुविधा स्वीकारल्या गेल्या; परंतु वैचारिक उन्नयन तितकेसे घडवता आले नसावे म्हणूनच की काय, तिसरेही अपत्य स्री जातीचे जन्मास आल्याने मातेनेच पोटच्या गोळ्याचे जगणे हिरावून घेण्यासारखे प्रकार समाजात घडताना दिसत आहेत. अशा घटनांमधून माणुसकीच्या भावनेला तर नख लागतेच; पण माया-ममतेच्या दृष्टीने सर्वोच्च कोटीच्या ठरणाºया मातृत्वाच्या भूमिकेलाही आच बसून गेल्याखेरीज राहात नाही.वंशाच्या दिव्यासाठी मुलगाच हवा या खुळचट कल्पनेत वावरणा-या एका मातेने तिसरीही मुलगीच झाल्याने अवघ्या दहा दिवसांच्या आपल्याच बाळाचे जगणे गळा आवळून संपविल्याची घटना नाशकात घडली आहे. या घटनेकडे प्रातिनिधिक म्हणून बघता यावे, कारण अपवादात्मक असल्या तरी मातृत्वाच्या नात्याला कलंक ठरणा-या अशा मातांची प्रकरणे इतरत्रही अधून मधून समोर येतच असतात. अनिच्छेने जन्मास येणा-या ‘नकोशीं’चा प्रश्न व त्यासंदर्भातील बुरसटलेली विचारधारा किती गंभीर आहे, हेच यावरून लक्षात यावे. बरे, हे काही कुठे आदिवासी वाड्या-पाड्यावर, खेड्यात घडले आहे असे नाही, तर नाशिकसारख्या शहरात व शासकीय सेवेत असलेल्या व्यक्तीच्या घरात घडलेला प्रकार आहे हा; त्यामुळे काळाच्या किंवा बदलाच्या चक्रापासून अनभिज्ञ असलेल्यांकडून असे घडल्याचे म्हणण्याची सोय नाही. ‘नकोशी’ ठरलेल्या मुलींबाबत दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१७-१८ मधील आर्थिक सर्वेक्षणात प्रथमच लक्ष वेधण्यात आले होते व देशात अशा नकोशा मुलींची संख्या तब्बल दोन कोटींवर असल्याचे त्यात नोंदविण्यात आले होते. तेव्हा, जन्मत:च नकोशीला यमसदनी धाडण्याचा प्रकार तर गंभीर ठरावाच; परंतु अनिच्छेने स्वीकारलेल्या मुलींच्या वाट्याला कसले जीणे आले असावे, यासंबंधीच्या चिंतेनेच संवेदनशील मन गहीवरून यावे.महत्त्वाचे म्हणजे, समाजात स्री-पुरुष समानतेची चर्चा नेहमी झडत असते, महिला वा मातृदिनानिमित्त नारीशक्तीच्या गौरवाचे पाट वाहताना दिसतात; त्याचा परिणामही होतो खरे; पण काही घटना अशा घडून जातात की त्या एकूणच समाजमनावर गहिरा परिणाम करून जाणा-या ठरतात. मागे एका प्रियकराच्या नादात लागलेल्या मातेने आपल्या लहानग्याला कपडे धुण्याच्या धुपाटण्याने इतके बदडले होते की त्याला जिवास मुकावे लागले होते. चालू वर्षात, म्हणजे जानेवारी ते आतापर्यंतच्या पाच महिन्यात नाशकातील कचराकुंडीवर अथवा अन्यत्र बेवारसपणे टाकून दिलेली तीन अर्भके आढळून आली आहेत. भलेही अनैतिक संबंधातून ती जन्मास आलेली असावीत, परंतु पोटच्या गोळ्याला असे कचराकुंडीत टाकून देणा-या किंवा अलीकडील घटनेनुसार त्याचा थेट जीवच घेणा-या मातेच्या निर्दयतेला काय म्हणावे? ‘स्वामी तिन्ही जागाचा, आईविना भिकारी’ असे एकीकडे म्हणतानाच ‘माता न तु वैरिणी’ असे म्हणण्याचीही वेळ जेव्हा ओढवते, तेव्हा हे हृदय कसे आईचे, असा प्रश्नही उपस्थित होऊन गेल्याशिवाय राहात नाही.अर्थात, विचारांच्या मागासलेपणातूनच असे घडून येत असल्याने विवेकाचा जागर हाच त्यावरील प्रभावी उपाय ठरावा. शिवाय, कायद्याची बेडी अधिक कडक केली जाणे गरजेचे आहे. आपल्याकडे गर्भलिंग निदान कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन करण्याचे प्रकार वेळोवेळी उघडकीस येतात, यातील दोषींना जरब बसेल अशी शिक्षा झाल्यास गर्भातच कळ्यांना खुडण्याच्या प्रकारास चाप बसेल. तिस-या मुलीचा गळा घोटण्याचा प्रकार उघडकीस येत असताना नाशकातच एका डॉक्टरला गर्भलिंग निदान कायदा उल्लंघनाबाबत दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे. यामुळे कायद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना जरब बसावयास मदत होईल. मुलगा व मुलगी यातील भेदाचे जळमट दूर करतानाच नकोशींबद्दलची मानसिकता बदलण्यासाठी कन्या जन्माचे स्वागत करण्याची धारणा रुजवावी लागेल. ते केवळ शासनाच्या प्रयत्नांनी होणार नाही तर समाजातील विचारीवर्गाने त्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.  

टॅग्स :Nashikनाशिक