शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

आजपासून आयपीएलला सुरुवात; घरात कैद झालेल्यांसाठी समाधानाची झुळूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 06:54 IST

आजपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे घरात कैद झालेल्यांकरिता हीच काय ती समाधानाची झुळूक ठरणार आहे.

कोरोना संघ मैदान सोडायला तयार नाही. त्याच्याशी आपल्याला आणखी किती षटके मुकाबला करावा लागणार, तेही माहीत नाही. कुठल्याही सामन्यात सुरुवातीला जलदगती गोलंदाजांच्या तुफान वेगवान गोलंदाजीचा अनुभव फलंदाजाला घ्यावा लागतो तसा गतवर्षी कोरोनाने आपला ‘पेस’ दाखवला. त्यानंतर कोरोनाचा वेग मंदावला. क्रिकेटच्या मैदानावर स्पीनर्स उतरल्यावर खेळाचा वेग मंदावतो तसेच काहीसे झाले. मात्र स्पीनर्सचा एखादाच चेंडू अलगद यष्टी उडवून जातो; तसेच आपले झाले. कोरोना संपला या भ्रमात आपण स्पीनरला फ्रंटफूट येऊन खेळायला गेलो आणि चेंडू दांडी उडवून गेला.  आता कोरोनाने पुन्हा पेसचे अस्त्र परजले असून, गुणाकाराच्या संख्येत रुग्ण वाढत आहेत. साहजिकच मृत्युदर वाढत आहे. अर्थात याबरोबर हॉस्पिटलमध्ये बेड न मिळणे, रेमडेसिव्हिरसारखी इंजेक्शन न मिळणे, वैद्यकीय कर्मचारीवर्ग अपुरा पडणे आदी असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रोजगार, उत्पन्न वगैरे बाबींवर वरवंटा फिरणार आहे तो वेगळाच!

अशा परिस्थितीत आजपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे घरात कैद झालेल्यांकरिता हीच काय ती समाधानाची झुळूक ठरणार आहे. आयपीएलच्या वेगवेगळ्या संघातील क्रिकेटपटू हेही कोरोनाचा सामना करीत आहेत. आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल याने कोरोनावर मात केली असतानाच त्याच संघाचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू डॅनियल सॅम याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुंबई इंडियन्सचे सल्लागार किरण मोरे हेही कोरोनाग्रस्त झाले. गतवर्षी कोरोनाचे सावट असल्याने आयपीएल अबुधाबी येथे आयोजित केल्या होत्या. यंदा आयपीएल भारतात होत असून, सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतही सामने होणार आहेत. अर्थात स्टेडियममध्ये जाऊन क्रिकेटप्रेमींना हे सामने पाहता येणार नाहीत.
मुळात आयपीएलचे जे इकॉनॉमिक मॉडेल आहे त्यामध्ये अन्य क्रिकेट सामन्यांसारखे दर्शकांनी तिकिटे खरेदी करून मैदान गाठल्यावर नफा होईल, असे नाही. आयपीएल सामन्यांचे घरोघरी थेट प्रक्षेपण करण्याचे राइट‌्स दोन ते अडीच हजार कोटी रुपयांना क्रीडावाहिनी खरेदी करते. त्यामुळे जेवढे प्रेक्षक टीव्हीवर हे सामने पाहतील तेवढा उदंड प्रेक्षकवर्ग वाहिनीला लाभतो. टीआरपीचे हे गणित वाहिनीला जाहिरातीचे उत्पन्न मिळवून देेते. ज्या सामन्यांना जास्त टीआरपी त्याच्यानुसार टीमला वाहिनीकडून नफ्यातील हिस्सा मिळतो. आयपीएलमध्ये सहभागी क्रिकेटपटूंच्या निवासापासून अनेक खर्चाची जबाबदारी टीमचे मालक उचलत नाहीत, तर बीसीसीआय उचलते.
आयपीएलवरील सट्टाबाजार हा गेल्या काही वर्षांत शेअरबाजाराइतपत स्थिरावला आहे. मैदानात प्रत्यक्ष पडणारा चेंडू आणि टीव्हीवर मैदानात पडताना दिसणारा चेंडू यात असलेले अर्धा-पाऊण मिनिटांचे अंतर शेकडो कोटी रुपयांच्या उलथापालथी घडवते. ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘इन्साइड एज’ या वेेब सिरीजमध्ये आयपीएल सामने व त्यानिमित्ताने होणारे बेटिंग, मँच फिक्सिंग व तत्सम अनेक बऱ्यावाईट बाबींवर प्रकाश टाकला आहे. अर्थात प्रत्येक गोष्टीला दोन्ही बाजू असतात. आयपीएलच्या निमित्ताने होणारी आर्थिक उलाढाल ही सध्याच्या आर्थिक परिस्थितीत क्रिकेटपटू, फिजिओथेरपिस्ट, मैदानावरील कर्मचारी वर्ग अशा अनेकांना  दिलासा देणारी आहे. कोरोना संकटाच्या काळात हे आयोजन शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. अर्थात कोरोनासंबंधीचे नियम आयपीएलच्या मैदानावर, हॉटेलात कसोशीने पाळले जातात.कोरोनाने बॉलिवुडपासून मराठी नाट्य व्यवसायापर्यंत, शिक्षणापासून मीडियापर्यंत, कामगारांपासून उद्योजकांपर्यंत अनेकांना फटका दिला असताना देशातील नव्हे तर विदेशातील नामांकित क्रिकेटपटू जिवाची जोखीम पत्करून भारतात येऊन खेळण्याचे एकमेव कारण म्हणजे अर्थातच त्यांना मिळणारा बख्ख‌ळ पैसा! कोरोना काळातली पोटाची भ्रांत हजारो मजुरांना हजारो किलोमीटरची पायपीट करून बिहार, झारखंडमधील आपले गाव गाठायला जसे भाग पाडते तसेच विदेशी क्रिकेटपटूंनाही भारतात व मुख्यत्वे मुंबईत कोरोनाचा प्रकोप सुरू असताना पुढील किमान दीड महिना मुक्काम करायला भाग पाडणार आहे. गतवर्षीचे विजेते मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूंचे नृत्य असलेले  ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ हे कोळीगीत सध्या गाजत आहे. क्रिकेटच्या मैदानावर खरा देव ‘दर्शक’. तो यंदा घरीच बसलेला आहे. किंबहुना दर्शक देवाला घरी बसण्याचा ‘नारळ’ दिल्याने आयपीएल आर्थिकदृष्ट्या यशस्वी होणार आहे.

टॅग्स :IPLआयपीएल २०२१corona virusकोरोना वायरस बातम्या