शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय : देशातील न्यायसंस्था आणि अंधत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 06:32 IST

एखाद्याचे पाचपैकी एक ज्ञानेंद्रिय निसर्ग हिरावून घेतो तेव्हा अन्य ज्ञानेंद्रिये इतरांहून अधिक तीक्ष्ण होतात, हे जगन्मान्य सत्य आहे. म्हणूनच अशा व्यक्तींना अपंग न म्हणता ‘डिफरंटली एबल्ड’ म्हणणे योग्य ठरते.

डोळ्यांवर काळी पट्टी बांधलेली, डाव्या हातात तराजू व उजव्या होतात तलवार घेतलेली न्यायदेवतेची प्रतिमा नि:ष्पक्ष न्यायदानाचे प्रतीक मानले जाते. यातील तराजू रास्तपणा व संतुलन दाखवतो. न्यायदेवतेला समोरचा पक्षकार कोण आहे व त्याची राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक पत काय आहे हे दिसत नाही. ती फक्त कायदा आणि पुरावे याआधारेच न्यायनिवाडा करते, याची ग्वाही देण्यासाठी न्यायदेवतेच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधलेली असते. ग्रीक संस्कृतीमधील थेमिस या न्यायदेवतेची ही प्रतिमा १६व्या शतकापासून निस्पृह न्यायाचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणून प्रचलित आहे. या दृष्टीने न्यायदेवता एका परीने आंधळी असते, असेही म्हटले जाते. दोन मानवांमधील झगड्यांमध्ये न्यायनिवाडा फक्त परमेश्वरच करू शकतो, असे सर्वच धर्म मानत असल्याने न्यायदान हे ईश्वरी कामही मानले जाते. प्रत्यक्षात मात्र मानवी रूपातील न्यायाधीश हे काम करत असतो. पण निस्पृह न्यायदान करण्यासाठी एखाद्या डोळसाच्या डोळ्यांवर मुद्दाम पट्टी बांधण्याऐवजी जिला अजिबात दिसतच नाही अशी व्यक्ती न्यायाधीश म्हणून बसविण्यास काय हरकत आहे? अंध व्यक्ती न्यायाधीश होऊ शकते, की दृष्टिहीनता ही त्या पदासाठी अपात्रता आहे? आपल्या सर्वोच्च न्यायालयानेभारतापुरते तरी याचे उत्तर ठामपणे नकारार्थी देऊन अंधांना न्यायाधीशपदाचे दरवाजे बंद केले आहेत.

दृष्टी ५० टक्क्यांहून अधिक अधू असलेली व्यक्ती न्यायाधीश होण्यास अपात्र ठरते, असे न्यायालयाने सुरेंद्र मोहन वि. तामिळनाडू सरकार या प्रकरणात गेल्या वर्षी जाहीर केले. तामिळनाडू सरकारने न्यायाधीशांची काही पदे अधू दृष्टी असलेल्या व्यक्तींसाठी राखीव ठेवली व त्यासाठी ४० ते ५० टक्के अंधत्व ही कमाल मर्यादा ठरविली. अपंगांना समान संधी देणाऱ्या कायद्याच्या निकषांवर याची योग्यता फक्त न्यायालयाने तपासली. यासाठी दिलेल्या कारणांमध्ये अंध व्यक्ती न्यायालयापुढे आलेली सर्व कागदपत्रे बारकाईने वाचून निकालपत्र लिहू शकणार नाहीत व त्यांना निकालपत्र इतरांकडून लिहून घ्यावी लागल्याने ते जाहीर होईपर्यंत त्याची गोपनीयता राहणार नाही, ही प्रमुख आहेत. यातील पहिले कारण न पटणारे आहे. कारण दिसत नसूनही जगभरातील प्रकांड ज्ञानभांडार आत्मसात करून देदीप्यमान यश मिळविणाºया अनेक अंधांची उदाहरणे जगापुढे आहेत. दुसरे कारण अप्रस्तुत आहे. कारण एरवी डोळस न्यायाधीशही निकालपत्र स्वत: न लिहिता आपल्या लघुलेखकालाच सांगत असतात. लघुलेखकाला असे तोंडी ‘डिक्टेशन’ देण्यासाठी डोळ्याने दिसत असणे बिलकूल गरजेचे नाही. हा निकाल देताना न्यायालयाने जगाकडे पाहिले असते तर पूर्णपणे अंध व्यक्तीही उत्तम न्यायाधीश झाल्याची देशातील व परदेशांतील अनेक उदाहरणे दिसली असती. यासाठी वानगीदाखल डेव्हिड स्वॅनोवस्की, ब्रह्मानंद शर्मा, युसूफ सलीम, गिल्बर्टो रामिरेझ, रिचर्ड बर्नस्टीन, डॉ. हान्स युजेन शुल्झ, झकेरिया मोहम्मद झाक मोहम्मद व टी. चक्रवर्ती यांची नावे घेता येतील. स्वॅनोवस्की, रामिरेझ व बर्नस्टीन हे तिघे अमेरिकेच्या अनुक्रमे कोलोरॅडो, न्यू यॉर्क या राज्यांमधील आजी-माजी न्यायाधीश आहेत. शुल्झ जर्मनीमध्ये तर झाक मोहम्मद दक्षिण आफ्रिकेत न्यायाधीश होते. सलीम आजही पाकिस्तानात न्यायाधीश आहेत. वयाच्या २२व्या वर्षी पूर्ण अंधत्व आलेले ब्रह्मानंद शर्मा सध्या राजस्थानमध्ये न्यायाधीश म्हणून काम करत आहेत, तर टी. चक्रवर्ती यांची १० वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये न्यायाधीशपदी नेमणूक झाली होती.यापैकी कोणाचेही अंधत्व न्यायाधीश म्हणून कर्तव्य वजावताना आड आले नाही. मुळात सरसकट सर्वच अंधांना न्यायाधीशपदासाठी अपात्र ठरविणे हे न्यायदानात अपेक्षित असलेल्या सारासार विवेकबुद्धीला धरून नाही. शिवाय अंधांचे जग हे त्यांच्याच ‘नजरे’तून पाहावे लागते. या अंध न्यायाधीशांना प्रत्यक्ष काम करताना पाहिल्यावर सर्वोच्च न्यायालय कुठे तरी चुकल्याची जाणीव प्रकर्षाने होते. फेरविचार याचिकाही फेटाळलेली असली तरी संधी मिळेल तेव्हा न्यायालयाने या निकालाचा फेरआढावा घेणे अंधांच्या कल्याणाचे व न्यायसंस्थेसही नवी दृष्टी देणारे ठरेल.

टॅग्स :Courtन्यायालयIndiaभारत