शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

संपादकीय - चीनचे डोहाळे अन् अमेरिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 01:11 IST

जगातील इतर कोणत्याही देशाद्वारे डब्ल्यूएचओला एवढा निधी प्राप्त होत नाही. दुसºया महायुद्धानंतर डब्ल्यूएचओने जगभरात, विशेषत: अविकसित व विकसनशील देशांमध्ये, रोगराई नियंत्रणात ठेवण्यात

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओला अमेरिकेकडून दिला जाणारा निधी थांबविण्याची घोषणा केली. ट्रम्प हे एव्हाना सारासार विचार न करता, स्वत:च्या विश्वासावर विसंबून तडकाफडकी निर्णय घेण्यासाठी जगभर प्रसिद्ध झाले आहेत. डब्ल्यूएचओचा निधी थांबविण्याचा त्यांचा ताजा निर्णयही त्याच मालिकेतील आहे. सध्या संपूर्ण जगाला भयभीत करून सोडलेल्या कोरोना महामारीच्या प्रसारासाठी ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओला जबाबदार ठरविले आहे. डब्ल्यूएचओने कोरोनासंदर्भातील खरी माहिती दडवून ठेवली आणि त्यामुळेच कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ आजाराचा जगभरात व्यापक प्रसार झाला, असा त्यांचा आक्षेप आहे. वेळेत आवश्यक ती माहिती गोळा करण्यात आणि ती पारदर्शकरीत्या सामायिक करण्यात डब्ल्यूएचओ अपयशी ठरल्याचा थेट आरोपच ट्रम्प यांनी केला आहे. डब्ल्यूएचओने एकप्रकारे चीनची पाठराखण केली, असे त्यांचे म्हणणे आहे. डब्ल्यूएचओच्या भूमिकेची समीक्षा करण्याचा आदेशही ट्रम्प यांनी अमेरिकन प्रशासनास दिला आहे. त्यासाठी किमान दोन ते तीन महिने लागतील, अशी माहिती समोर आली आहे. याचा दुसरा अर्थ हा की, किमान तेवढा काळ तरी डब्ल्यूएचओला अमेरिकेकडून निधी मिळणार नाही. अमेरिका दरवर्षी डब्ल्यूएचओला सुमारे ४०० ते ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढा निधी देत असते. ती रक्कम डब्ल्यूएचओच्या अर्थसंकल्पाच्या सुमारे १५ टक्के एवढी आहे.

जगातील इतर कोणत्याही देशाद्वारे डब्ल्यूएचओला एवढा निधी प्राप्त होत नाही. दुसºया महायुद्धानंतर डब्ल्यूएचओने जगभरात, विशेषत: अविकसित व विकसनशील देशांमध्ये, रोगराई नियंत्रणात ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. या पार्श्वभूमीवर, कोरोनाचा जगभर कहर सुरू असताना अमेरिकेद्वारा डब्ल्यूएचओचा निधी थांबविला जाण्याचे किती गंभीर परिणाम संभवू शकतात, हे कुणाच्याही सहज लक्षात येईल. निधीच्या कमतरतेअभावी अविकसित व विकसनशील देशांमध्ये कोरोनाचा प्रकोप झाल्यास अमेरिकाही त्यापासून अलिप्त राहू शकणार नाही. कारण जगातील प्रत्येक देशातील नागरिक मोठ्या संख्येने अमेरिकेत जात असतात. दुर्दैवाने ट्रम्प या वस्तुस्थितीकडे साफ दुर्लक्ष करीत आहेत. त्यांना त्यांच्या अमेरिका फर्स्ट या नाºयाने भयंकर पछाडले आहे. अमेरिकेच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या नादात आपण अमेरिकेच्याच पायावर कुºहाड मारून घेत आहोत, ही बाब लक्षात घ्यायलाच ते तयार नाहीत. डब्ल्यूएचओ चीनकडून कोरोनासंदर्भातील माहिती मिळविण्यात अपयशी ठरल्याचा ट्रम्प यांचा दावा अगदीच टाकाऊ नाही. त्यामध्ये निश्चितपणे तथ्य आहे; मात्र डब्ल्यूएचओसारख्या जागतिक संस्था कोणत्याही देशावर दबाव आणून माहिती गोळा करू शकत नाहीत. शेवटी त्यांना संबंधित देशाने सामायिक केलेल्या माहितीवरच विसंबून राहावे लागते. जगातील प्रत्येक साम्यवादी देश माहिती दडवून ठेवण्यासाठी ख्यात आहे. चीन त्यामध्ये अव्वल आहे. गत काही दशकांपासून तो देश अमेरिकेसारख्या लष्करी महासत्तेलाही भीक घालत नाही. तिथे डब्ल्यूएचओसारख्या संस्थेची काय कथा? दुसरी गोष्ट म्हणजे चीन डब्ल्यूएचओचा अमेरिकेच्या खालोखाल असलेला मोठा देणगीदार आहे! त्यामुळे कोरोनासंदर्भात वेळेत माहिती मिळाली नाही, हा ट्रम्प यांचा दावा अगदी खरा असला तरी, त्यासाठी डब्ल्यूएचओ नव्हे, तर चीन जबाबदार आहे. चीनने कोरोनासंदर्भातील माहिती सुरुवातीपासूनच दडवून ठेवली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी उचललेले पाऊल म्हणजे चोर सोडून संन्याशाचा बळी देण्याचाच प्रकार म्हणावा लागेल. या आततायी निर्णयामुळे अंतत: अमेरिकेचेच नुकसान होणार आहे, तर चीनचा फायदा होणार आहे. जागतिक व्यवस्थेतील अमेरिकेचे स्थान हस्तगत करण्यास चीन उतावीळ झाला आहे. दुसरीकडे तालिबानसोबत करार, डब्ल्यूएचओचा निधी गोठविणे अशा कृतींमधून अमेरिका अप्रत्यक्षरीत्या चीनची मदत करीत आहे. अमेरिकेने गोठविलेल्या निधीची चीनने भरपाई केल्यास आपसूकच त्या देशाचे जागतिक व्यवस्थेमधील वजन वाढणार आहे. चीनला तेच डोहाळे लागले आहेत आणि अमेरिका जणू काही चीनचे डोहाळे पुरविण्यासाठी कटिबद्ध आहे!जागतिक व्यवस्थेतील अमेरिकेचे स्थान हस्तगत करण्यास चीन उतावीळ झाला आहे. दुसरीकडे तालिबानसोबत करार, डब्ल्यूएचओचा निधी गोठविणे, अशा कृतींमधून अमेरिका अप्रत्यक्षरीत्या चीनची मदत करीत आहे.

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिका