शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

कानात इअरफोन्स आणि कर्णकर्कश डीजे बहिरे व्हाल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 11:17 IST

कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाचे आपले वेड आता लोकांना बहिरे करू लागले आहे; मनोरंजन म्हणजे कर्णकर्कश गोंगाट हे सार्वजनिक समीकरणच मुळात भयंकर होय

डॉ. नीता घाटे, कान, नाक, घसा तज्ज्ञ 

भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द या गावातील एका तरुणाला लग्नाच्या वरातीत डीजेच्या प्रचंड आवाजात बेधुंद होऊन नाचल्यामुळे कायमचे बहिरेपण आल्याची बातमी गेल्या आठवड्यात वाचली. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाचे आपले सार्वजनिक वेड आता लोकांना बहिरे करू लागले आहे.हे भयंकर होय.

पंचेंद्रियांतील एक महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे आपला कान. कानाच्या आरोग्याविषयी बरेच अज्ञान, अनास्था आणि गैरसमज आढळतात. कमी ऐकू येणे, बहिरेपणा यामागे गुंतागुंतीच्या प्रसूतीत बाळाला आलेल्या बहिरेपणापासून वृद्धापकाळामुळे ऐकू कमी येणे, असे अनेक प्रकार आहे. वर्तमान काळात मात्र तरुण पिढीने आपल्या कानांची वाट लावायची ठरवलेलीच असावी, असे चित्र दिसते. त्याचे प्रमुख कारण ज्याच्या-त्याच्या कानात खुपसलेले इअरफोन्स आणि हेडफोन्स! त्याशिवाय मोठ्या आवाजातले करमणुकीचे कार्यक्रम आणि मिरवणुकांमधला उन्मादी डीजे हे तरुण कानांचे सर्वात मोठे शत्रू होता.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार १२ ते ३५ वयोगटातील जगभरातील अंदाजे १ अब्ज तरुणांना चुकीच्या म्हणजेच धोकादायक पद्धतीने करमणुकीचे आवाज ऐकण्याच्या सवयीमुळे पुढे बहिरेपण येण्याची शक्यता आहे. प्रवास करताना, रस्त्याने चालताना आजूबाजूच्या गोंगाटात कानातली गाणी अविरत ऐकू यावीत, यासाठी आवाज प्रचंड मोठा ठेवला जातो. त्यातून कानाला इजा होण्याची शक्यता वाढतेच;शिवाय वाहन चालवत असताना कानात इअरफोन्स असतील तर अपघाताची शक्यताही वाढते.ध्वनीची तीव्रता डेसिबल्समध्ये मोजली जाते.साधारण संभाषण म्हणजे ६० डेसिबल्स तीव्रतेचे असते.सिलिंग फॅनचा आवाज ४० डेसिबल्सच्या आसपास असतो.मनोरंजनासाठीच्या कार्यक्रमांचे आवाज १०० डेसिबल्सच्या कितीतरी पुढेच असतात. आपल्या कानाचे तीन भाग असतात. बाहेरचा, मधला आणि आतील कान आतल्या कानामध्ये विशेष पेशी असतात. मोठ्या आवाजामुळे यांना कायमस्वरूपी इजा होऊ शकते व बहिरेपणा येऊ शकतो. या व्यतिरिक्त अतिमोठ्या आवाजामुळे हृदयाची धडधड वाढू शकते. यासाठी त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

जवळ असलेल्या व्यक्तीशीसुद्धा मोठ्या आवाजात बोलावे लागते, शेजारची व्यक्ती काय बोलते ते समजत नाही, कान दुखायला लागतो असे अनुभव आल्यास आजूबाजूचा गोंगाट धोकादायक आहे हे ओळखावे.अनेकदा कानात भुंग्याच्या गुणगुणण्यासारखे शिट्टीसारखे आवाज येतात. हे आवाज तात्पुरते अथवा कायमस्वरूपी असू शकतात. ऐकायला कमी येणे याचे प्रमाण कमी ते तीव्र स्वरूपाचे असू शकते. त्यामुळे बोललेले समजायला अवघड जाते. विशेषतः आजूबाजूला गोंगाट असेल तर हा त्रास जास्त जाणवतो. स्पष्ट ऐकू येत नसेल तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.श्रवणदोष आहे का, असल्यास त्याची तीव्रता किती याची चाचणी हा उपचारांचा पहिला टप्पा असतो. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी आवाज नियंत्रणाशी संबंधित कायदे आहेत. त्यांच्या पालनासाठी सर्वांनी आग्रह धरला पाहिजे. व्यक्तिगत स्तरावरही काही पथ्ये पाळली पाहिजेत.

१) मोठ्या आवाजाच्या ठिकाणी जाणे टाळा २) लाऊडस्पीकरजवळ थांबू नका ३) कानात आवाज आल्यास, ऐकू कमी येते, असे वाटल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या ४) इअरफोनचा आवाज कमी ठेवा. आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला आपल्या इअरफोनमधले ,गाणे ऐकू येत असेल तर तो आवाज कितीतरी जास्त आहे, हे ध्यानी घ्या ५) इअरफोन आणि हेडफोन्सचा सतत वापर टाळा ६) आजूबाजूला जास्त आवाज असेल उदा. रस्त्यांवर, बसमध्ये तर इअरफोन अजिबात वापरू नका.मोठ्ठा आवाज म्हणजे उत्तम मनोरंजन आणि प्रचंड गोंगाट म्हणजे मजा, ही समीकरणे आपण जितक्या लवकर बदलू तितके आपल्या सर्वांच्या कानांवर उपकार होतील.