शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरांना जास्त वेतन मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 10:31 IST

Doctors : देशासमोर आरोग्यविषयक आव्हानांबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांशी ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या वार्तालापाचा संपादित अंश!

 - डॉ. भारती पवार(केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  ) 

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांत इतर आजार वाढत आहेत; याविषयी सरकार काय करत आहे? कोविड-१९ च्या निवारणात भारताने अभूतपूर्व काम केले. देशात तयार झालेली लस २१९ कोटी लोकांना दिली गेली. हा एक विश्वविक्रम आहे. कोरोना झालेल्यांना मानसिक आजार आणि जीवनशैलीतील बिघाड, अशी लक्षणे दिसत आहेत; परंतु, त्याचबरोबर संसर्गजन्य रोगांची संख्याही वाढते आहे. आम्ही गावागावात आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्र उघडली आहेत. गावाकडच्या लोकांना उपचारासाठी शहरात येण्याची गरज लागू नये, असे पंतप्रधानांचे म्हणणे आहे. आम्ही उपचार सुविधा गावाकडे नेत आहोत. सरकार टेलीमेडिसीनवरही भर देत आहे.  - प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याच्या पंतप्रधानांच्या योजनेची सद्यस्थिती काय?पंतप्रधानांचे लक्ष  १२२ मागास जिल्ह्यांकडे आहे. आरोग्य क्षेत्रात आवश्यकता असलेल्या जिल्ह्यात झालेल्या कामाचे चांगले परिणाम दिसले. आज देशात २२ ‘एम्स’ तयार होत आहेत. 

- संयुक्त राष्ट्रांच्या मापदंडानुसार देशात डॉक्टरांची संख्या पुरेशी नाही. या दृष्टीने सरकार काय करते आहे?डॉक्टरांची उपलब्धता वाढविण्यासाठी आम्ही वैद्यकीय महाविद्यालयात पदवीस्तरावर ७३ टक्के जागा वाढवल्या आहेत. पदव्युत्तर स्तरावर हे प्रमाण ९० टक्के आहे. ‘पंतप्रधान आरोग्य पायाभूत सुविधा योजने’अंतर्गत सरकारने ६४ हजार कोटी रुपये खर्च केले. त्यातून ठिकठिकाणी उपचार सुविधा देण्यात येत आहेत. त्यातून प्रत्येक जिल्ह्यात अतीव दक्षता विभाग आणि निदान प्रयोगशाळा उघडल्या जात आहेत. चाचण्या प्रत्येक जिल्हा मुख्यालयातच होऊ शकतील.  कोरोनासारखी महामारी पुन्हा आली तर गाव आणि जिल्हा पातळीवर त्याचे परीक्षण आणि उपचार करता आले पाहिजेत, अशी काळजी आम्ही घेत आहोत. राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार देशातील बहुतेक ठिकाणी बालमृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे.- देशाची ८० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. केवळ ३० टक्के डॉक्टर्स या भागात काम करतात ही परिस्थिती कशी बदलणार आहात? आरोग्य हा जास्त करून राज्य सरकारांच्या अखत्यारितील विषय आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी राज्ये  वेगवेगळी पावले टाकत आहेत. ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरांना जास्त पगार देण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारही तसेच करणार आहे. एक हजार लोकसंख्येला एक डॉक्टर असे प्रमाण संयुक्त राष्ट्रांनी ठरवून दिले आहे. आपल्याकडे आयुष आणि दुसऱ्या वैद्यकीय पद्धती एकत्र करून आठशे लोकांच्या मागे एक डॉक्टर, असे प्रमाण होते. याशिवाय सरकार लोकांचा आरोग्य विमाही काढून देत आहे.- आयुष्मान भारत योजनेचा लाभ मागच्या वर्षी किती लोकांनी घेतला? ही जगातील सर्वांत मोठी वैद्यकीय विमा योजना आहे. देशातील दहा कोटी परिवार याचा फायदा घेत आहेत. आत्तापर्यंत जवळपास चार कोटी लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

- सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात आज देशासमोर सर्वांत मोठी आव्हाने कोणती आहेत?  देशातील प्रत्येक नागरिकाला अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारपुढचे सर्वांत मोठे आव्हान आहे. पंतप्रधान आरोग्य चिकित्सा पायाभूत योजनेअंतर्गत आम्ही कोरोनासारख्या महामारीशी लढण्याची तयारी करत आहोत. प्रत्येक गावात आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्र उघडून सर्वांवर उपचार करत आहोत. आत्तापर्यंत १२ लाख केंद्रं उघडली गेली आहेत. पंतप्रधान आयुष्मान भारत डिजिटल योजनेच्या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला एक डिजिटल आरोग्य आयडी तयार करून देण्यात येत आहे. त्या व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती, प्रयोगशाळेतील अहवाल त्या आयडीवर अपलोड केले जातील. ती व्यक्ती देशात कुठेही आजारी पडली तरी तिच्या सहमतीने संबंधित डॉक्टर संपूर्ण वैद्यकीय इतिहास एका क्लिकवर पाहू शकतील. त्यांना प्रत्येक ठिकाणी आपली फाइल घेऊन जाण्याची गरज असणार नाही. प्रत्येक रुग्णावरचे उपचार त्यामुळे अतिशय सुलभ होतील.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार