शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

देशाचा येमेन किंवा सिरिया करायचा आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 05:29 IST

प्रज्ञा सिंग भोपाळमध्ये माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.

प्रज्ञा सिंग भोपाळमध्ये माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. तिचा भगवा पोशाख पाहून एक वर्ग तिच्यामागे जाईलही. पण तिचे हिंदुरक्षक असणे कडव्या, कर्मठ, धर्मांध विचारांच्या चलतीसारखेच आहे.आपल्या देशाचा येमेन किंवा सिरिया करायचा आहे काय? त्या देशात शस्त्रधारी माणसे, मग ती वैध असोत वा अवैध, समाजावर आपली हुकूमत चालवितात. समाजातील बावळी माणसेही त्यांच्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्या शब्दाखातर हिंसा करतात. ती न जमली तर तिच्याकडे गौरवाने नसले तरी कौतुकाने पाहतात. कर्नल पुरोहित असे आदरणीय नाव धारण करणारी व्यक्ती समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट खटल्यात आरोपी ठरते. का? तर ती एक्स्प्रेस पाकिस्तानला जाणारी असते आणि त्यात भारतीयांसोबत पाकिस्तानचे नागरिकही बसले असतात. या व्यक्तीचा पाकद्वेष एवढ्या विषारी पातळीवरचा की पाकिस्तानी नागरिकांसोबत आपली भारतीय माणसे मृत्यू पावली तरी त्याला त्याचे फारसे काही वाटत नाही. त्याच्यावर खटला चालतो आणि वर्षानुवर्षे साक्षी-पुरावे होऊनही तपासात काही त्रुटी राहिल्याचे सांगून व संशयाचा फायदा देऊन न्यायालय त्याला निर्दोष सोडते. मायबाप सरकारही मग त्याचे लष्करात पुनर्वसन करते. परिणामी असा अधिकारी लष्करातील कनिष्ठांची पुन्हा सलामी घेऊ लागतो व देशातील बावळेही त्याच्याकडे कौतुकाने पाहू लागतात. त्याच्यावरचे इतर खटलेही मग दुर्लक्षिले जातात. ही पहिली पायरी आहे. दुसरी पायरी प्रज्ञा सिंग ठाकूर या स्वत:ला साध्वी म्हणविणाऱ्या दहशतखोर स्त्रीची आहे. ती मालेगावच्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. सुमारे दोन डझन निरपराध माणसे तिने मारल्याचा आरोप आहे. मोटारसायकलला बॉम्ब बांधून व त्यांचा स्फोट घडवून तिने हा हिंसाचार केला आहे. भारतीय अन्वेषण विभागाच्या सर्वाधिक गौरवान्वित असलेल्या हेमंत करकरे या अधिकाºयाने तिला अटक केली होती. तिच्याविरुद्धचे सगळे साक्षी-पुरावे त्यांनी अतिशय काळजीपूर्वक एकत्र केले. परंतु आठ वर्षे तुरुंगात राहिल्यावर ती जामिनावर सुटली. तिचे सुटणे महत्त्वाचे नाही.

ती सुटल्यानंतर समाजातील एका वर्गाने तिचा केलेला गौरव व तिच्या काढलेल्या मिरवणुका अनाकलनीय असतात. एवढ्यावर न थांबता ती सत्तारूढ भाजपकडे निवडणुकीचे तिकीट मागते आणि ते तिला दिलेही जाते. आताही प्रज्ञा सिंग भोपाळ क्षेत्रातून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. तिचा भगवा पोशाख व वय पाहून वेडावलेला एक वर्ग तिच्यामागे जाईलही. भाजप व संघ परिवार तिला हिंदुरक्षक म्हणून डोक्यावरही घेईल. पण तिचे हिंदुरक्षक असणे त्याच पातळीवरचे असेल ज्या पातळीवर तालिबान आणि अल कायदाचे ‘मुस्लीमरक्षक’ त्यांच्या धर्माचे रक्षक असतात. कडव्या, कर्मठ आणि धर्मांध विचारांची सध्या जगात चलती आहे. मूलतत्त्ववाद्यांचा वावर हा विषय सार्वत्रिक आहे आणि त्यांचे स्वागतही होते. हे आंधळे धर्मवेड केवळ अशिक्षितांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही तर समाजातील सर्वच थरांत ते पोहोचल्याचे पाहावयास मिळते. देशाच्या सर्वसामान्य नागरिकापासून ते अगदी देशप्रमुखापर्यंत हे अतिरेकी विचार पसरल्याचे अनेक देशांमध्ये दिसून येते.
ट्रम्पचा उर्मटपणा लोकांना आवडतो, इस्रायलमध्ये नेत्यान्याहूसारखा घमेंडखोर माणूस पाचव्यांदा पंतप्रधान होतो, रशियाच्या पुतीनला तहहयात अध्यक्षपद प्राप्त होते आणि चीनचे शी जिनपिंग आयुष्यभर देशाचे अध्यक्ष व चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचेही अध्यक्ष राहतील अशी व्यवस्था होते. भारतातील भाजपचा विजय, गुजरातमधील दंगलींच्या गुन्हेगारांची निर्दोष सुटका व त्यांची संसद आणि विधानसभेतील निवडणूक याच प्रकाराची निदर्शक असते. समाजाला समंजस, समन्वयी आणि समता व पुरोगामी विचार चालत नसावे. तसे विचारवंतही त्याला आवडत नसावे. दाभोलकर मारले जातात, पानसरेंचा खून होतो, कलबुर्गी व गौरी लंकेश यांना गोळ्यांनी ठार केले जाते. त्यांचे मारेकरी मोकळे असतात. त्यांना पकडणारी यंत्रणा सरकारजवळ नसते. ही स्थिती गुन्हेगारांना धर्माचे पाठबळ मिळाले की त्यांना सुटकेचे आश्वासन देणारी ठरते. याही पुढे जाऊन त्यांना सत्तेत सहभागी होता येते हे सांगणारीही असते. येमेन व सिरिया, इस्रायल व अरब देश यात याहून वेगळे काय होत असते? अशा राजकारणाने एखादा पक्ष सत्तेत येईलही पण देशाच्या भवितव्याचा विचार कोण करणार, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhopal-pcभोपाळ