शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

महामानवाच्या नावाला आपण बट्टा लावतोय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 03:53 IST

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतरासाठी एवढा मोठा लढा का दिला? विद्यापीठातील अनागोंदी पाहता या महामानवाच्या नावाला आपण बट्टा लावतोय का? असे प्रश्नामागून प्रश्न पडतात. बाबासाहेबांचे कर्तृत्व समाजकारण, राजकारण, अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये अफाट असले तरी शिक्षण आणि बाबासाहेब हे नातं अतूट आहे. किंबहुना याच क्षेत्रातील त्यांचे कर्तृत्व काकणभर सरस आहे. ...

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतरासाठी एवढा मोठा लढा का दिला? विद्यापीठातील अनागोंदी पाहता या महामानवाच्या नावाला आपण बट्टा लावतोय का? असे प्रश्नामागून प्रश्न पडतात. बाबासाहेबांचे कर्तृत्व समाजकारण, राजकारण, अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये अफाट असले तरी शिक्षण आणि बाबासाहेब हे नातं अतूट आहे. किंबहुना याच क्षेत्रातील त्यांचे कर्तृत्व काकणभर सरस आहे. परंतु, विद्यापीठात शिक्षणाचे जे काही धिंडवडे निघत आहेत, ते पाहता नामांतराचा आग्रह धरणाºया तमाम पुरोगाम्यांना पश्चातापदग्ध होण्याची वेळ आली. ‘अंधेर नगरी चौपट राजा; टका सेर भाजी, टका सेर खाजा’ ही म्हण येथे तंतोतंत लागू पडते. निर्णयांच्या बाबतीत कुलगुरू डॉ. बी.आर. चोपडे यांच्या कोलांटउड्या पाहिल्या तर आॅलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश केला तर त्यांचे सुवर्णपदक कोणीही हिसकावू शकणार नाही. आपल्या या निर्णय फिरवाफिरवीमुळे विद्यार्थ्यांचे किती नुकसान होत याची त्यांना फिकीर नसावी. गेल्या पाच महिन्यांतील घटना आणि निर्णयांवर नजर फिरविली तर याची खात्री पटते. अभियांत्रिकी परीक्षेतील गोंधळ लक्षात घेऊन गेल्या वर्षी त्यांचे ‘होमसेंटर रद्द’ केले होते. पुढे परीक्षेचा काळा आला आणि लटपटी-खटपटी करून अभियांत्रिकी महाविद्यालये चालविणाºया मंडळींनी आकांडतांडव सुरू केले. त्यांच्या दबावापुढे सपशेल लोटांगण घेत कुलगुरूंनी होमसेंटर प्रदान केले.दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या ‘कॅरी आॅन’चा. या परीक्षेला दोन विषयांसाठी ए.टी.के.टी. दिली जाते. पण, त्याही पुढे जाऊन संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांच्या दबावापुढे झुकून दुसºया वर्षासाठी सरसकट ‘कॅरी आॅन’ दिला. नियमांची अशी विधिनिषेध शून्य मोडतोड ही एका नव्हे तर अनेक घटनांमधून दिसते. आपल्या निर्णयापुढे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा आणि त्याची प्रतिमा यावर काय परिणाम होईल याचा विचारच होत नाही.यावर्षी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘सीईटी’ घेण्याचा निर्णय झाला. परंतु, या पद्धतीला संस्थाचालक आणि प्राचार्यांनी कडाडून विरोध केल्यामुळे सुरू झालेला घोळ दोन महिने चालला. शेवटी आॅनलाईनऐवजी आॅफलाईन ‘सीईटी’चा निर्णय घेण्यात आला. त्यातही पुन्हा घोळ घातल्याने ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा, त्याऐवजी ज्या पदवी परीक्षेत उत्तीर्ण झाले तेच प्रश्न ‘सीईटी’मध्ये विचारण्यात आले. विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यसक्रमाच्या २३ हजार जागा आहेत; पण या गोंधळामुळे १९१०० विद्यार्थ्यांनीच ही परीक्षा दिली. निकालानंतर कागदपत्रे पडताळणीला १३ हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. अशा स्थितीत गुणवत्तेच्या दोन याद्या जाहीर करून आणखी गोंधळ वाढविला. जे विद्यार्थी मेरिटचे पण यादीत नाही अशी अवस्था. किती प्रवेश झाले याची आकडेवारी तयार केली तेव्हा प्रवेशच दिले गेले नाही हे समोर आले. अनेक विभाग ओस पडले. त्यावर कळस म्हणजे ‘स्पॉट अ‍ॅडमिशन’चे आदेश काढले. पण स्पॉट महाविद्यालयाऐवजी विद्यापीठ ठेवले. पार उमरगा, उस्मानाबादेपासून विद्यार्थी आले; पण फॉर्ममध्ये असंख्य चुका, गचाळ नियोजन यामुळे वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. कु लगुरूंना घेराव घातला. शेवटी स्पॉट अ‍ॅडमिशन झाले नाही. दरवर्षी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन १५ जुलैपर्यंत तासिका सुरू होतात. त्याला यावर्षी सप्टेंबर उजाडणार. १८० दिवसांचे शैक्षणिक वर्ष कसे पूर्ण करणार? हा खेळ विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळला जातो याचे भान नाही. यात विद्यापीठाचे धिंडवडे निघत आहे. मराठवाड्यातील विद्वान, बुद्धिजीवींनाही याची खंत नाही ही खेदाची बाब आहे.महंमद तुघलक नावाचा सम्राट हा इतिहासात अजरामर झाला तो वेगळ्या अर्थाने. त्याने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलविली आणि पुन्हा दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अपरिपक्व नेतृत्व ज्यावेळी अविचारी निर्णय घेते त्याच्या या कारभाराला ‘तुघलकी कारभार’ असे म्हटले जाते. बाबासाहेबांच्या या विद्यापीठातील गोंधळ यापेक्षा वेगळा नाही. तुघलक गेले पण त्यांचे वंशज वारसा चालवत आहेत भलेही किती पिढ्या बर्बाद हा होईनात.- सुधीर महाजन

टॅग्स :Studentविद्यार्थी