शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

मूलभूत गरजेवर ‘कर’ नकोच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 02:17 IST

केंद्र शासनाने वस्तू सेवा कर जाहीर केल्यानंतर त्यात महिलांसाठी आवश्याक असणाºया सॅनिटरी नॅपकिन्सवर कर लावला गेला. त्यामुळे देशाच्या कानाकोपºयातून याविषयी तीव्र पडसाद उमटले.

केंद्र शासनाने वस्तू सेवा कर जाहीर केल्यानंतर त्यात महिलांसाठी आवश्याक असणा-या सॅनिटरी नॅपकिन्सवर कर लावला गेला. त्यामुळे देशाच्या कानाकोपºयातून याविषयी तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी काही ठिकाणी याविषयी आंदोलन, मोहिमा आणि निषेधही केला. मात्र अजूनही केंद्र शासनाने याविषयी कोणतेही पाऊल उचलले नाही. राजकीय पक्षांतील महिला नेत्यांनीही आवाज उठवून केंद्र शासनाला हा कर रद्द करण्याची मागणी केली आहे.सॅनिटरी नॅपकिनवर केंद्र सरकारने १२ टक्के कर आकारला आहे. याआधीच्या कररचनेप्रमाणे सॅनिटरी नॅपकिन्सवर १४.५ टक्के कर आकारण्यात येत होता, तो आता १२ टक्क्यांवर आला आहे. पण सिंदूर, बांगड्या, टिकल्या, आल्ता यासारखी सौंदर्यप्रसाधने सरकारने करमुक्त केलेली असताना स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणाºया सॅनिटरी पॅड्सवर १२ टक्के कर लावणे कितपत योग्य आहे, हा खरा प्रश्न आहे. ही सौंदर्यप्रसाधने न वापरल्यामुळे स्त्रियांचे कोणतेही नुकसान होणार नाही, पण सॅनिटरी पॅड्स वापरणे आरोग्याच्या दृष्टीने स्त्रियांसाठी आवश्यक आहे.महिलांना ‘त्या’ दिवसांमध्ये अत्यंत गरजेच्या असलेल्या सॅनिटरी नॅपकिनवर कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे तमाम तरुणी, महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. हा निर्णय जाहीर झाल्यापासून वेगवेगळ्या स्तरामधून तरुणी, महिला आवाज उठवत असल्या तरी अद्याप तरी महिलांना दिलासा मिळेल असा निर्णय घेण्यात आलेला नाही. मासिक पाळी हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. पाळीच्या दिवसांमध्ये रोजची कामे नीट पार पडावी याकरिता तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिन ही महत्त्वाची गरज असते. पण दुर्दैवाची बाब म्हणजे, महिलांना यासाठीदेखील झटावे लागत आहे. देशातील ३५.५ कोटी स्त्रियांपैकी फक्त १२ टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करतात. म्हणजेच उरलेल्या ८८ टक्के स्त्रिया अजूनही पारंपरिक पद्धतीने कपड्याचा वापर करत असल्याची बाब एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. शहरी भागातील महिला, तरुणी सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करत असल्या तरी ग्रामीण भागात म्हणावा तसा सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर होताना दिसत नाही. पाळीच्या कालावधीमध्ये प्रचंड अशक्तपणा, नैराश्य येते, रक्तस्राव होत असतो. त्यातच नीट स्वच्छता न राखल्यास गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा संभव असतो. आरोग्याच्या दृष्टीने हे चित्र बदलण्याची गरज आहे. त्यामुळे महिलांसाठी काम करणाºया काही संस्थांकडून ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करण्यासाठी जनजागृती केली जाते. त्यामुळे उशिरा का होईना, हळूहळू तिकडे चित्र आता बदलताना दिसत आहे. त्यातच यावर १२ टक्के कर लावणे अत्यंत चुकीचे आहे. सरकारने पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन्सच्या उत्पादनाचा प्रचार करायला हवा. त्यामुळे जीएसटीमधून सॅनिटरी नॅपकिन्सला वगळल्यास तमाम महिला, तरुणींना दिलासा मिळेल.

टॅग्स :Taxकर