‘मुक्काम पोस्ट’ गावात नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:29 AM2017-11-14T00:29:34+5:302017-11-14T00:29:56+5:30

गावात नसणा-या पशुवैद्यकांना निलंबित करा, हे सामान्य जनतेच्या मनातील विधान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी परवा नागपुरातील एका कार्यक्रमात केले.

 Do not stay in the 'stay' post | ‘मुक्काम पोस्ट’ गावात नको

‘मुक्काम पोस्ट’ गावात नको

Next

गावात नसणा-या पशुवैद्यकांना निलंबित करा, हे सामान्य जनतेच्या मनातील विधान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी परवा नागपुरातील एका कार्यक्रमात केले. क्षणभरासाठी सा-यांनाच हायसे वाटले. गडकरी बोलले म्हणजे आता पशुवैद्यकीय अधिकारी गावात जातील, तिथेच मुक्काम करतील, प्रामाणिकपणे सेवा देतील असे कुणाला वाटले असेल तर ती एक काव्यात्मक कल्पनाच समजावी. गडकरीच नव्हे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील वारंवार यासंदर्भात खंत व्यक्त केली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील त्यांच्या जनता दरबारात ऊर्जाखात्यातील अशा अनिवासी, प्रवासी अधिका-यांना निलंबित केले होते. गावातील सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत साºयांच्याच मुखातील ही चिंता आहे. पण त्याचे फलित अद्यापही सापडलेले नाही. केवळ पशुवैद्यकीय अधिकारीच नाही तर शिक्षक, ग्रामसेवक, पटवारी, बँकेचा अधिकारी, डॉक्टर असे कुणीही सरकारी-निमसरकारी अधिकारी-कर्मचारी गावात राहायला तयार नाहीत. कारण गावकºयांच्या सेवेपेक्षा सर्वांना स्वत:ची नोकरी व कुुटुंबीय अधिक प्रिय आहेत. सरकारने दबाव टाकला, इशारे दिले, विशेष भत्तादेखील दिला. मात्र तरीदेखील ही मंडळी गावात मुक्कामी राहत नाहीत. या अधिकारी-कर्मचाºयांचे गावात नावालाच घर असते. ते कागदोपत्रीच असते. सरकारच्या फाईल्समध्ये पत्ता एक आणि प्रत्यक्ष मुक्काम वेगळाच, असे चित्र दिसून येते. त्यांच्या या चलाखीला वरिष्ठांचे पाठबळ असल्यामुळे, किंबहुना त्यांच्यातील तो देवाण-घेवाणीतील व्यवहार असल्याने त्याबाबत कुणाचीही तक्रार राहत नाही. याचा फटका गावकºयांना सहन करावा लागतो. पाणी डोक्यावरुन गेले की गावकरी याविरुद्ध आवाज उठवितात, अधिकाºयांना निवेदन लिहून देतात. पण याचा काडीमात्रही उपयोग होत नाही. या निवेदनांना गंभीरतेने घेण्यातच येत नाही. कर्मचारी संघटनांच्या पाठबळामुळे या कर्मचाºयांना कुणाचीही भीती नाही. एरवी सरकारविरुद्ध आक्रमक होणाºया संघटना या विषयांबाबत नमते घेतात. ‘तुम्ही गावातच राहा’, असे सांगण्याचे धाडस अद्याप एकाही कर्मचारी संघटनेत नाही. नितीन गडकरी यांचा हा संताप प्रातिनिधिक आहे. त्यांचे मूळ गाव असलेल्या धापेवाडा येथील ‘डेअरी फार्म’ पशुवैद्यकांच्या बेजबाबदारपणामुळे बंद करावे लागले. इथे देशाचा एक वजनदार नेता एका सामान्य पशुवैद्यकासमोर हतबल होतो, तेथे इतरांची काय अवस्था?

Web Title:  Do not stay in the 'stay' post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.