शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमध्ये कुणाचीही दिशाभूल करू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 03:11 IST

कर लावताना किंवा गोळा करताना करदात्याने सावधानता बाळगावी.

- उमेश शर्मा, सीएअर्जुन : (काल्पनिक पात्र) कृष्णा, जीएसटीमध्ये चुकीचे दर लावणे म्हणजे काय?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुन, चुकीचा दर लावणे याचा अर्थ असा की, करदात्याकडून वस्तू व असलेल्या दरापेक्षा कमी किंवा जास्त कर रक्कम गोळा करणे.उदा. एखादा फळविक्रेता केळी विकत असेल. जीएसटीमध्ये करमुक्त आहे, परंतु त्या विक्रेत्याने चुकीने १२ टक्के दर लावला, तर त्याला त्या कृतीवर दंड भरावा लागेल, तसेच शीर्षकामध्ये सांगितल्याप्रमाणेच जीएसटीमध्ये कुणाचीही दिशाभूल करू नका, म्हणजेच करदात्याने कोणतीही चूक करू नये व कायद्याचे पालन करावे.अर्जुन : कृष्णा, एका अभिनेत्याने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे आणि तो खूप चर्चित झाला व वादविवादासाठी पात्र ठरला, तर त्यात नेमके काय आहे?कृष्ण : अर्जुन, अभिनेत्याने नुकतेच मागील आठवड्यात टाकलेल्या व्हिडीओमध्ये त्यास केळ्यांच्या जोडीसाठी ४४२.५0 रुपये द्यावे लागले, हे दर्शविले आहे. व्हिडीओमध्ये दाखविलेल्या बिलाप्रमाणे करापूर्वीची रक्कम ही ३३५ रुपये दोन केळींसाठी आणि त्यावर १८ टक्के जीएसटी असे दर्शविते.

तसेच त्यावर चंदीगड केंद्रशासित प्रदेशच्या विभागातर्फे कारणे दाखवा नोटीस अंतर्गत योग्य कारण न मिळाल्यामुळे २५ हजार रुपये दंड लावण्यात आला. वरील उदाहरणावरून प्रश्न असा निर्माण होतो की, केळीच्या करमुक्त वस्तूवर हॉटेल कशा प्रकारे १८ टक्के कर लावू शकते? परंतु हॉटेल हे सेवा पुरविणारी संस्था आहे आणि हॉटेलच्या सोयीनुसार ५ टक्के किंवा १८ टक्के हा कर लावू शकते, तसेच ५ स्टार हॉटेलसाठी २८ टक्के दरसुद्धा आहे. तर कर लावण्यापूर्वी लागू असलेला जीएसटी कर निश्चित करणे गरजेचे आहे.
अर्जुन : कृष्ण, चुकीचा दर लावल्यासंबंधी कोणता दंड आहे?कृष्ण : अर्जुन सीजीएसटी कायद्यामध्ये कलम १२२ अंतर्गत चुकीच्या दरासंबंधी असलेले दंड नमूद केले आहे. कलम १२२ नुसार जर एखाद्या नोंदणीकृत व्यक्तीने जी वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हींचा ही पुरवठा करत असेल व त्याने कर कमी अथवा भरला नसेल किंवा चुकून परत केला असेल, तर त्यास दंड म्हणून-अ) १0 हजार रुपये किंवा,ब) त्या व्यक्तीकडून देय असलेल्या कराच्या १0 टक्के यांपैकी जी रक्कम जास्त असेल, ती गोळा करण्यात येईल.अर्जुन : कृष्ण, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुन, करदात्याने लागू असलेलेच दर जीएसटीअंतर्गत लावावे. जर समजा करदात्याने चुकीने जास्त कर गोळा केला असेल, तर त्याला तो सरकारला परत करावा लागेल. कर लावताना किंवा गोळा करताना करदात्याने सावधानता बाळगावी. तात्पर्य, ‘जीएसटी में किसको नहीं बनाना’ म्हणजेच ‘उल्लू बनाना’ हे चुकीचे दर लावण्याच्या संदर्भात म्हटले जाते.

टॅग्स :GSTजीएसटी