शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

विशेष लेख - न डरेंगे, न झुकेंगे! - शाह यांचा चीनला इशारा

By विजय दर्डा | Published: April 17, 2023 10:08 AM

Amit Shah's warning to China: भारत-चीन सीमेवरील किबिथू या गावातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या गर्जनेचे पडसाद चीनला नक्कीच ऐकू गेले असतील.

- डॉ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

चीनच्या आक्रमक वृत्तीला भारताकडून दिले जाणारे प्रत्युत्तर पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तराइतके कडक असत नाही, असा आरोप भारताच्या देशांतर्गत राजकारणात केंद्र सरकारवर कायमच होत आला. मग सरकार कुठल्याही पक्षाचे असी. सामान्य माणसालाही जवळपास असेच वाटत असते.

मात्र, गेल्या आठवडयात अरुणाचल प्रदेशात लागून असलेल्या सीमेपासून केवळ २९ किलोमीटर अंतरावरील फक्त १,२०० लोकसंख्या असलेल्या किबिथू या शेवटच्या भारतीय गावात जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निडर आणि स्पष्ट संदेश दिला आहे. हा १९६२ चा भारत देश नाही. आमची इंचभरही जमीन ... कोणी हडप करू शकत नाही।"

अगदी अलीकडेच चीनने त्यांच्या नकाशावर अरुणाचलमधील आणखी काही शहरांची नावे तिसऱ्यांदा बदलली. हे आम्हाला मान्य नाही, असे भारताने कळविले तेव्हा पुन्हा आरोप झाला की, चीनला इतका मवाळ प्रतिसाद का? त्यानंतर लगेच अमित शाह 'व्हायब्रंट व्हिलेज' योजना सुरू करण्यासाठी किबिथूला पोहोचले. हा व्हायब्रंट व्हिलेज' कार्यक्रम काय आहे? हे आधी सांगितले पाहिजे. सीमेवर वसलेल्या गावांच्या विकासाची हमी देऊन युद्धाची तयारी करत राहणे ही चीनची रणनीती सगळे जग जाणते. अरुणाचलपासून लडाखपर्यंत चीनने रस्ते तयार केले. जेणेकरून सीमेवर जलद गतीने आपले सैनिक पोहोचवता येतील. चीनने नवी गावेही वसवली. याला उत्तर एकच होते की. भारतानेही सीमेवरच्या आपल्या गावांपर्यंत सुविधा पोहोचविल्या पाहिजेत त्यासाठी ४,८०० कोटी रुपयांची एक केंद्रीय योजना मंजूर झाली आहे. केवळ रस्ते बांधण्यासाठी त्यात २,५०० कोटी रुपयांची तरतूद आहे. अरुणाचल, सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल आणि लडाखमध्ये सीमावर्ती १२ जिल्ह्यातील २,९६७ गावांमध्ये ही व्हायब्रंट व्हिलेज' निर्माण केली जाणार आहेत. किंवियू हे या योजनेतील पहिले गाव! 

किबिथू हेच गाव का? तर जरा इतिहासात डोकावून पाहू.  १९६२ साली याच गावात भारत आणि चीनची भीषण लढाई झाली होती. २१ ऑक्टोबर १९६२ ला विजय दर्डा कुमाऊं रेजिमेंटच्या सहा अधिकाऱ्यांनी कमालीचे शौर्य दाखवून इतिहास निर्माण केला. चिन्यांना मागे हटावे लागले. भारतीय सैन्याच्या इतिहासात या लढाईकडे अत्यंत सन्मानाने पाहिले जाते. केंद्रीय गृहमंत्री 'व्हायचं व्हिलेज' कार्यक्रम सुरू चीनला इशारा देण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे. असे मानले जाते, ते त्यामुळेचा अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरपासून हे गाव सुमारे ६०० किलोमीटर दूर आहे. चीनच्या सीमेच्या दिशेने असलेले हे शेवटचे गाव; परंतु नजरिया बदलला आहे हे सांगून अमित शाह म्हणाले, "हे शेवटचे नव्हे तर पहिले गाव आहे.

नजरिया बदलाचा संदेश भारताने 'जी २०' बैठकीतही दिला आहे. चीनने पुष्कळ विरोध केला. परंतु 'जी २०'ची बैठक इटानगरमध्ये झाली. ५० पेक्षा अधिक प्रतिनिधींनी या बैठकीत सहभाग घेतला. 'जी २०' ची बैठक आता २२ ते २४ मे दरम्यान श्रीनगरमध्ये होईल. कदाचित चीन या बैठकीला येणारही नाही परंतु भारताने चीनची पर्वा करण सोडून दिले आहे. १९६२ च्या युद्धात अरुणाचल प्रदेशच्या जवळपास अर्ध्या भागावर चीनने कब्जा केला होता. त्यावेळी या भागाला नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी' (नेफा)  म्हणून ओळखले जात असे. १९७२ मध्ये अरुणाचलला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता मिळाली आणि १९८७ साली ते पूर्ण राज्य झाले. १९६२ च्या युद्धात चीनने केलेल्या कब्जाची गोष्ट मी सांगत होतो. चीनला वाटले असते तर त्यांनी या भागावरील हक्क सोडला नसता; मग चीनने तो भाग परत का दिला? वास्तवात चीनला हे माहीत होते की, झुकणार अरुणाचलमधील लोक चीनचे शासन कधीही स्वीकारणार नाहीत. मोठे दंड होईल म्हणून कब्जा सोडून देण्यात आपले हित आहे हे चीनने जाणले.

मग आता चीन अरुणाचलवर दावा का करतो ? असा प्रश्न निर्माण होईल. चीनला हे माहीत आहे की, भारत आपल्या सर्वांगीण विकासावर सध्या लक्ष देत आहे. अर्थव्यवस्था, उद्योगांपासून पायाभूत सुविधापर्यंत भारताने खूपच मोठी झेप घेतली आहे. हा देश आता पाचवी आर्थिक शक्ती झाला आहे आणि २०४० पर्यंत तिसरी शक्ती होईल. अरुणाचलातील शिओमी जिल्ह्यात युरेनियम शोधण्यात भारताने पुष्कळच प्रगती केल्याचे चीनला माहीत आहे. या प्रगतीने चीनचा भडका उडतो. मग तो भारताचे लक्ष विचलित करण्यासाठी असे चिमटे काढत राहतो, कधीही आपल्या शहरांची नावे परस्पर बदलतो तर कधी भारताचे पंतप्रधान मंत्री अरुणाचलच्या दौऱ्यावर गेले तर विनाकारण त्याला आक्षेप घेतो. कधी सीमेवर उत्पात करतो. आपले जवान चिन्यांना ठोकून काढतात, तर चकमकीत आपले किती सैनिक मरण पावले हेही तो देश सांगत नाही.अमेरिकेने पाकिस्तानला भारताविरुद्ध लढण्यासाठी पॅटन रणगाडे दिले होते आणि आपण त्याचे खेळ करून टाकले हे चीनला ठाऊक नाही काय ?

सीमेवरील गावात जाऊन अमित शाह यांनी चीनला कडक इशारा दिला आहे की, तू जर १०० किलो वजन गटातला पहिलवान असतील तर आम्ही काही १०  किलोचे पहिलवान नव्हे लक्षात ठेव, ६० किलोचा पहिलवान सुद्धा १०० किलो वजनगटातील पहिलवानाला चितपट करतो। शत्रूला आम्ही कमजोर मानत नाही; परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की. तुम्ही डोळे वटारावेत. आम्हाला चिमटे काढावेत १९६२ च्या युद्धात आमच्या सैनिकांकडे शून्यापेक्षा कमी तापमानात घालायचे कपडेही नव्हते. आता आमच्या सैनिकांकडे सहा पदरी गरम कपड़े आहेत आणि ते सियाचीन हिमनदीच्या प्रदेशात पूर्ण वर्षभर पहारा देत असतात. परिस्थिती कशीही असो, आम्ही ना घाबरणार, ना  झुकणार. 

व्यक्तिगत पातळीवर एक भारतीय नागरिक या नात्याने मी चीनला हे जरूर सांगू इच्छितो की, अशा खोड्या काढणे, बंद करावे आणि भगवान बुद्धाच्या रस्त्याने चालावे. बुद्धाला तसेही तुम्ही त्यागलेच आहे. आम्ही मात्र भगवान बुद्ध भगवान महावीर आणि गांधीजींनी दाखवलेल्या रस्त्यानेच आत आहोत. सत्य आणि अहिंसा आमची सर्वात मोठी ताकद आहे. आमच्याकडे सर्व धर्म समभाव आहे. तुम्ही तर धर्म सोडूनच दिला आहे लोक लपून छपून पूजा, प्रार्थना करतात. आमच्याकडे लोकशाही आहे. लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेले नेतृत्त्व आहे. तुम्ही तर आपल्या लोकांचा आवाज बंद करून टाकला आहे. तुमच्या परी बडखोरी उपजते आहे. ती बंदुकीच्या जोरावर कुठपर्यंत रोखाल ? दुसऱ्याला नष्ट करण्याचे चक्र फिरवाल, तर एक दिवस जग तुमच्याकडचे सामान खरेदी करणे बंद करून टाकील. त्या दिवशी तुम्ही जमिनीवर यात तुमची ताकद आम्ही उत्तम प्रकारे जाणून आहोत. भ्रमात राहू नका. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशindia china faceoffभारत-चीन तणाव