शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी, पोलीस आणि आर. आर. आबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 05:42 IST

पोलिसांना घरच्या मंडळींबरोबर एकही सण साजरा करता येत नाही, याचे आबांना मोठे दु:ख होते! ते म्हणत, सणावारातसुद्धा तणाव; पोलीस काय करतील?

- वसंत भोसलेसंपादक, लोकमत, कोल्हापूरदिवाळी पाडव्याला वृत्तपत्रांना सुट्टी असते. दुसऱ्या दिवशीचा अंक प्रसिद्ध होत नाही. वर्षातून मिळणाऱ्या पाच सुट्ट्यांपैकी एक साजरी करीत त्या दिवशी सांगलीत घरी थांबावे वाटे. मात्र, आम्हा पत्रकारांचे मित्र आर. आर. आबा पाटील यांनी एक ओढ लावून ठेवली होती. दिवाळी पाडव्याला सांगली जिल्ह्यातील त्यांच्या अंजनी या छोट्या गावात तीन दिवस मुक्कामास आलेल्या आबांना भेटायला जायचे आणि गप्पागोष्टी करायच्या.

उपमुख्यमंत्री असताना ते गृहमंत्रिपदही सांभाळत होते.  प्रोटोकॉल असल्याने नेहमी प्रचंड पोलीस बंदोबस्त असायचा; पण  दिवाळीचे ते तीन दिवस अपवाद असत. वसूबारसेच्या सायंकाळी गावी पोहोचताच गाडीतून उतरल्यावर आबा पोलिसांना प्रेमाने निरोप द्यायचे, ‘तीन दिवस गावी जा. दिवाळी पाडवा संपल्यावर या! मी कोठेही जाणार नाही. २००५च्या दिवाळीला आबा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एक वर्षाने आम्ही पत्रकार  गेलो.   वातावरणच तसे होते. एकच लालदिव्याची गाडी झाडाखाली उभी होती. त्यांचे गावाकडील स्वीय सहायक पी. एल. कांबळे आणि बाळू गुरव यांना भेटून चौकशी केल्यावर कळले, आबा आहेत की! पलीकडच्या गल्लीत श्यामरावतात्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांना भेटायला गेलेत अन् पाच-दहा मिनिटांत पांढऱ्या पॅंटच्या दोन्ही खिशात हात घालून स्लिपर ओढत आलेच ते! गावभर चालतच फिरायचे.  पोलिसांचा ताफा आणि ‘सरा बाजूला मंत्रिमहोदय येत आहेत’, हा सर्व रुबाब गायब असायचा.  विचारल्यावर  म्हणायचे, ‘दिवाळीच्या सणाला पोलिसांना सुट्टी दिली आहे. हा एकमेव असा सण आहे की, ज्यावेळी पोलीस बंदोबस्त लागत नाही, अन्यथा  सणवार आनंद साजरा करणारे असतात; पण सणवारातही समाजात कधी तणाव निर्माण होईल, हे सांगता येत नाही. याची फार खंत वाटते. आपला समाज कधी प्रगल्भ होणार?  गणेशोत्सवात अकरा दिवस पोलिसांना एक दिवस सुट्टी मिळत नाही हो!!’- असे ते अत्यंत कळवळून सांगत राहायचे. वारंवार पोलिसांचा आणि बंदोबस्ताच्या यंत्रणेचा संपर्क येत असूनही हे कधी लक्षात आले नव्हते. सर्वत्र पोलीस उभे आहेत, म्हणजे किती चोख कारभार आहे, असे वाटायचे. आबा सांगायचे , गणेशोत्सवात मुंबईत पोलीस तीन-तीन दिवसांनी घरी जातो. थोडी झोप काढून परत येतो. त्याला घरच्या मंडळींबरोबर सणही साजरा करता येत नाही. गणेशोत्सवाच्या सजावटीचे साहित्य खरेदीला मुलांबरोबर न गेलेल्या असंख्य पोलिसांशी माझे नेहमी बोलणे होते, त्यांचे दु:ख कोणाला कळणार?’

आबा तसे बातम्यांचा झराच होते. दिवाळी पाडव्यादिवशी मात्र एकही बातमी करायची नाही. उद्या तुमचे पेपरच निघणार नाहीत, बरे झाले, असे म्हणत मनमोकळ्या गप्पा मारत बसायचे. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींना खासगी आयुष्यातील आनंदाचे क्षण फारच दुर्मीळ असतात.  काहीवेळा मुलगा रोहितची भेटदेखील व्हायची नाही. दौरे करून येईपर्यंत तो झोपलेला असायचा. सकाळी लोकांच्या भेटीगाठीत आबा असायचे तेव्हा रोहित शेजारच्या सावळज गावातील इंग्रजी शाळेत पोहोचलेला असायचा. एकदा मी त्यांच्या गाडीतून तासगावला येत होतो.  रोहितला मोटारसायकलवरून घेऊन येताना दिसताच आबांनी गाडी थांबवायला सांगितली आणि गाडीतूनच भेट घेतली. तेव्हा रोहित विचारत होता, आबा, सर्व पोलीस गेले का? कारण रोहितचे लाड पोलीस करीत असत. 

दिवाळी पाडव्याची ही भेटीची परंपरा सलग दहा वर्षे चालू होती. २०१५ च्या १६ फेब्रुवारीला आबा गेले आणि  अंजनीची वारी खंडित झाली. आजच्या पाडव्यानिमित्त ते दिवस आठवले की, सद्‌गदित व्हायला होते. एक जिंदादिल कार्यकर्ता, सामान्य माणसांच्या मनात डोकावणारा आणि त्याचवेळी सतत बातम्यांचा झरा त्यांच्या मुखातून वाहत असायचा. त्यामुळे  पत्रकार मंडळी जाम खुश असत! राज्याचे नेतृत्व करायच्या गणिताची कोष्टके त्यांच्या मनात सोडविण्याचा नेहमी प्रयत्न असायचा हे  फारच कमी जणांना माहीत होते. असे आबा, पोलीस आणि आजचा दीपावली पाडवा!

टॅग्स :Policeपोलिस