शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख - कृष्णा खोऱ्यातील विघ्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 05:18 IST

महाराष्टÑ आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी याच बैठकीत दुसरा एक निर्णय घेतला आहे, तो स्वागतार्ह आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानास भेट देऊन श्रीगणरायाचे दर्शन घेतले. शेजारच्या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे ती केवळ गणरायाच्या दर्शनापर्यंत मर्यादित राहणार नाही, हे स्वाभाविक आहे. कृष्णा नदीच्या खोºयात गेल्या महिन्यात जो महाप्रलयकारी महापूर आला होता, त्यावर चर्चा होणे अपेक्षित होते. कृष्णा खोºयातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये जो हाहाकार माजला, तसाच तो उत्तर कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, रायचूर, यादगीर आदी जिल्ह्यांतही माजला होता. कृष्णा नदीवर कर्नाटकाने बागलकोटजवळ जे अलमट्टी धरण बांधले आहे, त्यातून पाण्याचा विसर्ग वेळेवर न केल्याने महाराष्ट्रात कृष्णा आणि तिच्या उपनद्यांना महापुराचा धोका वाढला, असा समज झाला आहे.

वास्तविक महाराष्ट्रात पाणलोट क्षेत्र आणि मुक्त पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी झाली. परिणामी, धरणे भरल्याने विसर्गही सुरू करण्यात आला. कृष्णा नदी कर्नाटकात प्रवेश करते, त्या ठिकाणाहून सुमारे साडेतीन लाख क्युसेक पाणी जात होते. याशिवाय कर्नाटकात दूधगंगा आणि घटप्रभा नद्या अलमट्टी धरणाच्या पश्चिमेला मिळतात. त्यामुळे अलमट्टी धरणात चार लाख क्युसेकने पाणी येत होते. याची नोंद घेत, कर्नाटकाने साडेचार लाख क्युसेक पाणी खाली सोडून देताच, रायचूर, यादगीर आणि बागलकोट जिल्ह्यांत महापुराने हाहाकार माजला. तेव्हा कर्नाटकने मागणी केली की, महाराष्ट्राने विसर्ग कमी करावा, पण अतिवृष्टीमुळे धरणातील साठा करून ठेवणे शक्य नव्हते. हा समन्वयाचा अभाव होता. कृष्णा खोºयातील महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्र, तेथे पडणारा पाऊस आणि नदीमध्ये येणाºया पाण्याचे प्रमाण याचा हिशेब घालूनच कर्नाटकने आपले धोरण ठरवायला हवे. या गोंधळाच्या स्थितीत नियंत्रण आणि समन्वय ठेवण्यासाठी फडणवीस-येदियुराप्पा यांच्या बैठकीत उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय झाला. त्याचे स्वागत करायला हवे. वास्तविक २००५ मध्ये आलेल्या महापुरानंतर असा समन्वय ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती करण्याचे ठरले होते. त्याचप्रमाणे, काही अधिकारी काम पाहत होते. मात्र, त्याला समितीचे स्वरूप देण्यात आले नव्हते. या वर्षीच्या महापुराने मागील शंभर वर्षांतील सर्व रेकॉर्ड मोडले. कृष्णेचा उगम ज्या महाबळेश्वरजवळच्या जोर गावाजवळ होतो, तेथे या वर्षी सात हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा आजवरचा सर्वाधिक पाऊ स आहे. यासाठी महाराष्ट्राला दोषी धरता येणार नाही आणि कर्नाटकाने पाणी कमी सोडा, अशी मागणी करणेही हास्यास्पद आहे. कृष्णा खोºयातील नद्यांची साखळी आहे. त्यामध्ये किती पाऊस पडतो आणि नदीला किती पाणी येऊ शकते, याचा सातत्याने नियंत्रणवजा अभ्यास दोन्ही राज्यांनी संयुक्तपणे करून, महापुरावर नियंत्रण राखण्याचे तंत्र अवगत करायला हवे आहे.

महाराष्टÑ आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी याच बैठकीत दुसरा एक निर्णय घेतला आहे, तो स्वागतार्ह आहे. आंतरराज्य नद्यांचे पाणी लवाद कायदा १९५६ मध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार, कृष्णा खोºयातील महाराष्टÑ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यांनी पाणी वाटून घेण्यावर निर्णय घेण्यासाठी बछावत आयोग नेमला होता. या आयोगाची मे, २००० मध्ये मुदत संपताच न्यायमूर्ती ब्रिजेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा लवाद नेमण्यात आला. या लवादाने तेलंगणा राज्याची निर्मिती (२ जून, २०१४) होण्यापूर्वी २९ नोव्हेंबर, २०१३ रोजी आपला निवाडा दिला. त्यानुसार, आंध्र प्रदेशाला १,००५ टीएमसी, कर्नाटकला ९०० आणि महाराष्ट्राला ६६६ टीमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. तेलंगणा राज्याच्या निर्मितीपूर्वी हा निवाडा आला असला, तरी त्याची अंमलबजावणी राज्याच्या निर्मितीनंतर झाली आहे. त्यामुळे कृष्णा खोºयातील पाणीवाटपासाठी चार राज्यांचा विचार करावा, अशी याचिका तेलंगणाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्याला कर्नाटक व महाराष्ट्राने संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. कृष्णा खोºयातील वादाचे आणि महापुराचे विघ्न संपविण्यासाठी याचे स्वागत केले पाहिजे.कृष्णा खोºयातील पाणीवाटपासाठी चार राज्यांचा विचार करावा, अशी याचिका तेलंगणाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्याला कर्नाटक व महाराष्ट्राने संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकriverनदीDamधरण