शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

हे शब्द लक्षात ठेवा, अन्यथा फसवणूक पक्की समजा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 11:16 IST

शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली सायबर फसवणुकीचे राज्यात अगदी दररोज गुन्हे दाखल होत आहेत. विशेषतः आर्थिक स्थिती उत्तम असलेले ज्येष्ठ नागरिक या फसवणुकींना बळी पडण्याचे प्रमाण अधिक आहे आणि अशा प्रकरणांची संख्याही वाढत आहे.

संजय शिंत्रे पोलिस उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर, मुंबई

आजच्या डिजिटल युगात गुंतवणुकीचे अस्वरूप वेगाने बदलत आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सी किंवा विदेशी चलन या सर्व क्षेत्रांमध्ये ऑनलाइन व्यवहार वाढले आहेत. मात्र, या सोयीसुविधांच्या आडून गुंतवणुकीच्या नावाखाली लपलेले सायबर संकट वेळीच ओळखणे गरजेचे बनले आहे. यात विशेषतः वरिष्ठ नागरिक, निवृत्त व्यक्ती आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर वयस्कर लोकांना लक्ष्य करण्यात येत असून ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

गुन्हेगारांची कार्यपद्धती अत्यंत व्यावसायिक आणि विश्वासार्ह भासते. ते व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सोशल मीडियावरील जाहिराती, बनावट वेबसाइट्स आणि कॉल्सच्या माध्यमातून संपर्क साधतात. संभाषणादरम्यान ते 'सेबी नोंदणी क्रमांक', 'आरबीआय प्रमाणित लोगो' किंवा प्रसिद्ध बँकांची नावे वापरून आधी विश्वास निर्माण करतात. अनेक वेळा त्यांचे बोलणे इतके पटण्यासारखे असते की अनुभवी गुंतवणूकदारदेखील सहज जाळ्यात अडकतात.

या फसवणुकीत पाँझी स्कीम, बनावट आयपीओ, क्रिप्टो स्कॅम फॉरेक्स आणि एएलएम, रिमोट अॅक्सेस, ट्रॅप्स हे प्रमुख प्रकार आहेत. पाँझी स्कीममध्ये सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना नवीन गुंतवणूकदारांच्या पैशांतून परतावा देऊन 'यशस्वी योजना' असल्याचे दाखवले जाते. शेवटी ही साखळी तुटल्यावर सर्वच गुंतवणूकदार नुकसानात जातात. तर, बनावट आयपीओत 'लिस्टिंगपूर्वी शेअर्स खरेदी करा, मोठा नफा मिळवा' अशा आमिषाने लोकांना आकर्षित केले जाते. बनावट वेबसाइट्स आणि कागदपत्रांद्वारे फसवणूक केली जाते. क्रिप्टो स्कॅममध्ये नवनवीन 'टोकन्स',चमकदार 'डॅशबोर्ड', 'ब्लॉकचेन' या शब्दांचा गैरवापर आणि खोटे सेलिब्रिटी समर्थन यांचा वापर करून लोकांची दिशाभूल केली जाते.

फॉरेक्स, एमएलएममध्ये बहु-स्तरीय नेटवर्क, बनावट परतावा आणि 'ग्लोबल गुंतवणूक संधी'चे आमिष दाखवून डल्ला मारला जातो. तसेच रिमोट अॅक्सेसमध्ये 'पोर्टफोलिओ ट्रॅकिंग' किंवा 'टेक्निकल सपोर्ट'च्या नावाखाली अॅप्स डाऊनलोड करून गुन्हेगार मोबाईल वा संगणकाचा ताबा मिळवून फसवणूक करतात. या सर्वांपासून सतर्क राहणे गरजेचे आहे. डिजिटल पडताळणीची अपुरी माहिती, भावनिक दबाव (लोभ, भीती, विश्वास), आणि बनावट सेलिब्रिटी समर्थन ही फसवणुकीला बळी पडण्यामागील काही प्रमुख कारणे आहेत. अनेक वेळा लोक 'हमी परतावा' किंवा 'निश्चित नफा' यांसारख्या शब्दांवर विश्वास ठेवतात, परंतु हेच फसवणुकीचे मुख्य आमिष असते.

नेमकी कोणती काळजी घ्याल?

गुंतवणुकीपूर्वी सेबी आणि आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरून कंपनीची नोंदणी तपासावी.

कोणतीही योजना अत्यंत फायदेशीर वाटत असल्यास ती संशयास्पद असण्याची शक्यता जास्त असते.

अनोळखी लिंक, अॅप्स, कॉल्सपासून दूर राहावे. ओटीपी, स्क्रीन शेअरिंग किंवा बँक माहिती कोणालाही देऊ नये.

सर्व व्यवहारांचे = पुरावे, पावत्या, ईमेल्स, स्क्रीनशॉट्स, सुरक्षितपणे जतन करून ठेवावेत.

घरातील ज्येष्ठ सदस्यांनी कोणतीही डिजिटल गुंतवणूक करण्यापूर्वी विश्वासार्ह सल्ला घ्यावा.

फसवणुकीचा संशय आल्यास cybercrime. gov.in या पोर्टलवर किंवा १९३० या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवा.

गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी अत्यंत चलाखीने काही विशिष्ट शब्दांचा वापर करतात. त्याकडे बारकाईने लक्ष दिले, तर अशा फसवणुकीपासून बचाव करता येईल.

लिंक डाऊनलोड करणे धोक्याचे...

नामसाधर्म्य असलेल्या फसव्या लिंक तयार करून ऑनलाईन भामट्यांनी फसवणुकीचे प्रयत्न सुरू केले आहेत. प्रत्यक्षात या सेवा पदरी पाडून घेण्यासाठी लिंक डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जाते. ही लिंक डाऊनलोड केल्यास मालवेअर किंवा व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन संवेदनशील माहिती भामटे चोरतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Beware these words; online fraud is guaranteed otherwise!

Web Summary : Digital investment scams target seniors via fake websites, apps. Verify company registration, avoid suspicious offers, and protect personal data. Report fraud at cybercrime.gov.in.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमshare marketशेअर बाजार