शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

‘धोनी मला म्हणाला, तू झोप जमिनीवर!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 05:46 IST

रविवारच्या आदल्या दिवशी

क्रिकेटचा मोसम सुरू झालेला आहे, ऑस्ट्रेलियात पहिला सामना झाला त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सुरेश रैनाचा वाढदिवस. रैनाने धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, मात्र तो मूळचा फायटर आणि आशावादी. कितीही रफ पॅच आला तरी त्यानं उमेद सोडली नाही की रडगाणी गायली नाहीत.

मुरादनगरचा हा मुलगा. पाच भावंडं. वडील फॅक्टरी कामगार.. तिथून सुरू झालेला त्याचा प्रवास. त्या संघर्षाविषयी तो बोलतो तेव्हा सिनेमाची गोष्ट सांगतोय असंच वाटतं. अलीकडेच निलेश मिश्रा यांनी घेतलेली त्याची मुलाखत फार गाजली. त्या मुलाखतीचा प्रकारच भन्नाट आहे. त्याला म्हणतात स्लो इंटरव्ह्यू, गप्पा मारल्यासारखे निवांत दोन दोस्त बोलतात. ना कॅमेऱ्याचे कट, ना ओढूनताणून आणलेलं उसनं अवसान. या मुलाखतीत रैना सांगतो, ‘एकदा धोनी म्हणाला, तू झोप जमिनीवर! तर मी म्हणालो, त्यात काय?- मला सवय आहे आणि होतीच, अजूनही मी हातानेच जेवतो. काट्याचमच्यानं जेवता येत नव्हतंच. मला अजून कळत नाही की भात कालवून खाल्ला नाही तर तो नीट शिजलाय की नाही हे कसं कळणार? अन्न हाताला लागलं तर पाहिजे..’ हे असं अनुभवणं आणि त्यासोबत स्वत:त बदल करणं हेच रैनाच्या यशाचं रहस्य असावं. आजवरच्या विविध मुलाखतीत त्यानं स्वत:ची प्रोसेस सांगितली आहे.तो म्हणतो, ‘कभी कभी लगता है की ये मुझसे नहीं होगा.. तो एक क्षण, तिथंच स्वत:ला बजावायचं, की मी हे सोडून पळणार नाही. करून पाहणार. खडतर वाटेवरचे प्रश्न आपल्याला घडवतात, नवीन संधी देतात. 

आपण फक्त तिथं पाय रोवून उभं राहायचं. कधीकधी तर अशीही परिस्थिती येते की आपणच आपल्या क्षमतांवर शंका घ्यायला लागतो. असं ज्या ज्यावेळी वाटलं त्या त्या वेळी मी स्वत:ला बजावलं की, स्वत:च्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायची हीच वेळ आहे. पड बाहेर. अर्थात पड बाहेर म्हणून पडता येत नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जोवर आपण एखादी गोष्ट करून पाहत नाही तोवर ती अशक्यच वाटते. अनेकदा जीवतोड मेहनत करूनही फळ  मिळत नाहीच; पण म्हणून ती मेहनत वाया नाही जात. त्यातून आपण जे शिकलो, जे बदलत गेलो, ते तर कायम आपल्यासोबत राहातंच, त्याचा नंतर कधीतरी फायदा होतो..’ रैना बोलतो क्रिकेटविषयी, पण ते जगण्यालाही लागू होतंच, नाही का?

टॅग्स :MS Dhoniमहेंद्रसिंग धोनीSuresh Rainaसुरेश रैना