शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भक्तिशास्त्र अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 00:28 IST

भक्ती ही भावावस्था आहे. शास्त्र आहे की दर्शन आहे. दर्शन हे एक शास्त्र आहे आणि दर्शन शास्त्र हा एक अनुभूतीचा विषय आहे. दर्शनशास्त्रकारांनी सांगितलेली प्रमेये जर अनुभवाच्या कसोटीवर उतरणार नसतील तर ते दर्शनशास्त्र दर्शन या संज्ञेला प्राप्त होऊ शकत नाही.

- डॉ. रामचंद्र देखणेभक्ती ही भावावस्था आहे. शास्त्र आहे की दर्शन आहे. दर्शन हे एक शास्त्र आहे आणि दर्शन शास्त्र हा एक अनुभूतीचा विषय आहे. दर्शनशास्त्रकारांनी सांगितलेली प्रमेये जर अनुभवाच्या कसोटीवर उतरणार नसतील तर ते दर्शनशास्त्र दर्शन या संज्ञेला प्राप्त होऊ शकत नाही. दर्शनाचा अर्थच मुळी साक्षात्कार किंवा अनुभूती असा आहे. जाणीव हा शब्द आपण व्यवहारात नेहमी वापरतो. जाणीव ही लौकिक अर्थाने अस्तित्वात आली तर तो अनुभव असतो आणि जाणीव जेव्हा अलौकिक पातळीवरून आविष्कृत होते तेव्हा ती अनुभूती होते. अलौकिक अनुभूती जेव्हा अलौकिकातून लौकिकाकडे वाटचाल करू लागते तेव्हा सामान्यांच्या जीवनातही दर्शन ही संकल्पना अनुभवता येते. दर्शनाने सांगितलेल्या प्रयोजनाच्या प्राप्तीची ज्याला तळमळ लागली आहे तोच दर्शनाकडे आकृष्ट होतो. दर्शन केवळ प्रयोजन सांगून थांबत नाही तर प्रयोजनाच्या प्राप्तीचा साधनमार्गही सांगत असतो. असे प्रज्ञाचक्षु श्री संत गुलाबराव महाराजांनी म्हटले आहे. दर्शने ही ज्ञानतत्त्वाने अधिष्ठित असतात. ज्ञानाच्या दोन अवस्था आहेत. एक परोक्षज्ञान आणि दुसरी अपरोक्षज्ञान. आपण ग्रंथ, संत, तत्त्ववेत्ते यांच्याकडून ऐकतो, श्रवण करतो आणि त्यातून जे ज्ञान मिळते ते परोक्षज्ञान होय. पण त्यानंतर जे ऐकले आहे, ज्याचे श्रवण घडले आहे त्याची प्रत्यक्ष अनुभूती घडते. ते प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे अपरोक्षज्ञान होय. भक्त, साधन, उपासक हे परोक्षज्ञानाचे रूपांतर अपरोक्षज्ञानात करतात. या अनुभूतीसाठी भक्ती आवश्यक ठरते. अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने ज्ञानप्राप्तीसाठी आणि अपरोक्षज्ञानासाठी आवरण आणि विक्षेप हे दोन प्रतिबंध आहेत आणि हे प्रतिबंध भक्तीनेच लय पावतात. भक्तीमध्ये सगुण भक्ती आहे. त्यात भगवंताची लीला आहे. त्या लीलेच्या वर्णनात दडलेले प्रेम आहे. भगवंताविषयीची आत्यंतिक ओढ अणि ध्यान आहे. हे ध्यान परिपूर्णतेकडे नेते. धावणारे मन ध्यानाने थांबते.तुकोबाराय म्हणतात, ‘‘आता कोठे द्यावे मन।तुझं चरण देखलिया।’’ म्हणजे सगुण भक्तीच्या महात्म्यज्ञानाने आचरणाची निवृत्ती होते तर लीला संकीर्तनाने विक्षेपाची निवृत्ती होते. म्हणूनच ज्ञानयोग किंवा अष्टांगयोगातील साधकांपेक्षाही मुक्त भक्त हाच खऱ्या अर्थाने भक्तिशास्त्राचा अधिकारी होतो. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक