शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

...देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 07:49 IST

मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यावरून महाराष्ट्रात जे गलिच्छ राजकारण झाले, ते पाहून देवसुद्धा म्हणाले असतील, बंद होतो ते बरे होते. 

- विनायक पात्रुडकरकार्यकारी संपादक लाेकमत, मुंबई

धर्माधिष्ठित राजकारणाचे आपण सारेच बळी आहोत. त्यामुळे जिथे धर्म येतो त्याचा पुरेपूर वापर करून        घेण्यात राजकीय मंडळी वाक्‌बगार असतात.        कोरोनामुळे जवळपास आठ महिने बंद असलेल्या धर्मस्थळाची दारे उघडण्यावरून यथेच्छ टीका झाली. विरोधी पक्षाच्या नेते मंडळींनी घंटानाद, थाळीनाद वगैरे आंदोलने केली. यात कुठलाही राजकीय पक्ष मागे नव्हता. ओवैसीच्या एमआयएमने औरंगाबादमध्ये, प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात आंदोलने केली. मनसेने त्र्यंबकेश्वरचा प्रश्न लावून धरला होता. बाकी भाजपच्या नेते मंडळींची राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने सुरूच होती. जैन मंदिरांसाठी उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागली. 

गेल्या महिन्या-दोन महिन्यात देवदर्शनासाठी ही राजकीय मंडळी अक्षरश: आसुसलेली दिसली.  यातील कितीजण नियमित देवळात जातात, हा संशोधनाचा मुद्दा ठरेल. परंतु राजकीय पोळी भाजण्यासाठी देवालये हा प्रमख मुद्दा ठरला होता. कोरोनामुळे होणाऱ्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनियंत्रित गर्दी असणाऱ्या ठिकाणी सरकारनेच बंदी घातली होती.  एका अर्थाने ही बंदी समर्थनीय होती. परंतु  हिंदुत्वाच्या नावाखाली आघाडीचे सरकार  चालविणाऱ्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याची ही संधी होती. ती संधी साधण्याचा भाजप नेत्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. या वादात राज्यपाल कोश्यारी यांनीही उडी घेतली होती. राजकीय वादाची ही फोडणी दिवाळीआधी बरीच खुशखुशीत ठरली होती. खरे तर मंदिरे बंद ठेवून लोकशाही विकास  आघाडीला असा कोणता फायदा होणार होता, याचा विचार व्हायला पाहिजे होता. उलट शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने त्यांना तर बंद मंदिरे ही अडचणीची बाब ठरत होती. त्याचाच फायदा भाजपने घेतला. अखेर ही ‘श्रीं’ची इच्छा असे म्हणत पाडव्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्यास काही अटी- शर्तीवर परवानगी दिली. काही चर्चना मात्र या अटी-शर्ती जाचक असल्याचे नमूद करीत चर्च उघडण्यास नकार दिला. लॉकडाऊन शिथिल होत असताना आज - ना - उद्या मंदिरे उघडणार, हे स्पष्ट होते. परंतु त्याचा राजकीय फायदा उठवीत याच गोष्टीचे राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय भांडवल केले गेले.

 ज्या महाराष्ट्रात दलितांसाठी मंदिरे उघडण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नाशिकच्या काळा राम मंदिरात आंदोलन करावे लागले. तसेच साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर दलितांना खुले होण्यासाठी सत्याग्रह केला होता. आज त्याच महाराष्ट्रात प्रार्थनास्थळे बंद असल्याने तिथल्या पंचक्रोशीतील अर्थकारण ठप्प झाले होते. अनेकांचे रोजगार बुडाले होते. मंदिराबाहेर हार-तुरे विकणाऱ्यांचे हातावर पोट असते, त्यांची मोठी बिकट अवस्था झाली होती. ही गोष्ट नक्की खरी आहे. ज्या देवस्थानांभोवती ही मंडळी रोजगारनिर्मिती करीत होती, त्या देवस्थानांकडे, मंदिराच्या व्यवस्थापनांकडे, विश्वस्तांकडे इतके दिवस साठवलेला पैसा कुठे गेला? असा प्रश्न उपस्थित केला तर मोठी अडचणीची गोष्ट ठरण्याची शक्यता आहे. ज्या मंदिराभोवती ही हातावर पोट असणारी मंडळी जगत होती त्यांना या मंदिर व्यवस्थानाने किती मदत केली? त्यांच्या उपासमारीचा प्रश्न या विश्वस्त मंडळांनी सोडविला का? भाविकांच्या श्रद्धेवर चालणाऱ्या देवस्थानांपैकी किती संस्थांनी अशा स्वरूपाची मदत केली, याची माहिती लोकांपुढे यायला हवी. 

खरेतर सद्‌गुरु वामनराव पै यांनी देवळात जाणारा भाविक हा देवापुढे नतमस्तक होतो आणि डोळे बंद करून नामस्मरण किंवा प्रार्थना करतो, असे म्हटले आहे. याचा अर्थ भाविक मनातल्या मनातच देवाचे सगुण रूप साकार स्वरूपात अनुभवत असतो. तेव्हा देव मनात असताना देवालयात गर्दी करण्याची खरेच गरज आहे का? याचाही विचार भक्तांनी करायला हवा. कोरोनामुळे संसर्ग वाढून हकनाक आजारी पडण्यापेक्षा सरकारी नियम पाळले तर कोरोनावर नक्की मात करू, असा विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. देवावर भरवसा हवाच, त्याचबरोबर या विषाणूचे   आक्रमण टाळण्यासाठी नियमाचे काटेकोर पालनही हवे. अन्यथा महाराष्ट्राची ‘दिल्ली’ झाल्याशिवाय राहणार   नाही.

टॅग्स :Templeमंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्याShiv SenaशिवसेनाBJPभाजपा