शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा; बिहारमधून थेट दिल्ली गाठणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 08:11 IST

मंत्रिमंडळातील खांदेपालटासाठी गुणवंतांचा शोध; मोदींच्या मनात नेमके काय शिजते आहे?

- हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्रिमंडळात गुणवान सदस्यांना घेऊ इच्छितात. त्यांचे जवळचे मित्र अरुण जेटली आणि काही ज्येष्ठ नेत्यांचे निधन झाल्यानंतर मोदी यांनी एस शिवशंकर, हरदीपसिंग पुरी यांना मंत्रिमंडळात घेतले. निर्मला सीतारामण यांना अर्थमंत्रिपदी बढती दिली. पण अजूनही त्यांना थोडी पोकळी जाणवते आहे. काही आठवड्यांपूर्वी त्यांनी दहा प्रमुख खात्याच्या मंत्र्यांना आपापल्या खात्याच्या कामगिरीविषयी सादरीकरण करायला सांगितले. अर्थ, रेल्वे, पायाभूत विकास आदी खाती त्यात होती. त्यांच्यातल्या काहींवर विशेषत: सुधारणांच्या धिम्या गतीबद्दल मोदी नाराज असल्याचे कळते. काही मंत्र्यांबद्दल प्रतिकूल अहवालही आले आहेत. अर्थमंत्री लोकांशीच काय, पण पक्षकार्यकर्त्यांशीही जुळवून घेऊ शकलेल्या नाहीत याची मोदींना काळजी आहे. अर्थमंत्री अर्थविषयक जाणकार तर असतोच शिवाय विविध पातळ्यांवर लोकांशी नाळ जोडलेला राजकारणीही असावा लागतो. सरकारची धोरणे, कार्यक्रम लोकांपर्यंत नेण्यात अर्थमंत्रालय कमी पडले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीचे पूर्ण प्रभारी केले गेले, यावरून मोदींच्या मनात काहीतरी शिजते आहे, हे नक्की! कोणी याची कल्पनाही केली नव्हती. भाजपांतर्गत मांडणीत काहींच्या ज्येष्ठतेला त्यामुळे धक्का बसला आहे. आधीचे नेतृत्व नितीशकुमार यांच्यापुढे नमते घेत असे. मात्र फडणवीस त्यांना पुरून उरतील असे पक्के आहेत. हा जुगार यशस्वी झाला तर केंद्रात फडणवीसांचे महत्त्व वाढेल. पुढे त्यांना केंद्रात आणण्याचा आणि मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा होईल. संवादातील दरी भरून काढण्यास मदत करणारा त्यांचा अनुभव उपयोगी पडेल, असे मंत्रालयही फडणवीसांना मिळू शकेल.

राम माधव केंद्रीय मंत्री?मंत्रिमंडळ खांदेपालट होईल तेव्हा कोणाकोणाला घेतले जाईल याबद्दल सध्या दिल्लीत जोरात तर्क लढवले जात आहेत. शिवसेना आणि अकाली दल बाहेर पडले आहेत. संयुक्त जनता दल आणि अद्रमुक मंत्रिमंडळात न आल्याने काही मंत्र्यांना दोन तीन खाती सांभाळावी लागत आहेत. राम माधव यांना पक्ष सरचिटणीस पदावरून हटवले गेले. त्यामागे आसामचे ताकदवान मंत्री हेमंत विश्व शर्मा होते असे बोलले जाते. पण राजधानीत अशी कुजबुज आहे की, राम माधव चांगले बोलतात, परराष्ट्र नीती जाणतात, ईशान्य भारत, काश्मीरचा त्यांना उत्तम परिचय आहे. त्यांना मंत्रिपद दिले गेले तर मोदी यांच्यानंतर संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केलेले ते दुसरे मंत्री असतील. गम्मत म्हणजे माधव यांनी आता त्यांच्या ट्विटरखात्यावर भाजपचा उल्लेख ठेवलेला नाही. ‘सदस्य, इंडिया फाउण्डेशन बोर्ड आॅफ गव्हर्नर्स’ एवढीच ओळख तेथे आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे पुत्र शौर्या डोवाल हे या फाउण्डेशनचे दुसरे सदस्य आहेत.
सुशांत प्रकरणात सीबीआय ठामसीबीआयचे प्रमुख आर.के. शुक्ला गेल्या वर्षी नेमले गेले तेव्हा होयबा ठरतील असे वाटले होते. पण ते पक्के निघाले. जुळते घेणारे, मवाळ स्वभावाचे शुक्ला आयपीएसच्या मध्य प्रदेश केडरमधून आले आहेत. टीव्ही वाहिन्यांचे मार्गदर्शन अजिबात न घेता सुशांत सिंह प्रकरणाचा पद्धतशीर तपास करा असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले होते. सीबीआय दुय्यम भूमिका स्वीकारणार नाही; निरपराधांना न गोवण्याची परंपरा चालवील असे या स्तंभात ३ सप्टेंबरला म्हटले होतेच. सुशांतचा खून झाला असे गळी उतरवण्याचा प्रयत्न बिहार लॉबीने पुरेपूर केला. कोणतीही खेळी न करता शुक्ला गालातल्या गालात हसत राहिले. अमली पदार्थ प्रकरणात कोणाकोणाला गोवल्याने आपली इभ्रत वाढणार नाही हे एनसीबीलाही कळून चुकले आहे. आता दिल्लीपतींच्या छायेतले मानले जाणारे एनसीबीचे प्रमुख राकेश अस्थाना काय करतात पहायचे.
चिरागची गुगली, नितीश यांचा त्रिफळा‘नितीश तुम्हारी खैर नही, मोदी तुझसे बैर नही’, अशी घोषणा एलजेपी नेते चिराग पासवान का देत आहेत? -याचे उत्तर देणारा दहादा विचार करील. आपले पिताश्री रामविलास पासवान केंद्रीय मंत्रिमंडळात अन्न आणि ग्राहक व्यवहारमंत्री राहावेत आणि त्याचवेळी बिहारमध्ये नितीश कुमार यांचाशी सामना करता यावा असा चिराग यांचा मनसुबा आहे. १५ सालच्या निवडणुकीत एलजेपी पक्षाला २४३च्या विधानसभेत फक्त २ जागा मिळाल्या. आताही असेच व्हावे यासाठी नितीशकुमार प्रयत्नशील आहेत. चिराग भाजपशी आपला व्यक्तिगत हिशेब चुकवू पाहत असतील. भाजप मात्र काय होतेय ते पाहून जमल्यास लाभ पदरात पाडून घ्यावा अशा विचारात दिसतो.आता राजकीय पंडित असेही म्हणतात की, चिरागला भाजपचीच फूस आहे कारण गेली दोन दशके नितीशकुमार राज्यात ‘मोठ्या भावा’ची भूमिका करत आहेत. चिरागच्या गुगलीने नितीश बुचकळ्यात पडलेत आणि भाजप अजून पत्ते उघड करायला तयार नाही.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपा