शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
5
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
6
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
7
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
8
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
9
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
10
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
11
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
12
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
13
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
14
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
15
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
16
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
17
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
18
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
19
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
20
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
Daily Top 2Weekly Top 5

देवमाणसांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 04:00 IST

मी गेल्या काही वर्षांपासून शक्य तेथे प्रशिक्षित सहृदय मानसमित्र स्वयंसेवकांची मदत समाजात उभी करायला हवी, हे सुचवत आहे.

- डॉ. प्रदीप परशुराम पाटकरमी गेल्या काही वर्षांपासून शक्य तेथे प्रशिक्षित सहृदय मानसमित्र स्वयंसेवकांची मदत समाजात उभी करायला हवी, हे सुचवत आहे. मानसिक आरोग्य व्यवस्थेत मानसोपचार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक यांची संख्या खूप अपुरी असल्याने, समाजातूनच प्राथमिक मानसोपचारांची दिशा त्वरित सुचवू शकणारे मानसमित्र तयार व्हायला हवेत. आजच्या तणावग्रस्त जगाची ही निकडीची गरज आहे.इतक्या मोठ्या यशस्वी, प्रसिद्ध माणसाने असं करावं, तर आपल्यासारख्या साध्या माणसाने कसं जगावं? वृत्तपत्रातील प्रसिद्ध व्यक्तीच्या आत्महत्येच्या बातम्या वाचून ओपीडीमधील बिचाऱ्या अस्वस्थ जिवांकडून हा प्रश्न सध्या माझ्यासमोर येत आहे. त्रस्त रुग्ण, त्यांचे काळजीवाहक, काही जाणून घेऊ पाहणारे जिज्ञासू, असे अनेक जण असे प्रश्न विचारत आहेत. एक मानसोपचारतज्ज्ञ म्हणून मला यात सर्वसामान्य माणसाच्या मनावर होणाºया प्रतिकूल परिणामांची चिंता वाटते.नैराश्य व त्यातून होणारी आत्महत्या याचे प्रमाण भीषण आहे, ते झपाट्याने वाढत आहे. एकंदर लोकसंख्येत एका वेळी अंदाजे १०% ते २०% माणसे (जवळजवळ ३० कोटी) वैफल्यग्रस्त आहेत. पुरुषांच्या दुप्पट प्रमाणात स्त्रिया डिप्रेशनची शिकार होत आहेत. यातील ५०% डिप्रेशन पुन्हा-पुन्हा उद्भवत आहे.आत्महत्येमागील कारणांचा अभ्यास करताना काही महत्त्वाची कारणे जाणवतात. ती म्हणजे, अदमासे २५% कौटुंबिक व नातेसंबंधातील प्रश्न, आर्थिक संकटे व प्रेमप्रकरणे ५ ते १०%, २०% मानसिक व शारीरिक आजार, ३ ते ५% व्यसने इत्यादी. हे आकडे नेमका अंदाज देऊ शकत नाहीत. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, बरेचसे आत्महत्यांचे अयशस्वी प्रयत्न नोंदविले जातच नाहीत, ते लपविले जातात. शिवाय आत्महत्यांचा अभ्यास तितका परिपूर्ण होतो/करता येतो, असे नाही.सर्वसामान्य माणसे अशा प्रसिद्ध, यशस्वी व्यक्तींच्या आत्महत्या समजून घेताना साहजिकच गोंधळून जातात. त्यांच्यापर्यंत या व्यक्तिमत्त्वांची, त्यांच्या मुख्य व इतर उद्योगांची, त्यांच्या व्यक्तिगत व कौटुंबिक आयुष्याची सर्व माहिती कधीच पोहोचत नाही. जेव्हा प्रसिद्धीची, यशाची, सत्तेची वा अलौकिकाची विलक्षण किंमत मनाला सतत मोजत राहावी लागते, तेव्हा ते तसे जगणे या व्यक्तींना त्रासदायक होऊ लागते. त्यात मग अप्रतिष्ठेचे भय वाटले, तर ती अप्रतिष्ठा सोसण्याची नुसती कल्पनाही मरणप्राय वेदना देत राहते.सामान्यांसाठी अर्थपूर्ण जगणे राहू द्यात, साधे ‘तगणेही’ विलक्षण कठीण काम होत जाते, पण कळू लागल्यापासून ताणतणावाशी सामना करीत राहिल्याने, त्यांना जीवनाकडून विशेष अपेक्षा न ठेवता तगून राहता येते. रोज वैफल्याशी परिचय असणाºयांना जीवनातील निराशा ही नवी नसते, ती आपल्यासारख्याच इतरांशी बोलून थोडा ताण हलकाही करता येतो. एकत्र येऊन उत्तर शोधता येते. वैफल्यात वा होऊ घातलेल्या वैफल्यात जीवनेच्छा संपविण्याचे सामर्थ्य असते. साधी माणसे वैफल्यात जगू शकतात, वैफल्य असह्य झाले व सहनशक्ती संपत आली, तर नाइलाजाने शेवटी साधी माणसे मरण जवळ करतात. सामान्य माणूस जीवनदात्याच्या उपकाराखाली, समाजाच्या संकेतामुळे, कुटुंबीय/मित्र/देव यांच्या आधाराने सावरण्याचे प्रयत्न करीत आत्महत्या शक्यतो टाळतो.भविष्यातील आशा, प्रयत्नांची दिशा, जीवन जगण्याचे प्रयोजन हरवत जाते, तेव्हा मन स्वनाशाकडे झुकू लागते!!निरर्थक जगणे जीवनेच्छेला मारणारे सर्वात प्रभावी विष आहे. अप्रतिष्ठित जगणे हे त्याखालोखाल प्रभावी जहर आहे. स्व:प्रतिष्ठेला अतिरिक्त महत्त्व देता येत नाही. वरचा अख्खा समाज तळागाळातील माणसाच्या जीवनाला महत्त्व असे काही देत नाही, उलट अप्रतिष्ठाच देत राहतो. मात्र, मोठ्या माणसांच्या यशाबरोबर त्यांच्या स्वप्रतिष्ठेला विलक्षण धार चढत जाते. ही धार संकटकाळी त्यांचाच आत्मविश्वास, धैर्य, सहनशक्ती कापीत जाते. पुढील आयुष्यात कीर्तीच्या, प्रतिष्ठेच्या तेजाने स्वत:चेच डोळे दिपलेले असतात. मग हे तेज नष्ट तर सोडाच, कमी होणेही सहन होत नाही.मोठे यशशिखरावर एकटे पडत जातात. जगाशी नाते जोडीत मोठे होताना होणाºया दमछाकीत / उत्साहात स्वत:शी, घराशी त्यांचे नाते हरवते / संवाद थांबतो. स्वप्रतिमा जगात उजळ करण्याच्या नादात, मनात काळोख दाटत जातो, मनात काजळी धरते. ताण समायोजन बिघडते. परमात्म्याच्या शोधात प्रसिद्धी, मोह, दंभ, संपत्ती, व्यसने, गुन्हेगारी सत्ताकारण आडवे येते, मार्ग भ्रष्ट करते. मग स्वत:चा व तथाकथित आत्म्याचा शोध हरवतो.जीवन जेवढे उंच, दरी तितकीच खोल. मोठ्यांचे हिशेब मोठे असतात. होणारे नुकसानही न पेलविणारे असते. डोलारा सावरण्याच्या पलीकडे झुकलेला असतो. मोठी माणसे अशा महासंकटात, नुसत्या येऊ घातलेल्या वैफल्याच्या चाहुलीनेही मरण जवळ करू पाहतात, असे दिसते. न सापडलेला जीवनार्थ आणि हातून निसटणारा जीवनार्थ असा तो फरक असतो (परीक्षेच्या निकालापर्यंत थांबू न शकणारे विद्यार्थी हे असेच एक उदाहरण).एक निश्चित की महाराज, बुवा, आध्यात्मिक गुरू अशा या नामांकित व्यक्तींचे तथाकथित आध्यात्मिक सामर्थ्य त्यांना स्वनाशापासून वाचवू शकत नाही. साधी भौतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय कारणे अशा सामर्थ्यशाली माणसांना निराशेच्या गर्तेत असहायतेत ढकलू शकतात. त्यांचे पारलौकिक ज्ञान इथे त्यांनाच वाचवू शकत नाही. हे समजून घेणे भक्तांना कठीण जाते. त्यांचा आधार निसटतो, विश्वास डळमळीत होतो. गुरू हतबल तेथे भक्तांचे काय?शारीरिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय ताणतणाव तथाकथित भक्ती/ धर्म/ आध्यात्म्यापेक्षा सामर्थ्यवान आहेत, हे निश्चित.हे प्रसिद्ध कलावंत, खेळाडू, नेते, उद्योजक(शास्त्रज्ञदेखील)आधारासाठी/ आत्मिक समाधानासाठी इकडे तिकडे देव/ बुवा/ महाराजांकडे धाव घेत राहतात ते का? त्यामागे अनेकदा इतर व्यावहारिक कारणे असतात, जी बहुतांशी गुप्त असतात. विवेकी, आनंदी जगण्यासाठी विवेकी समज, वैज्ञानिक दृष्टीकोन पुरेसा आहे, पण त्याचा सुयोग्य वापर हे मान्यवर किंवा वैज्ञानिक करताना दिसत नाहीत. त्यात पुन्हा अनेक ठिकाणी हेही दिसून येते की, आक्रमक, नीतिशून्य, अमानुष, हिंसक, स्वार्थांध भ्रष्टाचारी, गुन्हेगार सत्ताकारणी उपयोग संपला की, वेगवेगळ्या सेलिब्रेटीजवर हात ठेऊन भस्मासुरासारखे, त्यांचे भस्म करून टाकतात. ज्याच्याशी जवळीक जास्त, नंतर त्याची उपयुक्तता कमी झाली की, त्यालाच धोका जास्त. मर्यादेपलीकडे माणसे मोठी होऊ लागली, तर जगभरात फोफावलेल्या राजसत्तेला, धर्मसत्तेला ते चालत नाही, असे दिसते.दु:खावर फुंकर घातली तर बरे वाटते, पण ते तात्पुरते. जीवनेच्छा फुलवून माणूस दु:खमुक्तीसाठी उभा (प्रयत्नशील) करण्यासाठी, फार कष्ट घ्यावे लागतात. मानसोपचार त्या वेळी अतिशय उपयुक्त ठरतात, पण केवळ अतीव निराशा, अज्ञान, गैरसमज, लोकलज्जा (??), न्यूनगंड/अपराधगंडापोटी माणसे असे उपचार घेत नाहीत.शब्दांच्या फुंकरीने थोडे बरे वाटते, पण त्यासोबत नैराश्याशी सामना करू शकणारी औषधे घ्यावी लागतात, पुनर्वसन, नव्या मार्गाच्या, नव्या संधींचा शोध घेत राहावा लागतो. आजपर्यंत न रुचलेल्या, पण समुपदेशकाने सुचविलेल्या उपयुक्त तडजोडी कराव्या लागतात. त्या तडजोडींबाबत दु:खी, आडमुठी भूमिका घेऊन चालत नाही. आजवर न सुचलेली योग्य उत्तरे आता व्यवहारात वापरावी लागतात. काही आधार हाताशी धरून ठेवण्याबरोबरच निकृष्ट, अर्थहीन, अविवेकी, अंधश्रद्ध आधारातून स्वत:ला मोकळे करावे लागते.अशा प्रसंगी बरेचसे मेसेजेस सोशल मीडियावर फिरत असतात. जसे, मित्र बनवा, विश्रांती घ्या, शांत स्वस्थ व्हा, दुर्लक्ष करा इ. ते असेही म्हणतात की, निराशेवर मैत्री, संवाद हाच एकमेव(??) उपाय आहे. वरवर नजर फेकता, हे जरी काही अंशी व निराशेच्या एका टप्प्यापर्यंत खरे वाटत असले, तरी ते एकमेव, योग्य, पुरेसे, अंतिम उत्तर नसते. नैराश्य हे बºयाच अंशी रासायनिक असते, ते मानसिक अस्वास्थ्य किंवा मनोविकार असू शकतो. काही तर अशास्त्रीय, अविवेकी, अंधश्रद्ध उपायांचा आग्रह धरतात! म्हणून वेळ न दवडता प्राथमिक लक्षणे दिसू लागताच, त्यावर योग्य आधुनिक वैद्यकीय मानसोपचार करावेत, जेणेकरून माणसे संकटाचा, निराशेचा सामना करू शकतील व आत्मघाताचे टोक गाठण्यापासून त्यांना परावृत्त करता येईल. आत्महत्या टाळता येतात. सर्वांच्या आधाराने, आर्थिक/ सामाजिक साहाय्याने, सोबतीने, योग्य मार्गदर्शनाने सातत्यपूर्ण शास्त्रीय उपचारांची त्वरित मदत घेऊन, आपण तसे निश्चित करू शकतो.(लेखक मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)>जगप्रसिद्ध शेफ अँथनी बोर्डेन, डिझायनर केट स्पेड , भय्यू महाराज, अमृत मलमचे संचालक शैलेश जोशी यांच्या मागील आठवड्यातील आत्महत्या संबंधितांना सुन्न करून गेल्या. हिमांशू रॉय यांचीही आत्महत्या अशीच चटका लावून गेली. हे सर्व आपापल्या क्षेत्रात यशस्वी व प्रसिद्धीच्या शिखरावर होते. त्यांचे यश, दर्शनी सुखी समृद्ध जीवन पाहता, त्यांची जीवनेच्छा अशी कशी संपली, याचे आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. त्यामागची इतर अनेक कारणे हळूहळू समोर येतील. त्यातील नवल व विषाद मात्र कमी होईल, असे वाटत नाही.

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराज