शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पदवी विकण्याचा उद्योग आणि शिक्षणाचे बाजारीकरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 02:57 IST

शिक्षण विकत घेऊ शकतो तोच शिकेल, बाकीचे शिकू शकणार नाहीत...

अशोक सरस्वती

जी नीती देशातील मोजक्या लोकांच्या हिताची असेल, तो देशद्रोहच आहे. देशप्रेम म्हणजे बहुसंख्य लोकांचे ज्यामध्ये हित असते, ती नीती अवलंबणे होय.ती आर्थिक असो की राजकीय, धार्मिक असो की शैक्षणिक, ती नीती बहुसंख्याकांच्या हिताची, सुखाची आणि कल्याणाची असावी. केंद्र सरकारची प्रस्तावित शिक्षण नीती याच अर्थाने देशद्रोही आहे. तब्बल ५०० पानांचा इंग्रजीत असलेला शैक्षणिक धोरणाचा मसुदा सरकारने इंटरनेटवर टाकला होता. लोकांनी आक्षेप नोंदवावे म्हणून दीड महिना वेळ दिला होता. बहुसंख्य समाज अर्धशिक्षित असून, इंग्रजी भाषा जाणत नाही. इंटरनेट जमत नाही. बहुतेकांना चिकित्सा करता येत नाही. अनेकांनी न वाचता समर्थन केले.

प्रस्तावित शैक्षणिक धोरण शिक्षणाचे बाजारीकरण आणि भगवेकरण यावर उभे आहे. जो शिक्षण विकत घेऊ शकतो, तो शिकेल, बाकीचे शिकू शकणार नाहीत. या नीतीने महाविद्यालये आणि विद्यापीठे स्वायत्त करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्याच्यावर सरकारचे नियंत्रण नसणार आहे. मनमानी पैसा आकारल्याने गरीब जनता वंचित राहील. अभ्यासक्रम तेच ठरवतील. खोटा इतिहास निर्माण करतील. सरकारी शाळा दुय्यम ठरतील आणि बंद पडतील. ५००० ते २५००० विद्यार्थिसंख्या असलेल्या संस्था उद्योगपतीच चालवू शकतील. अशाप्रकारे शिक्षणाचे बाजारीकरण होईल. पदवी विकण्याचा उद्योग उभाहोईल. या नीतीमध्ये शाळा, महाविद्यालयांमध्ये पारंपरिक काम शिकविले जाईल. त्यामुळे गरीब विद्यार्थी शिक्षण घेण्याऐवजी जातीगत कामाला प्राधान्य देतील. मागास लोक मागासलेलेच राहतील. देश परिवर्तनाच्या विरुद्ध दिशेने वाटचाल करेल. या नीतीमुळे शिक्षण क्षेत्रात आरक्षण राहणार नाही. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी समाजाला नोकरीची संधी राहणार नाही. संविधान सांगते की, प्रत्येकाला समान शिक्षण, शिक्षणाचा अधिकार, व्यावसायिक शिक्षण मिळाले पाहिजे. ही नीती हे धोरण नाकारणारे आहे. समाजपरिवर्तन गतिशील होईल, अशी शिक्षा नीती हवी, अन्यथा तो देशद्रोहीपणा ठरेल.

(लेखक नवीन शिक्षण धोरणविरोधी समिती, नागपूरचे समन्वयक आहेत) 

 

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र