शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

हजार गाणी भरलेल्या एका चपट्या डबीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 08:59 IST

आपल्या आवडीची गाणी सतत सोबत बाळगणं आणि कुठेही, कोणतंही गाणं ऐकू शकणं हे iPod मुळे शक्य झालं. ती जादू काय होती, हे आज उमगणं कठीण!

- प्रसाद शिरगावकर, मुक्तस्रोत तंत्रज्ञानामधील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व वक्ते‘आपल्याला हवं ते संगीत आपल्या सोबत ठेवून हवं तेव्हा ऐकता यावं’ ही  गरज “सोनी” कंपनीने पहिल्यांदा ओळखली होती. त्यांच्या “वॉकमन” ने १९८० च्या दशकात जगभरातल्या तरुणाईला वेड लावलं होतं. ह्या शतकाच्या सुरुवातीला ॲपलने वॉकमनसारखंच काम करणारा ‘डिजिटल’ म्युझिक प्लेयर तयार केला. ऑक्टोबर २००१ मध्ये ॲपलने लाँच केलेलं iPod Classic जेमतेम चार इंच आकाराचं होतं. मात्र ह्या चिमुकल्या उपकरणामध्ये तब्बल एक हजार गाणी साठवता यायची ! सर्वसामान्य रसिकाला त्याचा जवळपास सर्व संगीत-संग्रह ह्या चपट्या डबीत ठेवून सतत सोबत बाळगणं आणि कुठेही, कधीही, कोणतंही गाणं किंवा संगीत ऐकू शकणं हे iPod मुळे शक्य होऊ लागलं.

अर्थात iPod हा काही जगातला पहिला डिजिटल म्युझिक प्लेयर नव्हता. इतर काही कंपन्यांनी छोटे डिजिटल म्युझिक प्लेयर्स बाजारात आणले होते, मात्र त्यांच्यावर गाणी टाकणे अन् ती ऐकणे ह्याबाबत अनेक मर्यादा होत्या. ॲपलने त्या मर्यादांवर अत्यंत हुशारीने मात केली. अत्यंत देखणं उपकरण, त्यावर एक छोटीशी गोल तबकडी अन् त्यावर असलेली फक्त चार बटणं हे पहिल्या iPod चं स्वरुप होतं. शिवाय ॲपलने आपल्याच iTunes ह्या सॉफ्टवेअरमधली गाणी ऑटोमॅटिकली सिन्क करण्याची सोय iPod मध्ये दिली. फारशी  तांत्रिक माहिती नसलेल्या सर्वसामान्य ग्राहकाला डिजिटल म्युझिक वापरणं सहज शक्य होऊ लागल्यामुळे iPod अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झालं!

iPod मुळे संगीत क्षेत्र अक्षरशः ढवळून निघालं. iPod येण्याआधी  लोकप्रिय अल्बमच्या लाखो सीडीज् / कॅसेट्स जगभरात विकल्या जायच्या. iPod आणि त्यानंतर आलेल्या डिजिटल म्युझिक प्लेयर्समुळे जगभरातली सीडीज् / कॅसेट्सच्या स्वरुपातली संगीताची अब्जावधींची बाजारपेठ साफ कोसळली अन् काहीच वर्षांमध्ये जवळपास बंद पडली.

संगीताच्या पारंपरिक बाजारपेठेला ॲपलने स्वतःच्या iTunes बाजारपेठेचा पर्याय निर्माण केला. त्या बाजारपेठेतून अख्खा अल्बम विकत घेण्याऐवजी फक्त एक सुटं गाणं विकत घेता येणं शक्य होऊ लागलं. ह्याचा एक परिणाम म्हणजे फक्त मोठे बँडस आणि मोठ्या कंपन्यांनीच आपले अल्बम्स काढण्याऐवजी जगातल्या कोणालाही आपली गाणी, आपलं संगीत तयार करून ते iTune वर विकता येणं शक्य झालं. संगीत निर्माण करणं आणि ते जगभरात वितरित करणं हा खूप मोठ्या गुंतवणुकीचा खेळ न राहता त्याचं लोकशाहीकरण झालं. (अर्थात ह्यामध्ये iPod इतकंच त्याच सुमारास सुरु झालेल्या YouTube चंही मोठं योगदान आहे.)पॉडकास्टींग (आणि पुढे ऑडिओ बुक्स) हा iPodsमुळे आलेला आणखी एक महत्त्वाचा बदल. जगातल्या कोणालाही, कोणत्याही विषयावरची व्याख्यानं ही आपल्या आवाजात रेकॉर्ड करून इतरांपर्यंत पोचवणं हे पॉडकास्टींगमुळे शक्य झालं. ह्याचा परिणाम अर्थातच शिक्षणाच्या आणि ज्ञानप्रसाराच्या लोकशाहीकरणामध्ये झाला. भारतासारख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात संगीताचं वेड असलेल्या देशात मात्र iPodला फारशी लोकप्रियता मिळाली नाही. iPod भारतात पंचवीस-तीस हजार रुपयांना मिळायचा, जो मध्यमवर्गीय संगीत रसिकांसाठी त्याकाळी अत्यंत महागडा प्रकार होता. शिवाय काही कायदेशीर बाबींमुळे iTunes वरचं संपूर्ण संगीत भारतात उपलब्ध नसायचं आणि बॉलिवूडची गाणी त्यावर मिळायची नाहीत. 

ह्या कारणांमुळे कदाचित iPod भारतात फार लोकप्रिय होऊ शकलं नसावं. पुढे भारतीयांनीही डिजिटल म्युझिकचा खूप मोठ्या प्रमाणात स्वीकार केला, मात्र तो iPod वापरून नाही तर स्मार्टफोन्स वापरून!२००० चं पहिलं दशक संपत असताना iPhone आणि अँड्रॉइडचे स्मार्टफोन्स लोकप्रिय होऊ लागले. सर्व स्मार्टफोन्समध्ये डिजिटल म्युझिक साठवण्याची आणि ऐकण्याची क्षमताही होती. दुसऱ्या दशकात 3G/4G च्या रुपाने मोबाईल इंटरनेट क्रांती घडली. ह्या सोबत अनेक ऑनलाईन म्युझिक स्ट्रीमिंग सेवा सुरु झाल्या. स्मार्टफोन्सचा वाढता वापर आणि ऑनलाईन म्युझिक स्ट्रीमिंगचा उदय ह्या दोन्हीमुळे iPod सारख्या डिजिटल म्युझिक प्लेयरच्या वापराला आणि विक्रीला घरघर लागली. अखेर गेल्या आठवड्यात iPod ने शेवटचा श्वास घेतला. 

iPod आता मिळणार नसले तरी, अल्पावधीत जगामध्ये क्रांतिकारक बदल घडवणारं किंवा बदलांना कारणीभूत ठरलेलं उपकरण म्हणून त्याची इतिहासात कायमची नोंद होईल ! prasad@aadii.net

टॅग्स :Apple Incअॅपल