शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

युद्धाने बेचिराख येमेनमध्ये ‘व्यायामाची पहाट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 10:37 IST

युद्धाने येमेन देश उद्ध्वस्त झाला असला तरी व्यायामाने येमेनी नागरिक स्वत:ला उभं करण्याचा प्रयत्न करतो आहे.

येमेन हा अरेबियन द्वीपकल्पातला एक छोटा देश.  २०१५ मध्ये येमेनमध्ये नागरी युद्धाला तोंड फुटले तेव्हापासून परिस्थिती चिघळलेलीच आहे. आर्थिक कंबरडे मोडलेले. आरोग्यव्यवस्था ढासळलेली. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, वर जगण्या-मरण्याचीच काळजी!  आज येमेनमधील ५५ लाख लोक मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत. शरीराच्या दुखण्यावर इलाज करायला लोकांकडे पैसे नाहीत, तिथे भय, चिंता, औदासिन्य, नैराश्य या मानसिक आजारांकडे कोण लक्ष देणार? शिवाय त्यासाठीची व्यवस्थाही येमेनमध्ये नाही.  साडेतीन  कोटी लोकसंख्येच्या देशात केवळ ५९ मानसोपचारतज्ज्ञ आहेत. ३०४ मानसिक आरोग्यसेवक आहेत. अशा तुटपुंज्या मनुष्यबळावर किती लोकांच्या मनाच्या दुखण्यावर फुंकर घातली जाणार? युद्ध थांबवणं हे  सामान्य जनतेच्या हातात नाही; पण निदान आजच्या जगण्यासाठी कणखर होण्याचा मार्गही येथील लोकांना दिसत नव्हता. तो दाखवला अबू हातेम आणि त्यांचा मित्र अब्दुल्ला अल कदानी यांनी!

अबू हातेम हे २०१९ मध्ये इंजिनिअर म्हणून निवृत्त झाले. त्यांना आजूबाजूला वेगळंच चित्र दिसत होतं. त्यांच्यासारखी निवृत्त माणसं नैराश्यात बुडालेली होती. दिवसभर अल खत (एक नशिली वनस्पती) चघळत  ते स्वत:ला शून्यात गाडून घ्यायचे.  या अवस्थेतून लोकांना बाहेर काढायला हवं यासाठी अबू हातेम यांनी आपला मित्र अब्दुल्ला याच्या मदतीने ‘बेस्ट टीम’ सुरू केली  आणि मनाला उभारी देण्यासाठी मार्ग शोधला व्यायामाचा!

अबू हातेम आणि अब्दुल्ला पहाटे लवकर उठून सार्वजनिक ठिकाणी स्वीडिश जिम्नॅस्टिकचा सराव करू लागले. या दोघांनी लोकांना पहाटे व्यायाम करायला घराबाहेर यायला उद्युक्त केलं. एका तासात ३३ स्वीडिश जिम्नॅस्टिक व्यायाम प्रकार करून लोकांना छान वाटू लागलं. व्यायाम करताना आपल्या मनावरचा  ताण निघून जात असल्याचं लोकांच्या लक्षात आलं. अशा प्रकारे येमेनमधील सना या राजधानीच्या शहरात   बेस्ट टीमच्या या स्वीडिश व्यायाम प्रकाराने पाय रोवले. त्याची लोकप्रियता शहरभर पसरली. जे लोक आपला अख्खा दिवस कुढत आणि अल खत चघळत बसत, त्या लोकांनी बेस्ट टीमच्या व्यायाम उपक्रमात सहभागी होऊन आपली दिनचर्या बदलून टाकली. अबू हातेम यांची बेस्ट टीम सुरुवातीला फक्त दोन जणांची होती; पण आता या उपक्रमात १५०० लोक सहभागी आहेत. बेस्ट टीमच्या येमेनमध्ये १७ शाखा आहेत. एकट्या सना या राजधानीच्या शहरातच १४ शाखा आहेत. बेस्ट टीमचे कार्यकर्ते लोकांना व्यायाम प्रकार शिकवण्याबरोबरच त्यांच्या दुखऱ्या मनावर उपचारही करतात. आज येमेनमध्ये विविध ठिकाणी  बेस्ट टीम सुरू करण्याची मागणी सुरू झाली आहे.

लोक पहाटे पाच वाजता ठरलेल्या ठिकाणी एकत्र येतात. मिळून व्यायाम करतात. पाच ते साडेसहा या वेळेत कोणीही युद्ध, राजकारण यावर बोलत नाही. तसा बेस्ट टीमचा नियमच आहे; पण केवळ एकत्र आल्याने आपला खूपसा ताण हलका तर होतोच, शिवाय व्यायामानं आपल्याला रोजच्या लढण्यासाठी ऊर्जा मिळते हेही लोकांच्या लक्षात येऊ लागलं. मानसिक विवंचनेतून बाहेर पडण्याचा रस्ता बेस्ट टीममुळे येमेनमधील अनेक पुरुषांना मिळाला आहे. त्यांच्याहून जास्त भीषण परिस्थिती येमेनमधील स्त्रियांची आहे. स्त्रियांनाही बेस्ट टीमसारखा पर्याय हवा आहे; पण येमेनमधील पुराणमतवादी विचारसरणी स्त्रियांना यासाठीची परवानगी देत नाही. 

युद्धाने येमेन देश उद्ध्वस्त झाला असला तरी व्यायामाने येमेनी नागरिक स्वत:ला उभं करण्याचा प्रयत्न करतो आहे. मनाला उभारी मिळालेला हाच येमेनी नागरिक उद्ध्वस्त देशाचा पाया पुन्हा रचायला घेईल! असं खरंच व्हायला हवं... आमेन!

स्वीडिश जिम्नॅस्टिकचेच व्यायाम का?स्वीडिश जिम्नॅस्टिक हा  व्यायामप्रकार  १९  व्या शतकात  विकसित झाला. हा व्यायामप्रकार चालणे, पळणे, उड्या मारणे, फेकणे, खेचणे, अशा शरीराच्या नैसर्गिक हालचालींवर भर देतो. पारंपरिक जिमनॅस्टिकमध्ये शरीराची विशिष्ट आणि सूत्रबद्ध हालचाल असते. विशिष्ट स्नायूंचे कौशल्य वाढवण्यावर यात भर असतो; पण स्वीडिश जिम्नॅस्टिक व्यायामप्रकारात संपूर्ण शरीराचा फिटनेस महत्त्वाचा मानला जातो.  स्वीडिश जिम्नॅस्टिक व्यायामाचे प्रकार समूहाने केले जातात. व्यायाम करताना मनाला छान वाटावं आणि समूहातील लोकांसोबत संवादही घडावा, लोक एकत्र यावेत, आनंदी व्हावेत आणि त्यांच्यात ऊर्जा निर्माण व्हावी या गोष्टींना यात महत्त्व आहे.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी