शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:09 IST

प्रत्येक पिढीत एक दादा असतात. म्हणजे ते सगळ्या वयात दादा असतात. लहानपणी आजी कौतुकाने हा माझा दादा म्हणते. मग तो दादाच होतो. आजोबा झाला तरी तो दादाच

- किशोर पाठकप्रत्येक पिढीत एक दादा असतात. म्हणजे ते सगळ्या वयात दादा असतात. लहानपणी आजी कौतुकाने हा माझा दादा म्हणते. मग तो दादाच होतो. आजोबा झाला तरी तो दादाच असतो. असे दादा समाजाचं पोरपण आणि प्रौढपण सांभाळतात. त्यांच्या वागण्यातही असंच एक समंजसपण असतं. त्यांचा एक परवलीचा शब्द असतो. काहीही घडो.. ‘ही प्रभूची इच्छा’ किंवा ‘ही त्याचीच इच्छा’ असं दादा कायम म्हणतात. पण मग एक प्रश्न असतो.ही जर प्रभूचीच इच्छा असते तर मग दादांचं काय काम? तर कायम हे आपलं नाही, हे त्याचं देणं आहे. ज्याची होती त्याने नेली ही भावना. कितीही वाईट घडो वा कितीही चांगलं घडो, ते कायम त्याच्या इच्छेवर सगळं सोपवून मोकळे होतात. तो आहे ना मग काळजी कशाला? ही सोपवण्याची भावना प्रत्येक माणसात असते.खादे लहान मूल आई कुणाकडे तरी सोपवते. पण ते कायमचे नसते. ते नक्की जबाबदारी निश्चित करते पण आई येताच ते मूल तिच्याकडेच येते. संसारात अशी सोपवासोपवी कायम चालू असते. मला पूर्ण परमेश्वर नको तर त्याची कृपा हवी. म्हणजे त्याच्यावर पूर्ण भरोसा टाकूनच कृपा हवी. एकदा ती कृपा मिळाली की झाला पूर्णवाद. माझे सगळे कर्म नीट करून त्याची उपासना करणे, सेवा करणे, पूर्ण श्रद्धावान होणे, जिथे पूर्णत्वाचा वाद मिटतो तो पूर्णवाद. मी त्या पूर्णत्वाचा अधिकारी असतो. मग मी आणि प्रभू वेगळे नाहीत.कबीर म्हणतो, ‘प्रेम गली अति संकरी, दूजा नही समाये । एक प्रभू तो मैं नही, एक मैं तो प्रभू नाय’ ही प्रेमाची गल्ली इतकी निमुळती आहे की एकच माणूस जाऊ शकतो. एक तर प्रभू किंवा मी. मग कसं जायचं, एक व्हायचं, हे एक होऊन प्रवास करणं ज्याला जमतं तो दादा होतो. त्याने सगळे खांद्यावर घेतलेले असतात. हा खरा दादा जग आणि घर चालवतो. तो निरिच्छ, निष्प्रेम, निष्काम असतो. कृपया गल्लीतला दादा, राजकारणातील दादा हा तसा दादा समजू नये. हे सगळे खोटे, भित्रे, स्वार्थी, क्रूर, खाऊ दादा असतात. ते काहीच करू शकत नाहीत. आपल्याला असा एकच दादा मिळावा की तो सर्व भार त्याच्यावर टाकून आपल्याला निर्भय करतो. हा खरा दादा नाही तर हे खरे दादा हे संसार चालवतात... ही त्याची इच्छा !

टॅग्स :FamilyपरिवारAdhyatmikआध्यात्मिक