शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बर्फाळ पहाडावर तरुणाचं ‘सायबर किडनॅपिंग’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 10:02 IST

Cyber Kidnapping: इंटरनेटनं आज खूप गोष्टी सोप्या केल्या असल्या आणि वैयक्तिक आयुष्यात त्याचा वापर आज अपरिहार्य झाला असला तरी इंटरनेटच्या युगानं अनेक नवे प्रश्नही निर्माण केले आहेत. 

इंटरनेटनं आपलं आयुष्य आता किती व्यापलं आहे ! अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत, म्हणजे आजच्या तरुणांच्या पालकांच्या पिढीत इंटरनेट वगैरेचा फारसा काही संबंध नव्हता आणि त्याचा त्यांच्या डोक्याला त्रासही नव्हता. आयुष्य कसं अगदी सुरळीत चालू होतं. अर्थात इंटरनेटनं आज खूप गोष्टी सोप्या केल्या असल्या आणि वैयक्तिक आयुष्यात त्याचा वापर आज अपरिहार्य झाला असला तरी इंटरनेटच्या युगानं अनेक नवे प्रश्नही निर्माण केले आहेत. 

इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांनी तर अनेकांना अक्षरशः कंगाल केलं आहे. त्यांचं आयुष्य सर्वार्थानं बरबाद झालं आहे. सायबर क्राइम हा प्रकार दिवसागणिक इतका वाढतो आहे, की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तपासासाठी पोलिसबळ अपुरं पडतं आहे. शिवाय सायबर गुन्हेगार पोलिसांपेक्षा कायम दोन पावलं पुढेच असल्याचं दिसतं. 

आजकाल इझीमनीसाठी तरुणही सायबर क्राइमचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले आहेत. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केले जाणारे घोटाळे, बॅंकांची लूट, सर्वसामान्यांच्या खात्यातून अलगद उडवले जाणारे पैसे, चाइल्ड पार्नोग्राफी, फिशिंग, महिलांना धमकावण्याचा प्रकार, त्यांच्या फोटोंमध्ये केलं जाणारं मॉर्फिंग, बदनामी, याशिवाय सायबर टेररिझम हा नवा प्रकार तर अगदी देशपातळीवरही घातक ठरतो आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही, इतक्या प्रकारे आता सायबर गुन्हे घडतात. संपूर्ण जगच या सायबर गुन्हेगारीपासून त्रस्त आहे. 

आत्ता अमेरिकेत नुकतीच उघडकीस आलेली एक धक्कादायक घटना म्हणजे ‘सायबर किडनॅपिंग’! अमेरिकेच्या युटा शहरामध्ये घडलेली ही घटना. चीनचा १७ वर्षीय तरुण काई झुआंग हा अमेरिकेच्या युटा परिसरात राहतो. २० डिसेंबरपासून तो बेपत्ता होता. नंतर कळलं, त्याला किडनॅप करण्यात आलं आहे. पण हे किडनॅपिंग होतं, सायबर किडनॅपिंग. अर्थात त्याआधी सायबर किडनॅपिंग म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. या प्रकारात प्रत्यक्ष अपहरण होत नाही; पण त्या व्यक्तीचं ‘फेक किडनॅपिंग’ केलं जातं. ज्याला सायबर किडनॅप केलं आहे, त्याच्या कुटुंबीयांकडून पैसे उकळण्यासाठी मुख्यत्वे या प्रकाराचा वापर केला जातो. त्या व्यक्तीला प्रत्यक्ष किडनॅप केलेलं नसतं, तर तसा आभास निर्माण केलेला असतो. काही वेळा त्या व्यक्तीलाच ‘मी किडनॅप झालो आहे’, असं सांगण्यासाठी बाध्य केलं जातं. अपहरण झालेल्या व्यक्तीचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेतील फोटो ‘तयार’ केले जातात. याशिवाय डिप फेक टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या व्यक्तीचा हुबेहुब आवाजही ऐकवला जातो. त्याला मारून टाकण्याची धमकी दिली जाते आणि मग गलेलठ्ठ खंडणीची मागणी केली जाते. अनेकदा ही खंडणी वसूलही केली जाते आणि त्यानंतर काही काळानं आपल्याला कळतं, प्रत्यक्षात अपहरण झालेलंच नव्हतं! 

काई झुआंगच्या बाबतीत प्रत्यक्षात काय झालं होतं? सायबर किडनॅपर्सनी आधी स्काइपसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर झुआंगशी संपर्क साधला आणि त्याला सांगितलं, आम्ही सांगतो त्याप्रमाणे कर, नाहीतर तुझ्या आईवडिलांना आम्ही जिवंत सोडणार नाही. त्यांच्या जिवाला खरंच धोका आहे, असा विश्वास त्याच्या मनात निर्माण करण्यासाठी काही फेक गोष्टी त्यांनी झुआंगला दाखवल्या. त्यानंतर किडनॅपर्सनी त्याच्याकडे त्याचे स्वत:चे हात-पाय बांधलेल्या अवस्थेतील फोटो मागवले. हेच फोटो दाखवून त्यांनी आता त्याच्या आईवडिलांकडे खंडणी मागायला सुरुवात केली. ८० हजार डॉलर्स तातडीनं द्या, नाहीतर तुमचा मुलगा पुन्हा तुम्हाला कधीच दिसणार नाही! 

घाबरलेल्या पालकांनी मुलाच्या अमेरिकेतील काॅलेजमध्ये संपर्क साधला आणि चौकशी केली. प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर त्यांनी चक्र फिरवली. काही जणांनी झुआंगला कॅम्पिंगचं सामान घेऊन पहाडाकडे जाताना पाहिलं होतं. पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरू केला आणि बर्फाळ पहाडांवर जागोजागी तपासणी सुरू केली. त्यावेळी पहाडातील एका छोट्याशा गुहेत मरणासन्न अवस्थेत त्यांना झुआंग सापडला. त्याच्याकडे खाण्यासाठी पुरेसं अन्न नव्हतं, पुरेसं पाणी नव्हतं. एवढ्या कडाक्याच्या थंडीत तग धरता येईल यासाठी पुरेसे कपडेही नव्हते. पोलिस जर वेळीच पोहोचले नसते, तर त्याचा मृत्यू निश्चित होता!

किडनॅपिंगमागे आंतरराष्ट्रीय गँग! पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर झुआंग तर सापडला, सुदैवानं त्याचा जीवही वाचला; पण सायबर किडनॅपर्सचा अजूनही छडा लागू शकलेला नाही. त्यांनी कुठून फोन केले, अपहरणासाठी झुआंगचीच निवड त्यांनी का केली, यादृष्टीनं त्यांचा तपास सुरू आहे. सध्या तरी पोलिासांना इतकंच कळालं आहे, यामागे सायबर किडनॅपर्सचं एक भलंमोठं नेटवर्क आहे आणि याची पाळंमुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेली असू शकतात!

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय