शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर तरी प्रश्नचिन्हे नकोत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 23:37 IST

हिमाचल प्रदेशच्या निवडणुका १२ आॅक्टोबरला जाहीर झाल्या. त्यानंतर तब्बल १३ दिवसांनी गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली.

- सुरेश भटेवराहिमाचल प्रदेशच्या निवडणुका १२ आॅक्टोबरला जाहीर झाल्या. त्यानंतर तब्बल १३ दिवसांनी गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. दरम्यानच्या १३ दिवसात पंतप्रधानांच्या दौ-यांमधे गुजरातमध्ये जवळपास २५०० कोटींच्या विविध प्रकल्पांच्या घोषणा झाल्या. गुजरातच्या घोषणेच्या विलंबाचा खुलासा करताना निवडणूक आयोगाने म्हटले की पावसाळ्यात गुजरातमध्ये काही जिल्ह्यात पूर आला. सरकारी अधिकारी, कर्मचारी मदतकार्यात गुंतले होते. त्यांच्या सहकार्याशिवाय निवडणूक प्रक्रिया पुढे नेणे शक्य नव्हते म्हणून हिमाचलबरोबर गुजरातच्या मतदानाच्या तारखा जाहीर करता आल्या नाहीत. आयोगाचा हा खुलासा किती कच्च्या पायावर उभा होता याचे पितळ गुजरातच्या अधिकाºयांनीच माध्यमांसमोर उघड केले. तथाकथित पूरग्रस्त जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यात प्रत्यक्ष पूर आलेलाच नव्हता तर केवळ मुसळधार पाऊस पडला होता. ज्या निवडक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली त्यात एखाद्या तालुक्याचा अपवाद वगळता इतर ठिकाणचे मदतकार्य, नुकसान भरपाई, इत्यादी सोपस्कार फार पूर्वी म्हणजे जुलै आणि आॅगस्ट महिन्यातच पूर्ण झालेत. असा खुलासा जागोजागच्या आपत्ती निवारण व पुनर्वसन अधिकाºयांनी तसेच काही तहसीलदार व जिल्हाधिकाºयांनीही केला. मुळातच नैसर्गिक संकटाच्या आपत्ती निवारणाला निवडणूक आचारसंहिता लागू होत नाही त्यामुळे आयोगाचा खुलासा हास्यास्पदच होता असा आरोप काँग्रेसच्या आनंद शर्मांनी केला. गुजरात निवडणूक विलंबाने जाहीर झाल्यामुळे काँग्रेसने अशा तमाम मुद्यांवर जोरदार टीकेची झोड उठवली.भारतात १९५२ पासून १९६२ पर्यंत सलग १० वर्षे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी होत होत्या. १९६७ सालापासून विविध कारणांमुळे ही लय बिघडली. ‘जिंदा कौमे पाच सालका इंतजार नही करती’ त्यावेळी असे विधान राममनोहर लोहियांनी केले होते. तेव्हापासून दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुका चालूच असतात. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी खºया खोट्या घोषणा आणि जुमलेबाजीचा वर्षाव सुरू असतो. कोणताही राजकीय पक्ष त्याला अपवाद नसला तरी परिस्थितीचा लाभ उठवण्याची अधिक संधी सत्ताधारी पक्षाला मिळते. गुजरातमधे तेच झाले. निवडणुकीची आचारसंहिता हिमाचलमध्ये १२ आॅक्टोबरला लागू झाली व त्यानंतर सलग १३ दिवस गुजरातमध्ये पंतप्रधानांना घोषणांचा दिवाळी सेल लावण्यास आयोगाने खुली सूट दिली. या विसंगतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची ‘मन की बात’ आठवली. लोकसभा आणि विधानसभा इतकेच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एकाचवेळी झाल्या पाहिजेत, असा आग्रही सूर पंतप्रधान मोदींनी मध्यंतरी लावला होता. केंद्रीय निवडणूक आयोगानेही तत्परतेने या प्रस्तावाला दुजोरा देत सांगितले की एकाचवेळी दोन्ही निवडणुका आयोजित करण्यास आयोग सक्षम आहे. प्रत्यक्षात ताजा अनुभव असा की स्वत:ला सक्षम म्हणवणाºया निवडणूक आयोगाला हिमाचल आणि गुजरातच्या निवडणुका देखील एकाच दिवशी जाहीर करता आल्या नाहीत. इरादा आणि वास्तव यातले अंतर या निमित्ताने सर्वांच्या लक्षात आले.गुजरातमधे सत्ताधारी भाजपच्या विरोधात विविध कारणांनी असंतोषाची लाट उसळल्याचे चित्र दिसते आहे. प्रतिकूल स्थितीवर मात करण्यासाठी पंतप्रधान मोदी वारंवार गुजरातचे दौरे करीत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातल्या डझनभर मंत्र्यांनाही त्यासाठीच तैनात करण्यात आले आहे. तरीही असंतोषाची धग कमी होताना दिसत नाही. अशा विपरीत स्थितीतही गुजरातचे निकाल भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता कमीच आहे, असे भाकीत काही वृत्तवाहिन्यांच्या सर्वेक्षणांनी नुकतेच जाहीर केले आहे. मतदानापूर्वी वातावरण निर्मिती करणाºया अशा भाकितांचे दावे ऐकले की इव्हीएम मशिनद्वारे होणाºया मतदान प्रक्रियेवरच्या जुन्या संशयाला पुष्टी मिळते. उत्तर प्रदेश व उत्तराखंडाच्या निवडणुकीपूर्वीही काही वाहिन्यांच्या भाकितांनी अशीच वातावरण निर्मिती केली होती. इव्हीएमच्या मतदान प्रक्रियेवरील आक्षेपांबाबत पुरेसा पुरावा आज उपलब्ध नाही मात्र एकूणच प्रक्रियेबाबत शंका अन् संशयाचे धुके अद्याप विरळ झालेले नाही.गुजरात व हिमाचलच्या प्रत्येक मतदान केंद्रावर यंदा मतदाराला आपले मत नेमके कोणाच्या पारड्यात पडले, हे स्पष्टपणे समजावे, यासाठी ७५ हजार पेपर ट्रेल (व्हीव्हीपॅट) मशिन्सची व्यवस्था केल्याचे आयोगाने स्पष्ट केले. तथापि मतदाराला काही क्षणांसाठी दिसणारी पेपर ट्रेलची स्लीप थर्मल पेपरवर असली तर त्याचे आयुष्य किती? हा प्रश्न अनुत्तरित आहे.नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात हिमाचल आणि गुजरातच्या निवडणुकांची धामधूम आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशनही याच काळात संपन्न होणार आहे. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीच्या वर्षश्राध्दाचे निमित्त साधून विरोधकांनी हा दिवस काळा दिवस म्हणून पाळायचे ठरवले तर प्रत्युत्तरादाखल सत्ताधाºयांनी हा दिवस काळा पैसाविरोधी दिन जाहीर केला आहे. येत्या दोन महिन्यात आरोप प्रत्यारोपांच्या धुमश्चक्रीबरोबर अनेक वादग्रस्त विषयही ऐरणीवर येणार आहेत. अशा वातावरणात किमान निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर तरी प्रश्नचिन्हे नकोत, इतकीच अपेक्षा आहे.

(राजकीय संपादक, लोकमत) 

टॅग्स :Electionनिवडणूक