शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

चुंबनाचा विश्वविक्रम करणारं जोडपं विभक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 07:59 IST

हे जेाडपं जगप्रसिद्ध झालं त्याचीही एक अनोखी कहाणी आहे. 

या जगात ध्येय‘वेड्या’ लोकांची काही कमी नाही. काेणत्या वेळी, कोण, कशासाठी, काय करेल, याचा खरोखरच काहीही भरवसा नाही. आता थायलंडच्या या जोडप्याचंच बघा. एक्काचाई आणि लक्साना टिरानाराट असं या दाम्पत्याचं नाव. दोघांचंही एकमेकांवर अपार प्रेम. सगळेजण त्यांच्याकडे पाहून प्रेमाच्या आणाभाका घ्यायचे इतकं त्यांचं गाढ प्रेम. हे जेाडपं जगप्रसिद्ध झालं त्याचीही एक अनोखी कहाणी आहे. 

एकमेकांवर प्रेम असणं, जवळीक असणं ही गोष्ट समजू शकते, पण या जोडप्यानं काय करावं? दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. या जोडप्यानं एका अनोख्या स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा होतीच तशी एकदम हटके. जे जोडपं जास्तीत जास्त वेळ चुंबन घेईल  त्यांना भलं मोठं बक्षीस जाहीर झालं होतं. केवळ पैशासाठी नाही, पण आपण हे नाजूक आव्हान पेलू शकतो का या उत्सुकतेपोटी एक्काचाई आणि लक्साना यांनी मोठ्या हौसेनं या स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा त्यांनी जिंकलीही. २०१३मध्ये झालेल्या या स्पर्धेत त्यांनी सलग ५८ तास ३५ मिनिटे एकमेकांचं चुंबन घेतलं. या स्पर्धेची एक प्रमुख अट होती.. कारण काही का असेना, पण तुम्ही तुमची चुंबनभेट सोडली, तर स्पर्धेतलं तुमचं आव्हान, अस्तित्व संपेल!  

एक्काचाई आणि लक्साना यांच्याप्रमाणे आणखीही अनेक प्रेमवीरांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांचंही एकमेकांवर निरतिशय प्रेम होतं. ही स्पर्धा आपणच जिंकू असं अनेक जोडप्यांना वाटत होतं, पण बऱ्याच जणांना हे नाजूक आव्हान काही पेलता आलं नाही. अगदी मनापासून प्रयत्न करुनही या जोडप्यांनी अखेर हार मानली आणि ते परस्परांपासून दूर झाले, तसे स्पर्धेतूनही लगेच बाहेर फेकले गेले.  एक्काचाई आणि लक्साना मात्र त्याला अपवाद ठरले. सर्वांत दीर्घ चुंबनाचा जागतिक विक्रम त्यांनी केला. त्यांचा हा अनोखा विक्रम गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही नोंदवला गेला! त्यावेळी ही स्पर्धा खूपच गाजली होती आणि ‘एकमेकांवर गाढ प्रेम असलेलं जोडपं’ म्हणून त्यांचं नाव जगभरात गाजलं होतं. आजही त्यांचं नाव त्याचसाठी घेतलं जातं. 

...पण ही कहाणी इथेच संपलेली नाही. या कहाणीत नुकताच आता एक वेगळा ट्विस्ट आला आहे. चुंबनाचा विश्वविक्रम करुन प्रेमाच्या दुनियेत आपलं नाव कोरण्यात यशस्वी ठरलेल्या या जोडप्यानं आता घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. 

२०११मध्ये झालेल्या अशाच एका चुंबन स्पर्धेतही या जोडप्यानं भाग घेतला होता. ती स्पर्धाही त्यांनीच जिंकली होती. २०१३ला मात्र त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडून विश्वविक्रम केला होता. या बक्षिसाच्या रकमेतून ते मालामाल झाले होते. लाखो रुपयांच्या हिऱ्यांच्या दोन अंगठ्याही त्यांनी स्पर्धेत जिंकल्या होत्या. आता मात्र ही सारी ‘प्रेमकहाणी’ संपुष्टात आली आहे. 

त्या दोघांना परस्परांपासून वेगळं करण्यामागे काय कारण आहे? हे दोघे म्हणतात,  ‘आमच्या विभक्त होण्यामागे आवर्जून सांगावं असं एकच एक, फारसं मोठं कारण नाही, पण काळाच्या ओघात शरीर-मनानं आम्ही एकमेकांपासून दूर होत गेलो.’ अर्थात, एक्काचाई आणि लक्साना टिरानाराट हे दोघं आता विभक्त झाले असले, तरी मुलांचं पालनपोषण मात्र ते सोबतीनंच करणार आहेत.. 

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी